Home देश satyendar jain: दिल्लीचे आरोग्य मंत्री व्हेंटिलेटरवर, करोनाने न्युमोनिया वाढला - covid19 positive...

satyendar jain: दिल्लीचे आरोग्य मंत्री व्हेंटिलेटरवर, करोनाने न्युमोनिया वाढला – covid19 positive delhi health minister satyendar jain put on oxygen support after his lung infection increases


नवी दिल्लीःकरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांच्या फुफ्फुसात करोनाचा संसर्ग अधिक वाढल्याने त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे. दिल्लीच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. सत्येंद्र जैन हे बुधवारी करोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. सत्येंद्र जैन लवकर करोनामुक्त व्हावेत, अशी प्रार्थना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलीय. दरम्यान, जैन यांना साकेत येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येणार आहे. तिथे त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपी करण्यात येणार आहे, असं वृत्त एएनआयने दिलं आहे.

करोना पॉझिटिव्ह असलेल्या सत्येंद्र जैन यांच्यावर दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गुरुवारी त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा दिसून आली होती. पण त्यांचा ताप कमी झाला नव्हता. ५५ वर्षांच्या सत्येंद्र जैन यांच्या फुफ्फुसात करोनाचा संसर्ग वाढला आहे. यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. जैन यांच्या अनुपस्थितीत उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया हे त्यांच्या मंत्रालयाचे कामकाज पाहात आहेत. सत्येंद्र जैन बरे होऊन परतल्यानंतर ते काही कालावधीसाठी बिना खात्याचे मंत्री राहतील.

जैन यांना न्युमोनिया झाला आहे. हा न्युमोनिया वाढला आहे. सीटी स्कॅनमध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यांना चक्कर येताहेत आणि थकवा जाणवत आहे. तज्ज्ञ डॉक्चरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.

अमित शहांचे ट्विट

सत्येंद्र जैन यांच्यावर दिल्लीत उपचार करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट केलंय. करोनाचा सामना करत असलेले सत्येंद्र जैन हे लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना आहे, असं शहा यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

coronavirus updates: देशात २४ तासांत वाढले १३,५८६ रुग्ण, दिवसातील विक्रमी वाढ

पाकिस्तानला हादरवणारं विमान लडाखमध्ये तैनात

बुधवारी चाचणीत आढळले करोना पॉझिटिव्ह

सत्येंद्र जैन यांचा ताप वाढला आणि शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना मंगळवारी राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. करोनाचे लक्षणं दिसून येत असल्याने सत्येंद्र जैन यांची मंगळवारी करोनाचा करण्यात आली. हा रिपोर्ट निगेटिव्ह आला. पण बुधवारी पुन्हा करोनाची चाचणी केली गेली. त्यात ते पॉझिटिव्ह आढळून आले. यानंतर जैन यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

दिल्लीतील करोनाची आकडेवारी पाहा

देशात करोना रुग्णसंख्येत महाराष्ट्र, तामिळनाडूनंतर दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीत आज सकाळपर्यंत करोना रुग्णांची एकूण संख्या ४९,९७९ वर पोहोचलीय. यापैकी २६, ६६९ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर २१,३४१ जण करोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत करोनाने एकूण १९६९ जणांचा मृत्यू झाला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus in pune latest news: Coronavirus In Pune: पुण्यात पुन्हा निर्बंध लावायचे की नाहीत?; अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष – ajit pawar will take final...

हायलाइट्स:करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यात निर्बंध लावणार?विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणार महत्त्वाची बैठक.आढावा बैठकीतील तपशील घेतल्यावर अजित पवार देणार अंतिम निर्णय.पुणे: करोना संसर्गाचा...

Recent Comments