Home महाराष्ट्र sanjay rathod on pooja chavan: मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करु नका; बदनामी...

sanjay rathod on pooja chavan: मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करु नका; बदनामी थांबवाः संजय राठोड – sanjay rathod first reaction on pooja chavan suicide case


हायलाइट्स:

  • संजय राठोड यांची पत्रकार परिषद
  • पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचं घाणेरडे राजकारणः राठोड
  • या प्रकरणात बदनामी थांबवण्याचं आवाहन

वाशिमः ‘पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणाचं घाणेरडे राजकारण केलं जात असून ते चुकीचं आणि निराधर आहे. माझी सामाजिक आणि राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे,’ अशी प्रतिक्रिया वनमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. जवळपास दोन आठवड्यांनी समोर आल्यानंतर राठोड यांनी पोहरादेवी गडावर पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली आहे.

सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात नाव आल्यामुळं वादात सापडलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी आज दोन आठवड्यानंतर सार्वजनिकरित्या पुढे आले आहेत. संजय राठोड यांनी आज पूजा चव्हाणच्या आत्महत्येवर पहिल्यादांच प्रतिक्रिया दिली आहे.

‘पूजा चव्हाणच्या मृत्यूबद्दल संपूर्ण गोर बंजारा समाज दुःखी आहे. चव्हाण कुटुंबियांच्या दुखाःत मी सहभागी आहे. मात्र, या प्रकरणात घाणेरडे राजकारण केलं जातं आहे. हा प्रकार माझी सामाजिक, राजकीय, आणि वैयक्तिक कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशी सुरु केली आहे तपासात सर्व गोष्टी स्पष्ट होतील,’ असं स्पष्टीकरण संजय राठोड यांनी केलं आहे.

‘समाजमाध्यम आणि प्रसारमाध्यमातून जे दाखण्यात आलंय त्यात तथ्य नाही हे मी खात्रीनं सांगू शकतो. मुख्यमंत्र्यांनी चौकशी सुरु केली आहे त्यात सर्व स्पष्टचं होईल. या प्रकरणावरुन गेल्या १० दिवसांपासून माझी बदनामी करण्यात येत आहे. मी सर्वांना विनंती करणार आहे पोलीस चौकशी करत आहेत तोपर्यंत माझ्या समाजाची, माझी बदनामी करु नका,’ अशी कळकळीची विनंती संजय राठोड यांनी केली आहे.

गायब नव्हतो

‘मी १५ दिवस गायब नव्हतो मुंबईतील फ्लॅटवरुन शासकीय काम करत होतो. आजपासून पुन्हा पूर्वीप्रमाणं काम करणार आहे. चौकशीमधून सर्व सत्य बाहेर येईल, आपण विश्वास ठेवावा,’ असं ते म्हणाले आहेत.

आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करु नका

‘सोशल मीडियावर संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राठोड यांनी यावरही प्रतिक्रिया दिली आहे. गेली ३० वर्ष सामाजिक, राजकीय जीवनात काम केलं आहे. अनेक लोक माझ्यासोबत फोटो काढतात. एका घटनेमुळं मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करु नका,’ असं आवाहनही राठोड यांनी केलं आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nashik sahitya sammelan postponed: nashik sahitya sammelan : नाशिकच्या साहित्य संमेलनाला स्थगिती, मे अखेर होणार संमेलन – nashik akhil bhartiya sahitya sammelan postponed

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकः नाशिकमध्ये २६ ते २८ मार्च दरम्यान होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोविडच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय अखिल...

'करोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर'

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद शहरात संसर्गाची स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे, अशी कबुली महापालिकेचे प्रशासक यांनी दिली आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे लॉकडाउनशिवाय...

Pune: पुणे: हॉटेलच्या नावाखाली सुरू होते हुक्का पार्लर, पोलीस पथक धडकले; पण… – hookah parlours in holkarwadi haveli pune owner and other four person...

हायलाइट्स:हॉटेलच्या नावाखाली सुरू होते हुक्का पार्लरपोलिसांना माहिती मिळताच धडक कारवाईमालकासह पाच कर्मचाऱ्यांना केली अटकहुक्का ओढणारे गेले पळून म. टा. प्रतिनिधी, हडपसर: ग्रामीण...

Recent Comments