Home संपादकीय samwad News : करोना आणि स्त्री-नेतृत्वाचा मानवी चेहेरा - corona and the...

samwad News : करोना आणि स्त्री-नेतृत्वाचा मानवी चेहेरा – corona and the human face of woman-leadership


सुप्रिया देवस्थळी – कोलते

जगाच्या पातळीवर अजूनही स्त्रियांचं नेतृत्व मर्यादित आहे. पण ज्या देशांत हे नेतृत्व आहे, तिथे त्यांनी करोनाला यशस्वीरीत्या थोपवून धरलंय, त्यानिमित्ताने.

करोना व्हायरसचा संसर्ग आणि त्याचा जगातल्या १८५ देशांमध्ये झालेला प्रसार, हे एक ‘न भूतो न भविष्यति’ अशा प्रकारचं संकट आहे. ह्यापूर्वी सुद्धा प्लेगसारख्या साथी येऊन गेल्या. त्यांचाही प्रसार अनेक देशांमध्ये झाला होता. पण करोनाच्या प्रसाराचा वेग हा अनाकलनीय होता. व्हायरसचं नक्की स्वरूप, त्याचे शरीरावर होणारे नेमके परिणाम, व्हायरसचा प्रसार नेमका कसा होतो, हे सगळं कळेपर्यंत तो चीनमधून युरोप, अमेरिका इथे पसरला सुद्धा आणि सर्वांच्याच तोंडाला त्याने फेस आणला. अशा प्रकारच्या जागतिक संकटात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या नेतृत्वाचं योगदान फार महत्त्वाचं असतं. ज्या देशांच्या नेतृत्वाने संकटाचा आवाका लक्षात घेऊन पटापट उपाययोजना केल्या, त्यांच्याकडे परिस्थिती चिघळली नाही. जगातल्या काही देशांच्या प्रमुख स्त्रियांचं नेतृत्व ह्यावेळी विशेष परिणामकारक ठरल्याचं दिसतंय. न्यूझीलंडच्या जेसीन्दा आर्दन, तैवानच्या प्रमुख साई इंग वेन (tsai-ing-wen), नॉर्वेच्या एर्ना सोलबर्ग, डेन्मार्कच्या मेट फ्रेड्रिक्सन, फिनलँडच्या सना मारिन, जर्मनीच्या अँजेला मर्केल…. ही काही ठळक उदाहरणं. ह्या सर्व देशांमध्ये व्हायरसचा शिरकाव झालाच, पण त्याने प्रचंड मनुष्यहानी होऊ नये म्हणून तातडीने उपाययोजना करण्यात ह्या सर्व स्त्री नेत्यांचं कुशल नेतृत्व दिसलेलं आहे. ह्या व्हायरसवर नियंत्रण ठेवण्यासाठी बहुतेक देशांनी आपल्या सीमा बंद करणे आणि लॉकडाउन हे मार्ग स्वीकारले. हे मार्ग लिहायला किंवा बोलायला जितके सोपे आहेत, तितके ते अमलात आणायला सोपे नाहीत. युरोप आणि अमेरिकेत व्यक्तिस्वातंत्र्य फार महत्त्वाचं असतं. तिथल्या नागरिकांना, तुम्ही घराबाहेर कारण असल्याशिवाय जायचं नाही असं सरकारने सांगितलं, तर त्या सरकारविरुद्ध निदर्शनं होतात. न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी अगदी सुरुवातीलाच देशातल्या नागरिकांना आवाहन केलं की, व्हायरसवर नियंत्रण ही आपल्या सर्वांचीच सामायिक जबाबदारी आहे. ह्या संकटाच्या काळात आपल्या देशातल्या वयस्क मंडळींना, तसंच आपल्या शेजाऱ्यांना मदत करणं, हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे.

तैवान हा देश मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक वस्तुंचं उत्पादन करण्यासाठी प्रसिद्ध आहे. ह्या देशात ५०० पेक्षा कमी केसेस आहेत आणि फक्त १० मृत्यू झाले आहेत. जगभरात इतरत्र जसा लॉकडाउन झाला, रोजच्या आयुष्यात प्रचंड बदल झाले, तेवढी उलथापालथ तैवानमध्ये झाली नाही. ह्याही देशाने आपल्या सीमा लवकर बंद केल्या, टेस्टिंग आणि आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रित केलं. जर्मनीच्या चॅन्सेलर युरोपातल्या अत्यंत महत्त्वाच्या नेतृत्वांपैकी एक. युरोपातल्या इटाली, स्पेन ह्या देशांमध्ये करोनाने कसं थैमान घातलं, हे आपल्या सर्वानाच माहीत आहे. त्या मानाने जर्मनीत परिस्थती खूपच बरी. जर्मनीने टेस्टिंगवर भर दिला, अँटीबॉडी टेस्टची सुरुवात जर्मनीनेच केली. अँजेला मर्केल ह्यांनी या काळात केलेली भाषणं आपण पाहिली, तर त्यांची संयत आणि विज्ञानाधिष्ठित भूमिका लगेच जाणवते.

