Home शहरं मुंबई Sanjay Nirupam: Chinese apps banned : चिनी अॅपवरील बंदी योग्यच; काँग्रेसच्या 'या'...

Sanjay Nirupam: Chinese apps banned : चिनी अॅपवरील बंदी योग्यच; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याकडून केंद्राचं समर्थन – Congress Leader Sanjay Nirupam Support Chinese Apps Banned Decision


मुंबई: चिनी अॅपवरील बंदीवरून काँग्रेस नेते राहुल गांधींसह राज्यातील काँग्रेस नेत्यांनीही केंद्र सरकारच्या निर्णयावर सडकून टीका केलेली असतानाच काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी मात्र केंद्राच्या निर्णयाचं जोरदार समर्थन केलं आहे. चिनी अॅपवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय योग्यच असल्याचं निरुपम यांनी म्हटलं आहे. निरुपम यांनी थेट पक्षाच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

संजय निरुपम यांनी ट्विट करून हा निर्णय घेतला आहे. चिनी अॅप्सवरील बंदीचा निर्णय अत्यंत योग्य आहे, असं सांगतानाच पण टिकटॉकवर बंदी आल्याने आपल्या देशातील लाखो तरुण बेरोजगार होणार आहेत. सध्याच्या काळातील सर्वात स्वस्त आणि देशी मनोरंजनाला आपण मूकणार आहोत. टिकटॉक स्टारचा अचानक झालेला हा अंत त्रासदायक आहे. त्यांच्या असीम प्रतिभेला विनम्र श्रद्धांजली, असा चिमटाही निरुपम यांनी काढला आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नमो अॅपवरही बंदी आणावी अशी मागणी केली होती. भारतीयांची माहिती धोक्यात आली म्हणून चिनी अॅपवर बंदी घालण्यात आली आहे. त्याच निकषावर भारतीयांची माहिती गोळा करून परदेशात पाठवणाऱ्या नमो अॅपवर देखील बंदी घाला, अशी मागणी चव्हाण यांनी केली होती. तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड चिनी अॅपवर घालण्यात आलेल्या बंदीवरून सरकारला टोला लगावला होता. तिथे मॅप बदलले जात आहेत, आणि आपण इथे ॲप वर बंदी घालतोय. काय पोरकटपणा आहे? आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे सदस्य आहोत आणि आपण स्वाक्षरी केलेल्या कराराच्या कलम २ आणि १४ (सी) – २ या कलमांनुसार ही बंदी शक्य आहे का? कशाला ही धूळफेक?, असा सवाल त्यांनी ट्विटमधून केला आहे. तसेच दुसऱ्या ट्विटमध्ये चीन तिकडे मॅप बदलण्यात बिझी आहे आणि आपण अॅप बंद करण्यात मश्गुल आहोत, असा चिमटा आव्हाड यांनी काढला होता. त्याशिवाय शिवसेनेनेही या निर्णयावरून केंद्र सरकारला घेरले होते. चिनी अॅप्सपासून धोका आहे हे माहीत होते तर त्या कंपन्या सुरू का होत्या? चिनी अॅप्सवरील बंदीसाठी जवानांच्या बलिदानांची वाट पाहात होता का? २० जवानांचे बलिदान झाले नसते तर या कंपन्या अशाच सुरू राहिल्या असत्या, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाना साधला होता.

चीनला झटका, टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर भारताची बंदी

दरम्यान, भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काल ५९ चिनी अॅपवर बंदी घातली होती. टिकटॉक, हॅलो अॅप आणि कॅमस्कॅनरसह ५९ अॅपवर बंदी घालण्यात आली आहे. भारतात युट्यूबहून अधिक युजर्स हे टिकटॉक अॅपचे आहेत. टिकटॉकचे जवळपास २० कोटी युजर्स असल्याचं सांगण्यात येतंय. तर हेलो अॅपचे भारतात ४० हजार युजर्स आहेत. वुई मेट, शेअर इट, युसी ब्राउजर्स, क्लब फॅट्री, युसी न्यूज, झेंडर, लाइक, सीएम ब्राउजर्स, शीन, न्यूजडॉग, वंडर कॅमेरा, कॅम स्कॅनर, क्लिन मास्टर-चिता मोबाइल, फोटो वंडर, क्यूक्यू प्लेअर, स्वीट सेल्फी, हेलो, यू व्हिडिओ, मोबाइल लेजंड्स अशा एकूण ५९ अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे.

‘TikTok’ बंदीवर भारतीयाचं म्हणणं काय ?

Chinese apps banned : आव्हाडांनी उडवली केंद्राच्या ‘त्या’ निर्णयाची खिल्ली; म्हणाले, काय हा पोरकटपणा!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

CSK vs KKR: IPL 2020: राणा दा जिंकलंस… नितिशच्या अर्धशतकाच्या जोरावर केकेआरचे चेन्नईपुढे मोठे आव्हान – ipl 2020: kolkata night riders given 173 runs...

आबुधाबी: नितिश राणाने यावेळी धडाकेबाज फलंदाजी करत सर्वांचीच मने जिंकून घेतली. कोलकाता नाइट रायडर्सचे फलंदाज एकामागून एक अपयशी ठरत असताना राणाने झुंजार अर्धशतकी...

India Stands with France: ‘दहशतवादाविरोधातील लढाईत भारत फ्रान्ससोबत, हल्ल्यांचा निषेध’ – india stands with france in the fight against terrorism

नवी दिल्लीः फ्रान्समधील नाइस शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यासह नुकत्याच झालेल्या हल्ल्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निषेध केला आहे. दहशतवादाविरूद्धच्या लढ्यात भारत फ्रान्ससोबत आहे, असं...

Recent Comments