Home शहरं बीड sand mafia: संतापजनक! वाळू माफियांनी केला तहसीलदारांना ट्रकनं चिरडण्याचा प्रयत्न - sand...

sand mafia: संतापजनक! वाळू माफियांनी केला तहसीलदारांना ट्रकनं चिरडण्याचा प्रयत्न – sand mafia tries to kill tehsildar with truck in gevrai beed


बीड: वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाने बीडकडे निघालेल्या तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या स्विफ्ट गाडीला पाठीमागून धडक देऊन, जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडे सहा वाजता गेवराई तालुक्यातील गढी जवळ घडली. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी रेखावार तातडीने घटनास्थळी पोहोचले. तहसीलदार जाधवर अपघातात बचावले आहेत. दरम्यान, वाळू तस्करी करणाऱ्यांचा माज जिरवू, मात्र चांगल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जनतेने पाठिंबा द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी पत्रकारांशी केले. रात्रीउशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

गेवराई तालुक्यातील गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून गुरुवारी सायंकाळी अवैध वाळू वाहतुक करणारा हायवा आढळून आल्यानंतर त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, चालकाने भरधाव वेगाने गाडी पुढे नेली. तहसीलदार जाधवर यांची गाडी हायवाच्या समोर येताच स्विफ्टला धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हायवा ताब्यात घेतला असून चालक फरार झाला आहे. घटनास्थळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे दाखल झाले असून आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले असून, आरोपीला तात्काळ अटक करून, कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rishabh Pant Is Recover From Injury And He Will Be Play In Todays Match Against Kings Eleven Punjab – IPL2020: दिल्लीसाठी गूड न्यूज, पंजाबविरुद्धचा...

दुबई : पंजाबबरोबरचा सामना सुरु होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. दिल्लीच्या संघात एका धडाकेबाज खेळाडूचे आज पुनरागमन होऊ शकते,...

Farmers agitation: जिल्हाधिकारी कार्यालयात उधळला भाजीपाला – aurangabad farmers agitation for announce wet drought and compensation

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादसातत्याने होत असलेली अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील उभे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसान भरपाई तातडीने द्यावी; तसेच जिल्ह्यात ओला...

Recent Comments