या भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे परीक्षेचं आयोजन केलं जातं. ही ग्रुप बी ची बिगर-राजपत्रित पदे आहेत. अर्ज आणि पदांची माहिती तसेच नोटिफिकेशनची लिंक पुढे देण्यात आली आहे.
पदांची माहिती
ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर / ज्युनिअर ट्रान्सलेटर – २७५ पदे
सिनिअर हिंदी ट्रान्सलेटर – ८ पदे
एकूण पदांची संख्या – २८३
ही संभाव्य भरती आहे. गरजेनुसार पदांची संख्या कमी किंवा जास्त होऊ शकते.
या पदांवर नोकरी मिळणाऱ्या उमेदवारांना ३५,४०० रुपयांपासून १,४२,४०० रुपये प्रति महिन्यापर्यंत वेतन दिले जाणार आहे. या व्यतिरिक्त केंद्र सरकारच्या नियमांनुसार अन्य सुविधांचा लाभही मिळणार आहे.
बनारस हिंदू विद्यापीठात अनेक पदांवर भरती
इंटेलिजन्स ब्युरोत अनेक पदांवर भरती…
अर्ज कसा कराल?
अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची सुरुवात २९ जून २०२० पासून झाली आहे.
अर्ज करण्याची अंतिम मुदत – २५ जुलै २०२०
ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम मुदत – २७ जुलै २०२०
ऑफलाइन चलान जनरेट करण्याची अंतिम मुदत – २९ जुलै २०२० (रात्री ११.३० पर्यंत)
चलानद्वारे शुल्क जमा करण्याची अंतिम मुदत – ३१ जुलै २०२०
कॉम्प्युटर बेस्ड परीक्षेची तारीख (पेपर – १) – ६ ऑक्टोबर २०२०
डिस्क्रीप्टीव परीक्षेची तारीख (पेपर – २) – ३१ जानेवारी २०२१
SSC JHT notification 2020 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
SSC च्या वेबसाइट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.