Home शहरं सातारा satara News : पुणे-सातारा महामार्गावरदुरुस्तीच्या कामांना वेग - speed up repair work...

satara News : पुणे-सातारा महामार्गावरदुरुस्तीच्या कामांना वेग – speed up repair work on pune-satara highway


पुणे-सातारा महामार्गावर

दुरुस्तीच्या कामांना वेग

सातारा :

पुणे-सातारा या राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने दुरुस्तीची कामे वेगाने सुरू आहेत. वाढे फाटा, खिंडवाडी, शेंद्रे, वेळे, रायगाव, लिंब, नागेवाडी आदी ठिकाणी दुरुस्तीचा काम वेगाने सुरू आहेत.

दरम्यान, लॉकडाउनमुळे स्थानिक मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांची उपासमार होत होती. महामार्ग प्राधिकरणाने या स्थानिक मजुरांना काम दिल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटला आहे. लॉकडाउनमुळे महामार्गावर तुरळक वाहतूक सुरू आहे. लॉकडाउन पूर्वी महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. मात्र, लॉकडाउन सुरू झाल्यानंतर ही कामे पूर्णतः बंद होती. मात्र, आता पुन्हा एकदा स्थानिक कामगारांच्या मदतीने रस्ते दुरुस्तीच्या कामाला वेळ देण्यात आला आहे. खराब झालेल्या रस्त्यांच्या ठिकाणी कार्पेट डांबराचा रस्ता तयार करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी हॉटमिक्स डांबर टाकून रस्त्यांची डागडुजी होताना दिसत आहे.

रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकतील झाडे उन्हामुळे करपू लागली असल्याने या झाडांना पाणी घालणे. झाडात वाढलेले गवत काढण्याचे काम सुरू आहे. महामार्गावर काही वीजेचे दिवे बंद पडले होते. त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. खिंडवाडीतील डोंगराला प्लास्टर लावण्याचे काम सुरू आहे. सध्या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने महामार्ग प्राधिकरणाला रस्त्यावर काम करणे अधिक सोपे जात असून, ही कामेही वेगाने होत आहेत. अनेक मजूर आपल्या गावाकडे गेल्यामुळे कमी कामगारांच्या मदतीने हे काम करावे लागत आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Raghu: India vs Australia: भारतीय संघातील एक सदस्य झाला ‘गायब’? करोनाच्या चुकीच्या रिपोर्टमुळे झाला घोळ… – team india’s throw down specialist raghu’s corona test...

सिडनी, India vs Australia : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाचा सराव सुरु झाला आहे. पण या दौऱ्यात भारतीय संघातील एक सदस्य अजूनही सरावाला आलेला...

Shahrukh Khan Snapped Near Gateway Of India In Mumbai – तो बघ शाहरुख! बदललेल्या लुकमुळे किंग खान बाजूने चालत गेल्याचंं कोणाला कळलंच नाही

मुंबई- बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचे चाहते तो मोठ्या स्क्रीनवर परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएलमध्ये त्याचा नवीन लुक समोर आल्यानंतर चाहते...

Vanchit Bahujan Aghadi: रेशनकार्डसाठी बायको द्या, तहसिलदारांसमोर युवकाचे अनोखे आंदोलन – vanchit bahujan aghadi protest for ration card in ahmednagar

अहमदनगर: सरकारी कार्यालयातून मागण्या मान्य करून घेण्यासाठी अनेकदा अनोखी आंदोलने केली जातात. बीड जिल्ह्यातील पाटोदा तहसिदार कार्यालयासमोरही एका युवकाने असेच वेगळे आंदोलन केले....

Recent Comments