Home संपादकीय samwad News : भटक्या-विमुक्तांची लोकसंस्कृती - folk culture of nomads

samwad News : भटक्या-विमुक्तांची लोकसंस्कृती – folk culture of nomads


डॉ. श्रीकांत तिडके…भारताच्या भूमीवर भटके-विमुक्त लोकांची वैशिष्ट्यपूर्ण लोकसंस्कृती आहे. सतत भटकंती करणाऱ्या या प्रत्येक जमातीचा आपला स्वतंत्र व्यवसाय आहे. यातील अनेक जमाती पशुपालन, मनोरंजन, शिकार, भविष्यकथन व देवाधर्माच्या नावाने भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करीत असतात. यातील बहुतांश जाती-जमाती पूर्वी भटक्या स्वरूपात जीवन जगत असल्या, तरी कालौघात आता वेगवेगळ्या गावात स्थायिक झालेल्या आहेत. मात्र त्या आता एका जागी स्थिर झालेल्या असल्या तरी त्यांनी आजवर आपापल्या जमातीचं वैशिष्ट्यपूर्ण मौखिक लोकवाङमय, लोकसंस्कृती, प्रथा-परंपरा जपलेल्या आहेत. मात्र आताच्या काळात या लोकांच्या जीवनात प्रचंड उलथापालथ सुरू झालेली आहे. आधुनिकीकरण, माहिती तंत्रज्ञान, यांच्या झंझावातामुळे या लोकांची पारंपरिक लोकसंस्कृती नामशेष होत चालली आहे. या बदलाच्या पार्श्वभूमीवर ‘भटके-विमुक्त समाज : भाषा आणि संस्कृती’ या पुस्तकात लेखक श्रीकृष्ण काकडे यांनी भटक्या-विमुक्त लोकांची लोकसंस्कृती व भाषांमधील बदल आस्था आणि संवेदनशीलतेने टिपले आहेत. महाराष्ट्रासह मध्यभारतातील मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, गुजरात या राज्यांत फिरून उदरनिर्वाह करणाऱ्या शिकलगार, कंजारभाट, मरीआईवाले, नंदीवाले, कैकाडी, वडार, बेलदार, तुंबडीवाले, डोंबारी, ओतारी, स्मशानजोगी, कुडमुडे जोशी, डवरी-गोसावी, भाट, बंजारा, गाडीया-लोहार व पारधी या जमातींच्या लोकसंस्कृती व भाषेचा वेध लेखकाने या पुस्तकात घेतला आहे. त्यासाठी विविध ठिकाणी फिरून लेखकाने क्षेत्रीय संशोधन केलेले आहे आणि त्यामुळेच ते महत्त्वपूर्ण व मौलिक स्वरूपाचे ठरले आहे. अनेक लोकांच्या मुलाखती घेऊन लेखकाने त्या-त्या जमातीचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्नही केलेला आहे.भटके-विमुक्त जमातीचे लोक गावोगाव फिरून आपला उदरनिर्वाह करतात. गाढव, घोडे, तट्टू, बैलगाडी यांच्यावर आपला संसार लादून त्यांच्या जीवनाचे चक्र चालू असते. वर्षातील आठ महिने फिरून पावसाळ्याच्या दिवसापुरते ते कोणत्यातरी गावात स्थायिक होतात. हंगाम सुरू झाला की पुन्हा त्यांच्या भ्रमंतीला सुरुवात होते. अशा भटक्या जमातींच्या लोकसंस्कृतीचा अभ्यास करताना लेखकाने त्यांच्या विविध प्रथा-परंपरा, रीती-रिवाज यांचे सूक्ष्म अवलोकन या अभ्यासात केलेले आहे. काळानुसार भटक्या-विमुक्त लोकांच्या आहारात व पेहरावात होणारे बदलही लेखकाने टिपलेत आणि ते करीत असताना पूर्वीच्या त्यांच्या परिस्थितीवरही दृष्टिक्षेप टाकण्यात आलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे आधुनिक गोष्टींचा त्यांच्यावर कसा थेट परिणाम होतो आहे, याचे अवलोकन अनेक ठिकाणी लेखकाने केले आहे. विविध जाती-जमातींची कुळे, गोत्राविषयीची माहिती देतानाच, त्यांच्या जन्म, विवाह, मृत्यू यांचीही अभ्यासपूर्ण माहिती लेखकाने जमा केलीय. आता काळाच्या ओघात अनेक भटक्या जमातींनी आपले पूर्वीचे व्यवसाय सोडून दिलेले आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी आता हे लोक नव्या नव्या व्यवसायाकडे वळले आहेत. पण त्यातही त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर संघर्ष करावा लागत आहे, या संघर्षाचे चित्रणदेखील या