Home विदेश saudi arabia women armed forces: Saudi Arabia सौदी अरेबियाचा मोठा निर्णय; लष्करात...

saudi arabia women armed forces: Saudi Arabia सौदी अरेबियाचा मोठा निर्णय; लष्करात मिळणार महिलांना प्रवेश – saudi arabia ministry of defense announced women can join armed forces


रियाध: कट्टरवादी इस्लामिक कायद्यांसाठी ओळखल्या सौदी अरेबिया सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियाच्या लष्करात आता महिलांनाही प्रवेश दिला जाणार आहे. भूदल, नौदल आणि हवाई दलासह रॉयल स्ट्रेटेजिक मिसाइल फोर्स आणि वैद्यकीय सेवेत महिलांची भरती करण्यात येणार आहे. सौदी अरेबिया सरकारचा निर्णय महत्त्वाचा समजला जात आहे.

सौदी संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महिलाही लष्करी सेवेत भरती होण्यासाठी अर्ज करण्यास पात्र असणार आहे. सैनिक, लान्स नायक, नायक, सार्जेंट आणि स्टाफ सार्जेंट पदासाठी महिलांची भरती करण्यात येणार आहे. क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या ‘व्हिजन २०३०’ च्या धोरणानुसार सौदी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. क्राउन प्रिन्स सौदी अरेबियातील महिलांना विविध क्षेत्रात संधी देण्याचे धोरण अवलंबत आहेत.

वाचा: इलेक्ट्रीक शॉक, लैंगिक छळ; हजार दिवसांनंतर लुजेनची सौदीच्या तुरुंगातून सुटका

सौदी अरेबियातील २१ ते ४० या वयोगटातील महिलांना लष्करात सहभागी होण्यासाठीची संधी मिळणार आहे. सरकारी सेवेत असलेल्या महिलांना अर्ज करता येणार नाही. वैद्यकीयदृष्ट्या सक्षम आणि कोणताही गुन्हा दाखल नसलेल्या महिलांना अर्ज करता येणार आहे.

वाचा: वाहने नसणार, रस्तेही नसणार; सौदी अरेबिया वसवणार आधुनिक नवीन शहर

सौदी अरेबिया सरकारने या योजनेची घोषणा वर्ष २०१९ मध्ये केली होती. सौदी अरेबिया महिलांसाठी विविध क्षेत्र खुलं करत असल्याचे चित्र असले तरी महिला अधिकार कार्यकर्ती लुजैन अल हथलौलला सहा वर्षांसाठी तुरुंगात डांबले होते. काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय दबावानंतर तिची सुटका करण्यात आली. जवळपास एक हजार दिवसांचा तुरुंगवास तिने भोगला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

औरंगाबाद : विनयभंगप्रकरणी तीन आरोपी अटकेत

म. टा. प्रतिनिधी, कोचींग क्लासेसहून आपल्या घरी चाललेल्या एका करणाऱ्या तीन जणांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. ऋषीकेश पालोदकर (२२, रा. पुंडलिकनगर), शुभम...

Mithun Chakraborty Joins BJP: कोलकात्यात PM मोदींची सभा; अभिनेते मिथुन चक्रवर्तींचा भाजपमध्ये प्रवेश – actor mithun chakraborty joins bharatiya janata party at pms rally...

कोलकाताः पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोलकात्यातील ब्रिगेड मैदानावर जंगी सभा होत आहे. विशेष म्हणजे या सभेला भाजप नेत्यांसोबत ज्येष्ठ अभिनेते...

मेडिकल कॉलेजवरून मुख्यमंत्र्यांचा राणे यांना टोला, म्हणाले…

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'आपण सत्ताधारी आहोत. आपल्या पक्षाचा प्रमुख राज्याचा मुख्यमंत्री आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपल्यासोबत आहे. आपली सत्ता असूनही तुम्ही काहीही...

Ahmednagar: नगर: अपहरणानंतर सहा दिवसांनी ‘त्या’ उद्योजकाचा मृतदेह सापडला – ahmednagar missing businessman found dead near shrirampur midc area

नगर: श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथून सहा दिवसांपासून अपहरण झालेल्या गौतम झुंबरलाल हिरण या व्यावसायिकाचा मृतदेह श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात रेल्वेमार्गाच्या कडेला रविवारी सकाळी आढळून...

Recent Comments