Home संपादकीय samwad News : पत्रास कारण की... - the letter is due to...

samwad News : पत्रास कारण की… – the letter is due to …


स्त्रियांच्या नेतृत्वगुणांचा यथोचित गौरव

‘करोना आणि स्त्री-नेतृत्वाचा मानवी चेहरा’ हा ३मेच्या ‘संवाद’ पुरवणीतील सुप्रिया देवस्थळी-कोलते यांचा,जागतिक दर्जाच्या स्त्रियांवरील नेतृत्वगुणाचे चिंतन करणारा सुंदर लेख वाचला. संपूर्ण जगावर महामारीचे संकट आलेले असताना, ज्या देशाचे नेतृत्व स्त्रिया करत आहेत, त्यांनी अत्यंत धीरोदात्तपणे या भीषण साथीशी जो सामना केला तो अभूतपूर्व असाच आहे. न्यूझीलंडच्या जेसीन्दा आर्दन, तैवानच्या साई इंग वेन, नॉर्वेच्या एर्ना सोलबर्ग, डेन्मार्कच्या मेट फ्रेड्रिक्सन, फिनलंडच्या सना मारिन, जर्मनीच्या अँजेला मर्केल या सर्वांनी ज्या कुशलतेने या संकटाशी सामना केला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी वाचली आहे.

या सर्व स्त्री-नेतृत्वाने याविषयी त्वरेने व विज्ञानानाधिष्ठित घेतलेले निर्णय अनुकरणीय ठरले आहेत. योग्य पद्धतीने केलेल्या चाचण्या व लॉकडाउनच्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी, त्यांच्या नेतृत्वगुणांची कस लावणारी ठरली आहे. तेव्हा या समस्त आदरणीय स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा करीत असतानाच आज प्रकर्षाने आठवण होत आहे ती दिवंगत इंदिरा गांधी यांची. कारण भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान असताना अनेकदा स्त्रियांमधील कणखरपणा दाखविण्यात त्या यशस्वी तर ठरल्याच होत्या, पण आंतरराष्ट्रीय जागतिक राजकारणात भारताला त्यांनी उच्चस्थानी नेऊन ठेवले होते, हे सत्य नाकारून चालणार नाही!

– प्रदीप करमरकर, ठाणे

लेखाने उभारी मिळाली!

‘वास्तववादी दिग्दर्शक!’ हा रेखा देशपांडे यांचा लेख (संवाद १९ एप्रिल) वाचताना मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळाची आठवण झाली. राजा परांजपे यांचा ११० वा जन्मदिन २४ एप्रिलला होता, त्यानिमित्ताने या लेखात त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांचा आढावा घेतल्याबद्दल धन्यवाद! यातील बरेचसे चित्रपट त्या काळात पाहिले असल्याने त्याबद्दलच्या आठवणीना उजाळा मिळाला. या चित्रपटांतील कथा,सु मधुर गाणी, संगीत व दर्जेदार दिग्दर्शन पाहताना, चांगले चित्रपट पाहिल्याचा आंनद मिळत असे. आता वयाच्या ७९व्या वर्षीसुद्धा कधीतरी दूरदर्शनवर हे चित्रपट किंवा त्यातील गाणी पाहताना त्यावेळचे वातावरण, चित्रपट, कलाकार, दिग्दर्शक आठवतात. जीवनाचे वास्तव चित्रपट माध्यमातून पाहताना व भूतकाळ आठवून नकळत डोळ्यांत पाणी येते. रेखा देशपांडे यांच्या लेखाने मनाला पुन्हा एकदा उभारी मिळाली.

– सीमंतिनी काळे, सातपूर-नाशिक

या वयात टेक्नोसॅव्ही कसे होणार?

१० मेच्या संवाद पुरवणीतील ‘मालक कोण, नोकर कोण?’ हा सौरभ करंदीकर यांचा लेख वाचला. मानवजात ही पुढील काळात तंत्रज्ञानावर पूर्णपणे विसंबून राहील, हे करोनाने पटवून दिले आहे. कारण सध्या एका खोलीत माझा मुलगा वर्क-फ्रॉम-होम करतो, माझी नात दुसऱ्या खोलीत इंटरनेटवर ऑनलाईन स्कूल अटेंड करत असते, मी हॉलमधे टॅबवर ई-वर्तमानपत्र वाचत असतो.

खरंतर माणूस म्हणजे मालक आणि नोकर म्हणजे तंत्रज्ञान, पण आपण हल्ली तंत्रज्ञानावरच अवलंबून आहोत हे करोनाने दाखवून दिले. या सर्व अपरिहार्य तंत्रज्ञान जंजाळात आम्ही वृद्ध-जेष्ठ नागरिक मात्र टेक्नोसॅव्ही नाही, ही खरी आमची समस्या आहे! आता या वयात आम्ही टेक्नोसॅव्ही कसे व्हायचे?

– श्रीनिवास स. डोंगरे, दादर-मुंबईSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

अर्णब गोस्वामींची अडचण वाढणार; गृहमंत्री अनिल देशमुखांनी केले मोठे वक्तव्य – arnab goswami chat how arnab knows sensitive things like balakot and pulwama says...

नाशिक: रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV) मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या कथित व्हॉट्सअॅप चॅट (Whatsapp Chat) उघड झाल्यानंतर त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली...

Maharashtra Gram Panchayat Election Result: Gram Panchayat Election Result: गावात दिसला शिवसेनेचा जोर!; भाजपच्या वर्चस्वाला बसला ‘महाझटका’ – shiv sena ahead in maharashtras gram...

मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आहेत. यातील १ हजार ५२३ गावांतील निवडणुका बिनविरोध झाल्या असून १२ हजार...

grant to marathwada farmers: बारा लाख शेतकऱ्यांना ५५३ कोटी वाटप – 553 crore rupees of grant distributed to farmers in mrathwada

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजून ते ऑक्टोबर या कालावधीत राज्यभरात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने मदतीच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली...

Recent Comments