Home मनोरंजन sana khan marriage: मौलवीशी लग्न करणाऱ्या सना खानने सांगितलं नमाजसोबत आणखी काय...

sana khan marriage: मौलवीशी लग्न करणाऱ्या सना खानने सांगितलं नमाजसोबत आणखी काय करायला हवं – sana khan video on namaj this thought changed her life


मुंबई- सलमान खानसोबत सिनेमात दिसणारी आणि बिग बॉसची स्पर्धक सना खानने महिन्याभरापूर्वीच धर्मासाठी सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला होता. आज तिने गुजरातमधील मौलाना मुफ्ती अनसशी निगाह केला. या बातमीनंतर सनाचे इन्स्टाग्रामवरचे अनेक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सना या व्हिडिओमध्ये इस्लाम आणि चांगल्या कर्माबद्दल बोलत आहे. नमाज करण्यासोबतच पाप करू नका असा सल्ला ती देतेय.

या व्हिडिओमध्ये सना म्हणते की, आज मी तुमच्यासोबत अशी एक गोष्ट शेअर करणार आहे जी ऐकल्यानंतरच मी त्याचा स्वीकार केला. ही गोष्ट म्हणजे छोट्या मजेसाठी पाप करू नका. आपले गुन्हे नेहमीच आपल्या सोबत राहतात. हेच गुन्हे आपल्याला नरकात घेऊन जातात. याचमुळे काही मिनिटांच्या मजेसाठी गुन्हे करू नका.

धर्मासाठी सिनेसृष्टी सोडल्यानंतर सना खानने केला मौलाना मुफ्ती अनसशी निगाह

सना खानच्या या व्हिडिओवर अनेक यूझर्सने तिला ट्रोल केलं आहे. तर अनेकांनी तिचं कौतुकही केलं आहे. सनाचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती साध्या कपड्यांमध्ये दिसत आहे. सनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून सिनेसृष्टी सोडण्याची माहिती दिली होती.


दरम्यान, सना खानने काल रात्री गुजरातमधील मौलाना मुफ्ती अनसशी लग्न केलं. सुरत इथे दोघांचं लग्न झाल. सना आणि तिचा नवरा मुफ्ती यांच्या लग्नाचे दोन व्हिडिओ आता समोर आले आहेत. एजाज खानने सना आणि मुफ्ती यांची ओळख करून दिली होती. लग्नावेळी सनाने हिजाबसह पांढर्‍या रंगाचा भरतकाम केलेला ड्रेस घातला होता. तर नवऱ्याने मुफ्ती अनसने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला होता.


सनाने म्हटलं होतं की तिला मानवतेची सेवा करायची आहे. याचसाठी ती अल्लाहच्या आदेशाचं पालन करणार आहे. सनाने सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर सिनेमा आणि मनोरंजन क्षेत्राशी निगडीत सोशल मीडियावरील सर्व फोटो आणि व्हिडिओ तिने डिलीट केले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sourav Ganguly Announced 5 T 20 Match – करोना काळात हा संघ येणार भारत दौऱ्यावर; BCCIकडून घोषणा

नवी दिल्ली: भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यानंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी,वनडे आणि टी-२० मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने...

Recent Comments