Home क्रीडा Samaresh Jung coronavirus: भारतीय खेळाडूने करोनाविरुद्ध ‘जंग’ जिंकली! - samaresh jung successful...

Samaresh Jung coronavirus: भारतीय खेळाडूने करोनाविरुद्ध ‘जंग’ जिंकली! – samaresh jung successful win war against coronavirus


वृत्तसंस्था, नवी दिल्ली

तुम्ही करोना ‘पॉझिटिव्ह’ असाल तर आपल्या मनातील नकारात्मक भावना काढून त्याला पराभूत करा, असा मोलाचा संदेश भारताचा माजी नेमबाज समरेश जंग देतो. समरेश नुकताच करोनातून मुक्त झाला. घरातच स्वतःचे आणि आणखी पाच सदस्यांचे विलगीकरण करून त्याने करोनाविरुद्धची ‘जंग’ (युद्ध) जिंकली.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सेवेत असलेल्या पिस्तुल नेमबाज समरेशला जूनच्या प्रारंभी करोना ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे समजले. त्यावेळी त्याला थोडा ताप आणि खोकला अशी लक्षणे दिसत होती. त्याच्या घरातील पाच जणांनाही करोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. समरेशच्या घरात एकूण १३ जण राहतात. त्यामुळे करोनाची बाधा होऊ नये यासाठी विविध खोल्यांमध्ये करोनाबाधितांचे विलगीकरण करण्यात आले. समरेशच्या भल्यामोठ्या घरात अनेक खोल्या असल्यामुळे सगळ्यांना स्वतंत्रपणे ठेवता आले. घरात स्वच्छतागृहे अधिक प्रमाणात असल्यामुळे ती अडचणही दूर झाली. २२ जूनला सगळे करोनामुक्त झाल्याचे प्रमाणपत्र मिळेपर्यंत सगळ्यांनी करोनासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन केले. आता करोनामुक्त झाल्यामुळे या लढाईत कशाप्रकारे संघर्ष करावा, स्वतःला कसे सकारात्मक ठेवावे याचे मार्गदर्शन समरेश करतो.

घर बनले रुग्णालय

समरेश यासंदर्भात म्हणतो की, करोना झाल्यानंतर काय करावे आणि काय करू नये, याबद्दल मला जो काही अनुभव आला तो मी सगळ्यांना सांगतो. या काळात घरातील माझे नेमबाजीविषयक सर्व साहित्य बाजूला पडले आणि घराचे रूपांतर अक्षरशः रुग्णालयात झाले. नेमबाजीच्या साहित्याची जागा तापावरील पॅरासिटेमॉलच्या गोळ्या, ऑक्सिजनची पातळी तपासणारे यंत्र, श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यास ऑक्सिजन पुरविणारे यंत्र यांनी घेतली. समरेशने दोन सुवर्णपदकांसह २००६च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सात पदके जिंकली. त्यानंतर गोल्डफिंगर म्हणून त्याला बिरुदावली मिळाली. खेळाडू म्हणून नेहमीच विविध आव्हानांचा सामना करणाऱ्या समरेशसमोर करोनाने वेगळे आव्हान ठेवले. एक अनोखा अनुभव त्याला या संघर्षातून मिळाला.

नकारात्मक भावना नको!

तो म्हणतो की, ‘ज्यांना करोना झाला असेल त्यांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाण्याचे कारण नाही. पण बेफिकीर होऊनही चालणार नाही. आपल्याला कोणतीही बाधा होणार नाही, असे वाटून बेसावध राहू नका. मला करोना झाल्याचे कळल्यानंतर मी सकारात्मक विचार करण्याचे ठरविले. कोणत्याही परिस्थिती नकारात्मक विचारांना थारा दिला नाही. ५ जूनला मला करोना झाल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर मी व्हॉटसअप, टीव्ही यापासून स्वतःला लांब ठेवले. ते दिवस अत्यंत खडतर होते, पण मी स्वतःला सकारात्मक ठेवले.’

समरेशने सांगितले की, ‘नवी दिल्लीतल्या माझ्या घरात आम्ही १३ सदस्य राहतो. आम्ही सहाजण करोनाबाधित झाल्याचे लक्षात आल्यानंतर दोन जणांना करोनाविरुद्ध लढण्यासाठी विशेष सुविधा देण्यात आल्या तर चार जण घरातच एकमेकांपासून विलग राहिले. घरात अनेक खोल्या आहेत आणि पुरेशी स्वच्छतागृहे आहेत. त्यामुळे ज्यांना करोना नाही त्यांना वेगळी स्वच्छतागृहे वापरता आली. घराबाहेर पालिकेच्या लोकांनी कोव्हिड-१९चे पोस्टर लावले होते. आता आम्ही या करोनातून मुक्त झाल्यानंतर ते पोस्टर काढण्याची प्रतीक्षा करत आहोत. हा अनुभव वाईट होता आणि त्याचा सामना करणे सोपे नव्हते. या कठीण काळात आमच्या शेजारी असलेल्या मित्रमंडळींनी औषधे आणि अन्नधान्य आणून दिले. करोना झाल्याचे लक्षात आल्यानंतर सीआयएसएफला मी कळविले. तसेच माझ्या कुटुंबाच्या जवळच्या डॉक्टरांनीही आम्हाला मदत केली.’

समरेश सध्या भारतीय संघाचा पिस्तुल नेमबाजी प्रशिक्षक आहे. खेळाडूंच्या उच्च कामगिरीवर तो लक्ष केंद्रित करतो.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nashik corona update: Coronavirus : नाशिक जिल्ह्यात ३२४ नवे रुग्ण; तिघांचा मृत्यू – nashik reported 324 new corona cases and 3 deaths in yesterday

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकजिल्ह्यात करोना संशयितांची संख्याही वाढत असून, तब्बल १,२४८ अहवाल प्रलंबित म्हणजेच रांगेत आहेत. शुक्रवारी ३२४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले...

coronavirus in aurangabad: जेवणास विलंबामुळे करोनाबाधित रस्त्यावर – corona patients came to road due to they not getting lunch in aurangabad

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकोविड केअर सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना महापालिकेतर्फे चहा-नाष्टा व जेवण दिले जाते. किलेअर्क येथील कोविड केअर सेंटरमध्ये शुक्रवारी दुपारचे जेवण...

Recent Comments