Home संपादकीय samwad News : इस्लामची अभ्यासपूर्ण चिकित्सा - practical medicine of islam

samwad News : इस्लामची अभ्यासपूर्ण चिकित्सा – practical medicine of islam


वासंती दामले

इस्लाम धर्मावर लेखन व समाजावर टिप्पणी करणारे अभ्यासू लेखक म्हणून, अब्दुल कादर मुकादम मराठी वाचकांना चांगले परिचित आहेत. त्यांचे ‘इस्लाम : ज्ञात आणि अज्ञात’ हे नवीन पुस्तक वाचताना याचा पुनःप्रत्यय येतो. हे पुस्तक वाचताना लेखकाची भूमिका लक्षात घेणे आवश्यक आहे. लेखकावर राष्ट्र सेवादलाचे संस्कार आहेत! मरहूम हमीद दलवाई यांच्यासोबत त्यांनी मुस्लीम सत्यशोधक समाजाचे अनेक वर्षे काम केले. दलवाई, अ.भि. शाह व कुरुंदकर यांचे विचार त्यांना त्यावेळी आकर्षित करत होते. समाजाच्या प्रत्येक चिकित्सेची सुरुवात धर्मचिकित्सेपासून होते हे मार्क्सचे मतही त्यांना पटत होते. परंतु त्यांच्या मते प्रत्येक धर्मात काही कालातीत व मौल्यवान परंपरा, तसेच अनेक कालबाह्य व रुढीग्रस्त परंपरा असतात. त्याची चिकित्सा करणे, म्हणजे या सर्वांचा अभ्यास करणे व लोकांसमोर मांडणे. त्याशिवाय या परंपरेत वाढलेला समाज स्वतःत बदल घडवून आणायला तयार होत नाही. उलट स्वसंरक्षणासाठी तो जास्तच रूढी व परंपरांना चिकटून बसण्याचा प्रयत्न करतो. याची अनेक उदाहरणे इतिहासात विखुरलेली आहेत. या विचाराने प्रेरित होऊनच मुकादमांनी डॉ. असगरअली इंजिनीअर यांचे मनोमन शिष्यत्व पत्करले व इस्लाम धर्माचा अभ्यास चालू केला. त्या अभ्यासाचे फलित म्हणजे हे पुस्तक!

या पुस्तकाचे महत्त्व म्हणजे, इस्लामला लेखकाने इतिहासाच्या चौकटीत बसवले आहे. अरबस्तान हे वाळवंट असल्याने समाज शेतीप्रधान नव्हता. काही सुपी प्रदेश सोडल्यास, कुठेच काहीही पिकत नव्हते. त्यामुळे अरबी ही भटकी व व्यापारावर अवलंबून असणारी जमात होती. टोळीजीवन, भटकेपणा व पुरुषप्रधानता हे या समाजाचे स्थायीभाव होते. सिरीया मात्र सुपीक प्रदेश असल्याने, तिथल्या अरब टोळ्या शेती करणाऱ्या होत्या. सर्व शेतीसंस्कृतीत सर्जनाचे प्रतीक म्हणून मातृदेवतांचे पूजन होते. या देवींची आयात व्यापाऱ्यांनी मक्केत केली होती. त्यातील हुबेई नावाची देवी, जलदेवता मानली जात असे व व्यापारासाठी समुद्र पार करणारे अरब या देवतेची पूजा करायचे. या व्यापाऱ्यांकडे सुबत्ता होती, कारण मक्का व मदिना ही दोन शहरे चीन ते युरोपकडे जाणाऱ्या सिल्क-रूट वर होती. मक्केत काबाच्या मध्यभागी विहीर होती व तिच्या काठी इतरही तीन देवता होत्या. मुकादमांच्या मते, या देवता मूळ सिरीयाहून आणून इथे वसवल्या होत्या. या देवतांना वाहिलेल्या संपत्तीवर मुख्य व्यापारी टोळ्यांचा ताबा होता. तेव्हाच्या मक्केच्या आजूबाजूच्या प्रदेशात, एकीकडे अतिश्रीमंत व्यापारी व दुसरीकडे बहुसंख्य अतिगरीब जनता अशी समाजरचना होती. मदीनामध्ये ज्यू व ख्रिस्ती व्यापारी होते आणि त्यामुळे संस्कृती थोडी भिन्न होती व ते नव्या धर्माला स्वीकारण्यास जास्त अनुकूल होती, पण बाकी रचना तशीच होती.

अशा परिस्थितीत कुरैश टोळीतील हाशीम कबिल्यात, इ.स. ५७०ला महंमद यांचा जन्म झाला. त्यांचे वडील जन्मापूर्वीच वारले होते व ते सहा वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांच्या आजोबांनी व काकांनी त्यांचा सांभाळ केला. अनाथपणाच्या जाणिवेतून वयाच्या नवव्या वर्षीच त्यांनी मेंढपाळाची नोकरी स्वीकारली. सातव्या शतकाच्या सुरुवातीला, व्यापार करणाऱ्या विधवा खदिजाकडे ते नोकरीला लागले. पुढे तिचा संपूर्ण विश्वास संपादन करून, तसेच व्यापारावर प्रभुत्व मिळवून, त्यांनी तिच्याशी लग्न केले. व्यापाराच्या निमित्ताने इकडे-तिकडे प्रवास करत असताना, त्यांच्या नजरेस पडणारा समाज होता, तो म्हणजे असंख्य टोळ्या व कबिल्यात विखुरलेला अरब समाज. मेंढीपालनचा मुख्य व्यवसाय आणि त्यांच्या आपापसातील व श्रीमंत व्यापाऱ्यांसाठी केलेल्या लढाया. सततच्या लढायांमुळे असंख्य निराधार मुले व विधवा स्त्रिया! मूलतः पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या या अरब समाजात कुठल्याही तऱ्हेची राजकीय समाज व्यवस्था नव्हती.

