Home देश पैसा पैसा SBI, ICICI Bank Cut Interest Rates On Saving Aacounts - 'एसबीआय', 'आयसीआयसीआय'...

SBI, ICICI Bank Cut Interest Rates On Saving Aacounts – ‘एसबीआय’, ‘आयसीआयसीआय’ बँकेची बचतीवरील व्याजाला कात्री


वृत्तसंस्था, मुंबई : भारतीय स्टेट बँकेने (SBI) बचत खात्यातील रकमेवर देण्यात येणाऱ्या व्याजदरात ०.०५ टक्के कपात केली आहे. त्याचप्रमाणे खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेनेही बचत खात्यावरील व्याज ०.२५ टक्के अर्थात पाव टक्क्याने कमी केले आहे.

यामुळे स्टेट बँकेच्या बचत खात्यात असलेल्या रकमेवर आता २.७५ टक्क्यांऐवजी २.७० टक्के व्याज मिळणार आहे. ही व्याजदरकपात सर्व प्रकारच्या बचत खात्यांसाठी (Saving Account interest rate cut) करण्यात आली आहे. नवा व्याजदर ३१ मेपासून लागू करण्यात आल्याचे बँकेच्या वेबसाइटवर नमूद करण्यात आले आहे. बचत खात्यातील रकमेवर व्याज देण्यासाठी स्टेट बँकेने दोन टप्पे ठरवले आहेत. एक लाख रुपयांपर्यंत रक्कम खात्यात असणे आणि एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम खात्यात असणे. यापूर्वी एप्रिल महिन्यात बँकेने बचत खात्यावरील व्याजदर ३ टक्क्यांवरून पाव टक्का कमी करून २.७५ टक्के केले होते.

आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) बचत खात्यातील ५० लाख रुपयांहून कमी रकमेवर मिळणारे व्याज पाव टक्का घटवत ३.७५ टक्क्यांवरून ३.५० टक्के केले आहे. नवा व्याजदर गुरुवारपासून लागू होणार आहे.

नुकताच ‘SBI’ने सर्वच मुदतीच्या ठेवींवरील व्याजदर कमी केला होता.७ ते ४५ दिवसांसाठीच्या ठेवींवरील व्याजदरात ०.४० टक्के कपात करून तो २.९ टक्के केला आहे. ज्येष्ठ नागरिकांना आता या कालावधीसाठी ३.४ टक्के व्याज मिळेल. याआधी ३.८ टक्के व्याज मिळत होते.१ वर्ष ते २ वर्ष कालावधीच्या मुदत ठेवीवर आता ठेवीदारांना ५. १ टक्के व्याज मिळेल. तर ३ वर्ष ते ५ वर्ष मुदतीच्या ठेवीवर ५.३ टक्के व्याज मिळेल. ५ वर्षांहून अधिक आणि १ वर्षांहून कमी कालावधीच्या ठेवींवर ५.४ टक्के व्याज मिळेल, असे बँकेनं म्हटलं आहे. याआधी १२ मे रोजी एसबीआयने तीन वर्ष मुदतीपर्यंतच्या ठेवींवरील व्याजदर ०.२० टक्क्याने कमी केला होता.या कपातीचा सर्वाधिक फटका अल्पमुदतीच्या ठेवींना बसणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही ठेवींवर कमी व्याज मिळणार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

LIVE : पुन्हा राजकीय ठिणगी पेटणार, उद्धव ठाकरेंची मुलाखत लवकरच होणार प्रसारित

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स Source link

Nashik News : …अन् यशवंतराव चव्हाण नाशिकमध्ये पायी फिरले! – when yashwantrao chavan visited nashik in 1965

'हिमालयाच्या मदतीला धावलेला सह्याद्री' असे ज्यांचे वर्णन केले जाते ते देशाचे संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण नाशिकमधून चक्क पायी फिरले होते! देशाच्या संरक्षणाची धुरा आपल्या...

Rohit Sharma: India vs Australia : रोहित शर्माची फिटनेस टेस्ट नेमकी होणार तरी कधी, जाणून घ्या तारीख.. – india vs australia : rohit sharma’s...

मुंबई : सध्याच्या घडीला सर्वांचेच लक्ष रोहित शर्माच्य फिटनेस टेस्टकडे लागलेले आहे. कारण जोपर्यंत रोहित ही टेस्ट पास होत नाही, तोपर्यंत त्याला ऑस्ट्रेलियाच्या...

bollywood news News : इतकंच असेल त्यानं माझं नाव लावू नये; जानच्या आरोपांमुळे कुमार सानू नाराज – kumar sanu suggests son jaan kumar sanu...

मुंबई: बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर जान सानू यानं वडिल कुमार सानू यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांनी वडिल म्हणून माझी कोणतीही जबाबदारी पार...

Recent Comments