Home शहरं नाशिक scared from coronavirus: करोनाची भीती वाटतेच, पण करणार काय? - scared from...

scared from coronavirus: करोनाची भीती वाटतेच, पण करणार काय? – scared from coronavirus, but what to do


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

करोनामुळे जिवाला धोका आहे. पण तरी सगळ्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावले जाते. त्यामुळे कार्यालयात सुरक्षित वावराचे नियम पाळणे शक्य होत नाही. दिवसभर चारशे ते पाचशे ग्राहक बँकेत येतात. कितीही काळजी घेतली तरी त्यांच्याशी संपर्क येतोच. पण करणार काय? आधीच कंपनीने टार्गेट दुप्पट केले आहेत, त्यात करोनाची भीती. काम केल नाही तर नोकरी गेलीच म्हणून समजा?, अशी अगतिकता आहे खासगी बँक कर्मचाऱ्याची. थोड्याबहुत फरकाने खासगी बँकांतील सर्वच कर्मचाऱ्यांची हीच अवस्था आहे.

दोन दिवसांपूर्वी एका मोठ्या खासगी बँकेच्या गंगापूर रोडवरील शाखेतील काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे या बँकेच्या शहरातील इतरही शाखांमधील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नाशिकमध्ये मोठ्या खासगी बँकांसह कर्जे वितरित करणाऱ्या वित्तीय संस्थांच्या शेकडो शाखा आहेत. यात काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांची हीच स्थिती आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका कर्मचाऱ्याने आपबिती ‘मटा’कडे मांडली.

फक्त १५ टक्के स्टाफ कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक असताना स्थानिक अधिकारी टार्गेट पूर्ण करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावून घेतात. कार्यालयात थर्मल स्क्रीनिंगचे सोपस्कार पूर्ण पाडले जात असले तरी त्यामुळे एखाद्याला करोना आहे की नाही, हे कसे समजणार? बँकेत कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित अंतर पाळले जात नाही, तसे शक्यही नाही. दररोज साडेचारशे ते पाचशे ग्राहक बँकेत येतात. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्यांचा स्पर्श होतोच. खुर्ची, कागदपत्रे, बँकेतील फर्निचर यांना ग्राहकांचे हात लागतातच. लॉकडाउन काळात बँकेची वेळ चार वाजेपर्यंत होती. परंतु, आता सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसात अशी करण्यात आली आहे. काम संपता संपता रात्रीचे साडेआठ किंवा नऊ पण वाजतात. दिवसभरात कामाचे प्रचंड प्रेशर असते. घडोघडी वरिष्ठांना रिपोर्ट द्यावे लागतात. वरून त्यांची बोलणी खावी लागतात. प्रचंड डिप्रेशन येतं, पण करणार काय? विरोध केला तर नोकरी हातची जाण्याची भीती आहे. डिप्रेशनमुळे डोके दुखणे, अॅसिडिटीसारखे आजार कायम होतात. अगदी जीव नको नकोसा होऊन जातो. परंतु, नोकरी टिकविण्यासाठी हे सर्व सहन करावंच लागतं, अशी अगतिकता या कर्मचाऱ्याने व्यक्त केली.

मार्केटिंग करणाऱ्यांचे हाल

बाहेर फिरून ग्राहक मिळविण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही प्रचंड हाल आहेत. ग्राहकांचा फोन आला की त्यांना भेटायला जावे लागते. ग्राहकांना करोनाची लागण झालेली असेल किंवा ते विषाणूचे वाहक असतील तर कर्मचाऱ्यांनाही ती होण्याची भीती आहे. सॅनिटायझरचा वापर करूनही फारसा उपयोग होत नाही, असे दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितले. खाती उघडणे, होमलोन, पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड शाखांमध्ये कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा धोका जास्त असल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

– खासगी बँक कर्मचाऱ्यांची अगतिकता

– ग्राहकांशी थेट संपर्कामुळे करोनाची धास्तीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

बुद्धिवान कलांवत :श्रीकांत मोघे

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या अल्याड-पल्याड ज्या कलावंतांनी सांस्कृतिक महाराष्ट्र घडवला, मध्यमवर्गीयांच्या अभिरुचीला आकार दिला, त्या लेखक-दिग्दर्शक-कलावंतांच्या मांदियाळीतील एक अस्सल मोहरा म्हणजे . शहरी-ग्रामीण दोन्ही...

maharashtra budget 2021: राज्यासमोर आर्थिक संकट; ठाकरे सरकारपुढे आव्हान – maharashtra budget session 2021 : ajit pawar will submits the budget in the assembly

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोना संसर्गाची धास्ती आणि टाळेबंदीमुळे गेले वर्षभर सामान्यांची घडी विस्कटली असून त्याचा परिणाम म्हणून राज्याचा महसूल घटला आहे....

Recent Comments