देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) त्यांच्या ग्राहकांना एक अलर्ट पाठवला आहे. एसबीआयने असं म्हटलं आहे की, आमचे कर्तव्य आहे की ऑनलाइन फसवणुकीपासून आम्ही ग्राहकांना सुरक्षित ठेवू.
नवी दिल्ली, 18 मे : देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) त्यांच्या ग्राहकांना एक अलर्ट पाठवला आहे. एसबीआयने असं म्हटलं आहे की, आमचे कर्तव्य आहे की ऑनलाइन फसवणुकीपासून आम्ही ग्राहकांना सुरक्षित ठेवू. त्यामुळे बँकिंग संदर्भात काही टिप्स एसबीआयने ग्राहकांना दिल्या आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही ऑनलाइन फ्रॉडपासून वाचू शकता. ही खबरदारी घेतल्यास तुम्ही खूप मोठ्या ऑनलाइन फसवणुकीपासून वाचू शकता आणि त्यामुळे तुमचे पैसे देखील वाचतील. एसबीआयने यासंदर्भात एक ट्विट देखील केले आहेत.
एसबीआयने ग्राहकांना दिला हा संदेश
प्रिय ग्राहक,
हे आमचे कर्तव्य आहे की आम्ही तुम्हाला ऑनलाइन फ्रॉडचे शिकार होण्यापासून वाचवू. इथे बँकिंग संबंधित काही खबरदारी इथे देण्यात आल्या आहेत त्यांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
(हे वाचा-‘प्रवासी मजुरांबाबत राजकारण नको’,अर्थमंत्र्यांचा राहुल, सोनिया गांधींवर हल्लाबोल)
-हे आवश्यक आहे की तुम्ही नियमांचे पालन कराल आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीबरोबर तुमचे वैयक्तिक बँकिंग डिटेल्स शेअर करणार नाही
आपका कभी नुकसान ना हो और आपके साथ कोई घोटाला ना हो, इसी को ध्यान मे रखते हुए आपके लिए हमारा एक सन्देश | pic.twitter.com/COdidRAqe8
— State Bank of India (@TheOfficialSBI) May 13, 2020
-ईएमआय, डीबीटी किंवा पंतप्रधान केअर फंड किंवा कोणत्याही केअर फंड संबधात ओटीपी मागणाऱ्या कोणत्याही अनौपचारीक लिंकवर क्लिक करू नका.
-जाहिरातींच्या माध्यमातून लॉटरी, रोख रक्कम किंवा नोकरीचं आमिष देणाऱ्या बनावट योजनांपासून सावधानता बाळगा.
-बँकेशी संबधित विविध गोष्टींचा पासवर्ड वेळोवेळी बदलत राहा.
-ही गोष्ट लक्षात ठेवाल की, कोणताही एसबीआय प्रतिनिधी त्यांच्या ग्राहकांकडे त्यांची वैयक्तिक माहिती, पासवर्ड, उच्च सुरक्षा पासवर्ड किंवा ओटीपीसाठी मेल/एसएमएस पाठवत नाहीत.
संकलन, संपादन – जान्हवी भाटकर
First Published: May 18, 2020 11:17 AM IST