Home शहरं पुणे sassoon hospital news: कनिष्ठ अधिसेविका जाचाची बळी?; 'ससून'ची चिफ मेट्रन निलंबित -...

sassoon hospital news: कनिष्ठ अधिसेविका जाचाची बळी?; ‘ससून’ची चिफ मेट्रन निलंबित – chief matron of sassoon general hospital pune suspended


पुणे: ससून रुग्णालयातील मुख्य अधिसेविका (चिफ मेट्रन) राजश्री कोरके यांच्या विरोधात प्राथमिक चौकशीत दोष आढळल्याने त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांच्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई केली आहे.

वाचा: करोनाची धास्ती! विलगीकरण कक्षात युवकाची आत्महत्या

ससून रुग्णालयात कोरके या चिफ मेट्रन म्हणून जबाबदारी सांभाळत होत्या. त्याच ठिकाणी कनिष्ठ सहायक अधिसेविका पदावर अनिता राठोड या देखील कार्यरत होत्या. मात्र, त्यांचा २४ एप्रिलला रुग्णालयात मृत्यू झाला. करोना साथीदरम्यान कामाचा अतिताण व वरिष्ठांचा जाच यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने केली होती. त्या पत्राची दखल वैद्यकीय शिक्षण खात्याने घेऊन चौकशी करण्याचे आदेश ससून रुग्णालयास दिले होते.

या तक्रारीच्या अनुषंगाने ससून रुग्णालय व बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून रुग्णालयाने प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन केली. त्या समितीने काही निष्कर्ष नोंदवून त्याचा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठविला होता. ज्येष्ठ सहायक अधिसेविका उपलब्ध असतानाही राजश्री कोरके यांनी कनिष्ठ सहायक अधिसेविका अनिता राठोड यांना करोनाच्या रुग्णसेवा व व्यवस्थापनाची सर्वस्वी जबाबदारी दिली. त्यानंतर ९ एप्रिलपासून कामाच्या वाटपाविना राठोड व इतर दोन अधिसेविकांचे आदेश काढल्यामुळे तेथील कामाचा अतिरिक्त ताण झाला असल्याचे नाकारता येत नाही, असे निष्कर्ष समितीने अहवालात नोंदविले आहेत.

वाचा: बेसुमार बिल आकारणाऱ्या सोमय्या रुग्णालयाला कोर्टाचा दणका

कोरके यांनी सर्व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन काम केल्याचे दिसून येत नाही. कोरके यांच्याकडून परिचारिकांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याकरिता सुसूत्रतेचा अभाव दिसून येतो, असाही निष्कर्ष समितीने काढला. ससूनच्या समितीने केलेल्या चौकशीत कोरके या प्रथमदर्शनी दोषी आढळून येत असल्याने त्यांना निलंबित करून त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी करण्याची शिफारस वैद्यकीय शिक्षण खात्याकडे करण्यात आली आहे. मुख्य अधिकसेविकेच्याविरोधात विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम ४ मधील पोटनियम १(अ) मधील तरतुदीनुसार राज्य सेवेतून त्यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण खात्याने दिले आहेत.

दरम्यान, राठोड यांचा मृत्यू मेंदूत रक्तस्त्राव होऊन झाला आहे. त्यांच्या मृत्यूचा कामाच्या ताणाशी संबंध नाही. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने त्याबाबत तक्रार केली होती, असे ससूनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

वाचा: मुंबईत धडधाकट करोना रुग्णांत दिसतंय एक नवीन लक्षण; डॉक्टर झाले हैराणSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jameel shaikh murder: Jameel Shaikh Murder: मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येला गंभीर वळण; ठाण्यातील ‘तो’ नगरसेवक कोण? – jameel shaikh death complaint against thane corporator

महेश गायकवाड । ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांचे मारेकरी २४ तासानंतरही सापडलेले नसून मारेकऱ्यांना अटक करण्याचे पोलिसांचे युद्धपातळीवर...

cricket news News : ‘भारताचा कसोटी मालिकेत ४-० असा पराभव होणार’ – india tour of australia 2020 india will lose 4-0 in test series...

नवी दिल्ली: india tour of australia 2020सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ वनडे आणि टी-२० मालिकेनंतर कसोटी मालिका खेळणार आहे. चार सामन्यांच्या कसोटी...

Recent Comments