Home महाराष्ट्र Sanjay Oak: Sanjay Oak कोविड टास्क फोर्स प्रमुख संजय ओक यांचे करोनाशी...

Sanjay Oak: Sanjay Oak कोविड टास्क फोर्स प्रमुख संजय ओक यांचे करोनाशी युद्ध; आता धोका टळला! – task force chief sanjay oak successfully beat coronavirus


मुंबई:करोना साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या ‘ कोविड टास्क फोर्स ‘चे प्रमुख डॉ. संजय ओक यांनाही करोना संसर्गाची लागण झाली असून त्यांची प्रकृती आता चांगली असल्याचे सांगण्यात आले आहे. ( Task Force Chief Sanjay Oak )

संजय ओक यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली आहे. त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तातडीने मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना ऑक्सिजन द्यावा लागला होता. मात्र, आता त्यांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. याबाबत संबंधित रुग्णालय वा टास्क फोर्समधील अन्य सदस्यांकडून अद्याप अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

वाचा: मुंबईत पुन्हा संचारबंदी लागू; मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय

देशात महाराष्ट्रामध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यातही मुंबईतील रुग्णसंख्येने अनेक राज्यांना मागे टाकत ७० हजारचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईतील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन १२ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड टास्क फोर्सची घोषणा केली होती. करोनामृत्यूदर कमी करण्यासाठी तसेच साथ नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत अभ्यास करून सूचना देण्यासाठी या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. यात वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टरांचा समावेश असून डॉ. संजय ओक हे या टास्कचे प्रमुख आहेत. या टास्कमार्फत वेळोवेळी सरकारला सूचना देण्यात येत आहेत. टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून संजय ओक संपूर्ण स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. प्रत्यक्ष फिल्डवर जाऊनही ते स्थितीचा आढावा घेत आहेत. या साऱ्या दगदगीत ओक यांनाही करोनाचा मुकाबला करावा लागला आहे.

वाचा: ‘लालबागचा राजा’चे आगमन व्हायलाच हवे; समन्वय समिती

दरम्यान, मुंबई सोबतच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स बनवण्यात आला आहे. या टास्क फोर्सच्या मदतीने करोना साथीवर नियंत्रण मिळवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत.

ओक यांच्यावर मोठी जबाबदारी

करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारची जी निकराची लढाई सुरू आहे त्यात डॉक्टरांचा टास्क फोर्स महत्त्वाची भूमिका निभावत आहे. या टास्क फोर्सच्या मार्गदर्शनाखालीच सध्या करोना बाधित रुग्णांवर उपचारांची दिशा ठरवली जात आहे. टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून यात संजय ओक याच्यावर अधिक जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांनी करोना स्थितीचा आढावा घेताना प्रत्येक बैठकीत ओक तसेच टास्क फोर्सला विश्वासात घेऊनच पुढचे पाऊल टाकलेले आहे. अशावेळी संजय ओक यांना लवकराच लवकर प्रकृती स्वास्थ्य लाभावे व ते पुन्हा एकदा करोना विरुद्धच्या लढाईत उतरावे, यासाठी त्यांच्या तब्येतीची विशेष काळजी घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Super over: सुपर ओव्हर देखील टाय होते तेव्हा कोणते नियम लागू होतात; जाणून घ्या – all you need to know super over tied repeating...

दुबई: निर्धारीत ५० किंवा २० षटकात दोन्ही संघ जेव्हा समान धावा करतात तेव्हा सामना सुपर ओव्हर (super over) मध्ये जातो. सामना टाय आणि...

PM Modi: PM मोदींनी सांगितलं, त्यांच्या कुठल्या निर्णयाने होतेय करोना रुग्णसंख्येत घट – india has one of the highest recovery rates of 88 percent...

नवी दिल्ली: भारतात सध्या करोना संसर्गाच्या ( coronavirus india ) रुग्णांमध्ये घट झाली आहे आणि करोनातून बरे ( covid 19 india ) होण्याचे...

Recent Comments