Home देश SC disposes off petition against name india: घटनेतील 'इंडिया' नावाला विरोध करणारी...

SC disposes off petition against name india: घटनेतील ‘इंडिया’ नावाला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली – india name to change as bharat matter supreme court disposes off petition and ask to go to appropriate ministry


नवी दिल्ली: भारतीय राज्यघटनेच्या कलम १ मध्ये नमूद असलेले देशाचे ‘इंडिया’ हे नाव बदलून फक्त ‘भारत’ इतकेच ठेवण्याबाबत केलेल्या याचिकेच्या याचिकाकर्त्यांना सुप्रीम कोर्टात धक्का बसला आहे. याचे कारण म्हणजे सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. या याचिकेची प्रत संबंधित मंत्रालयाला पाठवावी, त्यावर संबंधित मंत्रालय निर्णय घेईल, असे कोर्टाने म्हटले आहे.

केंद्र सरकारला सूचना करण्याची विनंती

यापूर्वी मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी होणार होती. पण त्यानंतर ती सुनावणी आज बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आली. भारतीय राज्यघटनेत बदल करून आणि इंडिया हा शब्द काढून टाकून त्याजागी हिंदुस्तान किंवा भारत असे करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले जावेत, असे सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते. राज्यघटनेत भारत हा शब्द जोडणे आपल्या राष्ट्रीयतेसाठी आवश्यक असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले होते.

राज्यघटनेच्या कलम १ मध्ये बदल करण्यात यावा असे, सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे. इंडिया हे नाव याच कलमाअंतर्गतच येते. त्यात इंडिया नावाऐवजी भारत किंवा हिंदुस्थान असे नमूद करण्यात यावे असे याचिकेत म्हटले आहे. कलम १ मध्ये इंडिया या शब्दाचा उल्लेख असून ब्रिटीशांचे शासन संपुष्टात आल्यानंतर इंडिया हे इंग्रजी नाव बदलून भारत असे ठेवले पाहिजे, असे याचिकेत म्हटले आहे. भारताची ओळख निश्चित करण्यासाठी कलम १ मध्ये बदल केला पाहिजे. त्यासाठी इंडिया हे नाव बदलून भारत असे नाव नोंदवले जावे, अशी याचिकेत मागणी करण्यात आली होती.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

America: आवश्यक दिलासा – green card eligibility categories and indian citizens

अमेरिकेत अनेक वर्षे राहून काम करणाऱ्या हजारो भारतीयांना, त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आणि अतिशय आवश्यक असणारा दिलासा अमेरिकी सिनेटने दिला आहे.  Source link

ranjitsinh disale: रणजितसिंह डिसले यांचे अभिनंदन – cm uddhav thackeray congratulates global teacher winner ranjitsinh disale

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई युनेस्को आणि लंडन येथील वार्की फाऊंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...

Recent Comments