इ.स. ६१० मध्ये, या सर्व परिस्थितीने बेचैन होऊन ते मक्के जवळील हिरा नावाच्या गुहेत चिंतन करत बसले असताना, त्यांना साक्षात्कार घडला व त्यांनी इस्लाम धर्माचे मूलभूत चिंतन मांडायला सुरवात केली. यानुसार एकेश्वरवाद आणि न्याय, समता व बंधुत्व ही पैगंबरांनी मांडलेली चतःसूत्री म्हणता येईल. ६१० ते ६३२ अशी बावीस वर्षे त्यांना आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी मिळाली. मूर्तिपूजा अरब समाजात फार खोलवर रुजली नव्हती. त्यामुळे एकेश्वरवाद स्वीकार करणे त्यांच्यासाठी अवघड नव्हते. परंतु मुकादम म्हणतात त्याप्रमाणे, सामाजिक न्याय व आर्थिक समता निर्माण करणे हे कठीण होते. श्रीमंत व्यापाऱ्यांना, त्यांच्यासाठी राबणारे स्वस्त मजूर व गुलाम ताब्यातून सोडणे नकोसे होते. मक्केवर ताबा पैगंबरांच्या कुरैश टोळीचा होता. त्यांनी पैगंबरांना मारायचाही प्रयत्न केला, पण चुलते अबू तालिब यांच्यामुळे ते बचावले. ६१९ मध्ये हजरत खतिजा मृत्यू पावल्या व ६२० मध्ये काका. त्यामुळे पैगंबरांचा भावनिक आधार व सुरक्षाकवच दोन्ही नष्ट झाले. ६२२ मध्ये महंमद पैगंबर यांचाही मृत्यू झाला. मक्केतील व्यापारी आपले सांपत्तिक सामर्थ्य अबाधित ठेऊ इच्छित होते, तर पैगंबर आपले समतेचे तत्त्व सोडायला तयार नव्हते. त्यामुळे त्यांना चार युद्धांना सामोरे जावे लागले होते, पण तोपर्यंत कष्टकरी व वंचित समाजात इस्लामचा फैलाव बऱ्यापैकी झाला होता. चौथे युद्ध रक्तहीन झाले व मक्केतील व्यापारी बिनशर्त इस्लामचा अंगीकार करते झाले. इथवर टोळ्या, कबिले पद्धत नष्ट होऊन सर्व अरब समाज एक झाला होता.

पैगंबरांच्या मृत्युनंतर, एक व्यवस्था निर्माण करण्याच्या गरजेतून खलिफा या पदाचा आविष्कार झाला. पवित्र कुराण लिखित नव्हते. पैगंबरांच्या शिष्यांनी गरज जाणून आठवले तसे लिहिले. तसेच अमुक एक परिस्थितीत पैगंबर कसे वागले असते किंवा त्यांनी कसा निर्णय घेतला होता, असा विचार करून लिहिले गेले ते हदीस. अशी तीन हदीस इस्लाममध्ये आहेत. लेखकाने इस्लामची पार्श्वभूमी, कुराणात काय मांडले गेले आहे, नंतर जी कलमे इस्लामी म्हणून त्या समाजात आली, ती कुठल्या परिस्थितीत आली व त्याची कारणमीमांसा अत्यंत अभ्यासपूर्ण तऱ्हेने मांडली आहे. स्त्रियांविषयी, कपड्यांविषयी हजरत महंद काय म्हणाले होते व त्यात जे बदल घडून आले, त्याच्या मागची परिस्थिती लेखकाने निष्पक्षपणे मांडली आहे. ज्यांना इस्लाम विषयी तटस्थपणे जाणून घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी हे उत्तम पुस्तक आहे.

इस्लाम : ज्ञात आणि अज्ञात

लेखक : अब्दुल कादर मुकादम

मुखपृष्ठ :

प्रकाशक : अक्षर प्रकाशन, मुंबई

पृष्ठं : २१६

किंमत : ३०० रु.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Anthony Stuart: गोलंदाजांमध्ये अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव खेळाडू; पाहा व्हिडिओ – australian cricketer anthony stuart only bowler to take a hat trick in...

नवी दिल्ली: वनडे क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत चार असे गोलंदाज झाले आहेत ज्यांनी पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक घेतली आहे. पण करिअरमधील अखेरच्या सामन्यात हॅटट्रिक घेण्याची...

bmc health officers: रात्रभर जागले पालिकेचे अधिकारी – bmc officers was facing stress due to not receiving the cowin app’s message regarding covid-19 vaccination...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकोवीन अॅपवर नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणासंदर्भात मेसेज पाठवण्यात येणार होते. मात्र शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अॅप आणि मेसेज न...

Recent Comments