गेल्या ५० ते १०० वर्षांच्या जगाच्या इतिहासाकडे आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की, जागतिक संकटात अमेरिकेचं नेतृत्व नेहमी महत्त्वाचं ठरलं आहे. मात्र आताचं संकट त्याही दृष्टीने वेगळं आहे. यावेळी अमेरिकेचं नेतृत्व जगासाठी नव्हतंच. प्रत्येक देशाने आपापले मार्ग काढले. स्त्री-नेत्यांनी कोठलाही वेळ वाया न घालवता, बघू या किंवा करू या अशी डळमळीत भूमिका न ठेवता फटाफट निर्णय घेतले. या निर्णयांची अंमलबजावणी करताना आपल्या देशातल्या लोकांना त्यात सामील करून घेतलं. अशा प्रकारच्या संकटाचा सामना एकट्याने करता येत नाही. त्यात विज्ञानतज्ञ, डॉक्टर, अर्थतज्ञ अशा सगळ्यांचंच योगदान आवश्यक असतं. आपण ह्या विषयातले जाणकार नाही, पण योग्य सल्ला घेऊन त्यानुसार मार्ग काढण्याचं कौशल्य स्त्री-नेतृत्वाने दाखवलं.

साऊथ कोरियाने ह्या संकटाचा सामना ज्या पद्धतीने केला, त्यातून साऊथ कोरिया मॉडेल जगापुढे आलं. ह्यात टेस्टिंगवर भर होता. ‘साऊथ कोरिया सेंटर फॉर डिसीज कंट्रोल’च्या प्रमुख Jeong Eun -kyeong ह्यांनी टेस्ट, शोध आणि नियंत्रण ही स्ट्रॅटेजी जगाला दिली, असं म्हणायला हरकत नाही. डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेड्रिक्सन ह्यांनी सुद्धा सगळी पावलं पटापट उचलली. आपण स्वतः भांडी घासत असल्याचा व्हिडीओ त्यांनी फेसबुकवर अपलोड केला. नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांनी वैद्यकीय स्वरूपाचे सगळे निर्णय वैद्यक क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडे सोपवले. बाकी लॉकडाउनसारखे उपाय करून वैद्यकीय क्षेत्राला पाठिंबा दिला. एर्ना यांनी तर फक्त लहान मुलांसाठी प्रेस कॉन्फरन्स घेतली. या प्रेस कॉन्फरन्समध्ये कोणी मोठी पत्रकार मंडळी नव्हती. अशा परिस्थितीत भीती वाटणं, मित्रमैत्रिणींची आठवण येणं, हे अगदी साहजिक आहे हे त्यांनी मुलांना पटवून दिलं.

भारतातही केरळ राज्याने करोनाच्या युद्धात बरंच यश मिळवलेलं आहे. केरळच्या आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांनी अगदी सुरुवातीला म्हटलं होतं, या प्रकारच्या संकटाचा सामना करताना भावनाशील होऊन चालणार नाही, विज्ञानाच्या आणि तर्कशुद्धतेच्या आधारावरच आपण ह्या साथीचा सामना करू शकतो. परदेश प्रवासाबद्दल सरकारला माहिती न देणं हा सार्वजनिक आरोग्य कायद्याचा भंग ठरवला जाईल, हा महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे इन्फेक्शनचा धोका असणारे नागरिक शोधणं शक्य झालं.

ह्या सगळ्या स्त्रियांच्या नेतृत्वगुणांकडे आपण पाहिलं, तर काही सामायिक गोष्टी जाणवतील. पहिली म्हणजे झटकन निर्णय घेणे. दुसरी म्हणजे, ह्या संकटाचा सामना एकट्याने करणं शक्य नाही, हे मान्य करून सर्वाना बरोबर घेऊन पुढे जाणं. तिसरी गोष्ट आहे करुणा-ममता- सहानुभूती-अनुकंपा. पुरुष नेत्यांकडे हे गुण नाहीत, असा दावा नाही; पण ह्या सर्व स्त्रियांनी हे गुण अधिक प्रमाणात दाखवले हे नक्की! चौथी गोष्ट आहे कणखरपणा आणि खंबीरपणा. येणाऱ्या संकटाच्या भीतीने डगमगून न जाता, विज्ञानाचा आधार घेऊन मार्ग आणि उपाय ठरवले. त्याच्या अंमलबजावणीत कुठेही काही कमतरता राहू नये म्हणून प्रयत्न केले. जगाच्या पातळीवर अजूनही स्त्रियांचं नेतृत्व मर्यादित आहे. पण ज्या मोजक्या नेत्या आहेत, त्यांनी करोनाच्या निमित्ताने स्त्री-नेतृत्वाचा प्रभावीपणा आणि मानवी चेहरा, सगळ्या जगाला दाखवून दिला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nashik News : मुंबईच्या वाहनांना सातपूरचा पर्याय – transport on the flyover from dwarka to meenatai thackeray stadium will be closed soon in nashik

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकद्वारका ते मीनाताई ठाकरे स्टेडियम या भागातील उड्डाणपुलावरील वाहतूक लवकरच बंद करण्यात येणार आहे. के. के. वाघ महाविद्यालय ते...

BJP government in Maharashtra: त्यांचे ‘हे’ कौशल्य आज कळाले; शरद पवारांचा दानवेंना चिमटा – raosaheb danve was never known as a ‘jyotishi’ but now...

मुंबई: पुढच्या दोन ते तीन महिन्यात भाजपचं सरकार येईल, असा दावा करणाऱ्या भाजप नेते रावसाहेब दानवे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...

Sanjay Nirupam: काँग्रेसचा हा नेता म्हणतो, ‘शिवसेना नेत्यांची चौकशी व्हायलाच हवी’ – Shivsena Leaders Are Involved In Corruption, Must Probe, Says Congress Leader Sanjay...

मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचं घर व कार्यालयावर ईडीनं टाकलेल्या छाप्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एका सुरात भाजपला घेरलं असताना काँग्रेसचे माजी खासदार...

Recent Comments