पुस्तकात आले आहे. भटक्या-विमुक्त लोकांचे देव, त्यांची उपासना, विधी, नवस-सायास, बळी-प्रथा, तंत्र-मंत्र, शकुन-अपशकुन, जादू-टोणा, यांविषयी लोकमानसात प्रचलित असलेले समज-गैरसमज व दृष्टी याविषयी शक्य तितके खोलात जाऊन लेखकाने वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच भटक्या-विमुक्त समाजातील स्त्रियांच्या वाट्याला येणारा संघर्ष, कौटुंबिक जीवनात होणारी कुचंबणा, याचेही प्रभावीपणे चित्रण करण्यात लेखकाला यश आलेले आहे. भटक्या- विमुक्त जमातींच्या जातपंचायती आज लुप्त झालेल्या आहेत. पण पूर्वी त्यांचे स्वरूप कसे भयकारी होते, त्याचीही माहिती पुस्तकात आहे.प्रत्येक भटक्या-विमुक्त समाजाची आपली वैशिष्टपूर्ण भाषा आहे. त्यातील अनेक भाषा ‘पारूषी’ नावाने ओळखल्या जातात, ज्यात सांकेतिकता केंद्रबिंदू आहे. या प्रत्येक भाषेमध्ये आपला स्वतःचा शब्दसंग्रह आहे. या भाषा पूर्णपणे मौखिक असून त्यांना लिपी नाही. परंतु काळाच्या ओघात भटक्या-विमुक्त जमातींचे पारंपरिक व्यवसाय मागे पडल्याने या सांकेतिक भाषांची उपयोगिता संपलेली आहे. भटक्या-विमुक्त जमातीचे लोक बहुभाषिक असतात. समाजात सर्वत्र संचार असल्याने त्यांना आपली मूळ भाषा सोडून इतर दोन-तीन भाषा सहजपणाने बोलता येतात. काळानुसार भटक्या-विमुक्तांच्या भाषांमध्ये होणारे बदल व प्रभाव याविषयीची सविस्तर चर्चा लेखकाने जातीनिहाय स्वतंत्र स्वरूपात पुस्तकात केलेली आहे. तसेच मूळ भाषेतील शब्दसंग्रह, लोकगीत, लोककथा यांचे नमुने देऊन लेखकाने या भाषांचे स्वरूप देवनागरी लिपीतून प्रकट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हे पुस्तक जिज्ञासू वाचक, मानवशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ अशा साऱ्यांनाच उपयोगाचे ठरणारे आहे….पुस्तकाचे नाव – भटके विमुक्त समाज भाषा आणि संस्कृतीलेखक : श्रीकृष्ण काकडेमुखपृष्ठ : नंदकुमार खुर्जेकर प्रकाशक : नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया,नवी दिल्लीपृष्ठं : २२७किंमत : २५५ रु.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ICC Announces ‘Player Of The Month’ Awards – ICC ने सुरू केले नवे पुरस्कार; हे भारतीय खेळाडू आहेत जेतेपदाच्या शर्यतीत | Maharashtra Times

दुबई:icc player of the month awards आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने क्रिकेट अधिक रोमांच आणण्यासाठी एका नव्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. आतापर्यंत आयसीसी...

chhatrapati shivaji school satpur: उद्यान विभागाने बजावली नोटीस – park department issued notice to chhatrapati shivaji school over tree cutting

म. टा. वृत्तसेवा, सातपूरकामगारनगरी असलेल्या सातपूर कॉलनीतील विविध विकास संघटना संचलित छत्रपती शिवाजी विद्यालयात वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्यात आली होती. रविवारी (दि. २५) सुटीच्या...

Maratha reservation: वडेट्टीवार यांना मंत्रिमंडळातून हटवा – balasaheb sarate has demanded to removed vijay wadettiwar remove his minister post due to take stand against...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादविजय वडेट्टीवार यांच्या आक्षेपांना समर्पक उत्तर देण्यासाठी 'न्या. गायकवाड आयोगाची वैधानिकता' या विषयावर वडेट्टीवार यांच्याशी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून लाइव्ह चर्चा...

Recent Comments