Home शहरं सातारा satara News : ‘सर्वांच्या एकजुटीतून करोनाला रोखण्यात यश’ - 'success in stopping...

satara News : ‘सर्वांच्या एकजुटीतून करोनाला रोखण्यात यश’ – ‘success in stopping corona from the unity of all’


‘सर्वांच्या एकजुटीतून

करोनाला रोखण्यात यश’

सातारा :

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या लॉकडाउनसह सर्व उपाययोजनांमध्ये शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांचे एकमत असल्याने किंबहुना त्यांची एकजुट खंबीर असल्यानेच शहर व तालुक्यात करोना पोहोचू शकला नाही. आता बाहेर गावाहून येथे वास्तव्यास येणाऱ्या लोकांसह ही एकजुट अभेद्य ठेवून या तालुक्यात करोनाला प्रवेश करू न देण्याचा निर्धार सर्वजण एक विचाराने करू या, असे आवाहन आमदार दीपक चव्हाण यांनी केले आहे.

फलटण शहरात एका परिचारिकेला झालेली करोनाची बाधा, निश्‍चितपणे आपल्या एकजुटीला छेद देणारी आहे. अन्य चार रुग्ण आपल्या तालुक्यातील असले तरी त्यांना करोनाने बाहेरगावी गाठले. आता बाहेरगावाहून येथे येणाऱ्या लोकांना सामावून घेताना त्यांना नियम, निकष समजावून देऊन त्यांची पूर्व आरोग्य तपासणी करूनच सामावून घेतले जाणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

…………..

संभाजीराजेंची जयंती

साधेपणाने साजरी

सातारा :

छत्रपती संभाजीराजे यांची जयंती सातारा शहरासह जिल्ह्याच्या विविध भागातील शंभू भक्तांनी साधेपणाने साजरी केली. दर वर्षी सातारा शहरात मैत्री प्रतिष्ठान छत्रपती संभाजीराजे यांची जयंती साजरी करते. यंदा लॉकडाउन असल्याने साधेपणाने भक्तीपूर्ण, अशी साजरी करण्यात आली. शाहू चौकात स्व. अभयसिंहराजे भोसले उद्यानात असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या शिल्पाकृतीला कृष्णा नदीचे संगममाहुली येथून पाणी आणून अगोदर जलाभिषेक करण्यात आला. त्या नंतर दुग्धअभिषेक करण्यात आला. या वेळी मैत्री प्रतिष्ठानचे हर्षल चिकणे, ओंकार शिंदे, सुमित गवळी, आकाश जगताप, प्रवीण सावंत, प्रथमेश कानडे यांनी घोषणा देत साजरी केली. दिवस भर छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या जात होत्या.

श्रीमंत मालोजीराजे

यांना अभिवादन

भूतपूर्व फलटण संस्थानचे अधिपती श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांचा ४२वा स्मृतिदिन साधेपणाने साजरा झाला. आमदार दीपक चव्हाण, बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, स्मृती प्रतिष्ठानचे सेक्रेटरी प्राचार्य विश्‍वासराव देशमुख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीमंत मालोजीराजे नाईक-निंबाळकर राजेसाहेब यांच्या अधिकार गृहासमोरील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. प्रतिवर्षी श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा लॉकडाउनमुळे स्मृती महोत्सव स्थगित करण्यात आला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mumbai Indians: IPL 2021: मुंबई इंडियन्सने या अनुभवी खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता; जाणून घ्या संपूर्ण यादी – ipl 2021 mumbai indians released lasith malinga...

नवी दिल्ली: IPL 2021 आयपीएलचे सर्वाधिक विजेतेपद मिळवणारे तसेच विद्यमान विजेते मुंबई इंडियन्स (mumbai indians) संघाने या वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी रिटेन आणि रिलीझ...

रिया चक्रवर्ती: वांद्र्यात फुलं विकत घेताना दिसली रिया चक्रवर्ती, यूझर म्हणाले- ‘सुशांतच्या वाढदिवसाचा ड्रामा सुरू झाला’ – rhea chakraborty requested to not follow her

मुंबई- सुशांतसिंह राजपूत याच्या निधनानंतर बर्‍याच आरोपांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात ती वांद्रे येथे सर्वसामान्यांप्रमाणे...

jalgaon district: ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा; ५ जणांची कारागृहात रवानगी – collector take action against gram sevaks in jalgaon district

म. टा. प्रतिनिधी, जळगावः पदभार सोडूनही ग्रामपंचायतीचे दप्तर देण्यास टाळाटाळ करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील ८ ग्रामसेवकांना ही दप्तर दिरंगाई चांगलीच महागात पडली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी...

Recent Comments