Home शहरं सातारा satara News : मुलाचा मृतदेह चार दिवस घरातच - the boy's body...

satara News : मुलाचा मृतदेह चार दिवस घरातच – the boy’s body remained at home for four days


म. टा. वृत्तसेवा, सातारा

जावली तालुक्यातील म्हाते खुर्द येथे दहावीत शिकणाऱ्या मुलाचा मृतदेह कुटुंबियांनी चार दिवस घरात ठेवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मृतदेह सडून दुर्गंधी येऊ लागल्यामुळे ही घटना उघडकीस आली. स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

जावली तालुक्यातील म्हाते खुर्द येथील आर्यन जयवंत दळवी (वय १५) असे या मृत मुलाचे नाव आहे. म्हाते खुर्द या गावात रविवारी दुर्गंधी येत होती. या घटनेमुळे परिसरात सकाळपासूनच उलटसुलट चर्चा सुरू होती. दुपारनंतर ही दुर्गंधी दळवी यांच्या घराच्या परिसरातून अधिक येऊ लागल्याने स्थानिक ग्रामस्थांनी माहिती घेतल्यानंतर अख्खे गाव हादरून गेले. आर्यन याचा मृत्यू चार दिवसांपूर्वी झाला होता. मात्र, ही बाब इतर कोणालाही माहीत नव्हती.

आर्यनचा मृतदेह त्याच्या मृत्यूनंतर घरातच ठेवण्यात आला होता. आर्यनला दुर्धर आजार होता व त्यावर उपचार देखील सुरू होते. मात्र, करोना विषाणूच्या संक्रमणामुळे त्याच्या कुटुंबियांना त्याला उपचारासाठी कुठेच नेता येत नसल्याचे समोर येत आहे. सायंकाळी ही माहिती स्थानिक प्रशासनाला समजल्यानंतर वैद्यकीय अधिकारी, पोलिसांनी घटनास्थळी भेट घेऊन पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृत्यू होऊनही मृतदेह घरात ठेवून तो पूर्णपणे सडल्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pune phd student murder latest news: Pune Crime: पुण्यात पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याचा खून; चेहरा दगडाने ठेचला – 30 year old phd student murdered...

पुणे: पुणे येथील पाषाण भागातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एनसीएल) येथे पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक...

latest opinion poll 2021: Opinion Poll: मोदी-शहांचे आव्हान परतवत ममता साधणार हॅट्ट्रिक!; दक्षिणेतील ‘या’ राज्यात सत्तांतर? – tmc to retain bengal ldf headed for...

हायलाइट्स:पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी हॅट्ट्रिक साधण्याची शक्यता.आसाम भाजपकडे राहणार तर पुदुच्चेरीत कमळ फुलणार.तामिळनाडूत स्टॅलिन तर केरळात डाव्यांची जादू दिसणार.नवी दिल्ली: पश्चिम बंगाल, आसाम,...

Amravati lockdown news: Amravati Lockdown: अमरावती, अचलपुरात लॉकडाऊन वाढवला; ‘हे’ शहरच कंटेन्मेंट झोन! – lockdown in amravati achalpur extended till march 8

हायलाइट्स:अमरावती विभागात अनेक शहरांत करोनाचे थैमान.अमरावती व अचलपूरमध्ये लॉकडाऊन वाढवला.नागपुरातील स्थिती गंभीर, लॉकडाऊन लावला जाण्याची शक्यता.अमरावती: विदर्भात सध्या अमरावतीमध्ये करोनाने थैमान घातले असून...

Recent Comments