Home देश schools in haryana: शाळा सुरू करणारं हे आहे देशातील पहिलं राज्य! पण...

schools in haryana: शाळा सुरू करणारं हे आहे देशातील पहिलं राज्य! पण निर्णयावर प्रश्न उपस्थित – schools to reopen from july 27 in haryana after summer vacations end


चंदिगडः देशातील करोना रुग्णांची संख्या एकीकडे सहा लाखांवर गेलीय. तसंच दिल्लीतील करोना रुग्णांची संख्याही ९० हजारांच्या जवळ गेली आहे. अशा स्थितीत दिल्लीला लागून असलेल्या हरयाणामध्ये राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २७ तारखेपासून शाळा सुरू करण्याचे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या या १ जुलैपासून सुरू झाल्या असून त्या २६ जुलैपर्यंत असणार आहेत. या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर २७ जुलैपासून शाळा सुरू होतील, असं शालेय शिक्षण संचालनालयानं म्हटलं आहे.

हरयाणाच्या शालेय शिक्षण संचालनालयाने जारी केलेला आदेश एनएनआय वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटवर हँडवरून शेअर केला आहे. २७ जुलैपासून शाळा सुरू होत आहेत. विद्यार्थी आणि पालकांनी यासाठी तयारी करावी, असं आदेशात नमुद करण्यात आलं आहे.

१ जुलै ते २६ जुलैपर्यंत शाळांना उन्हाळी सुट्टी घोषित करण्यात आली आहे. त्यानंतर शाळा पुन्हा सुरू होतील, असं हरयाणाच्या शालेय शिक्षण संचालनालयाचे अतिरिक्त सचिव यांनी जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे. हरयाणा सरकारच्या हा निर्णय अनेक राज्यांपासून वेगळा असून केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशाच्या विरुद्ध आहे. या निर्णयाने राज्यातील जवळपास ५२ लाख विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ शकतो.

देशात करोना रुग्णसंख्या ६ लाखांवर, पाच दिवसांत १ लाखावर नवे रुग्ण

प्रियांका गांधींचे सत्ताधारी भाजपला उत्तर, आता इथे राहायला जाणार?

केंद्र सरकारने १ जुलैपासून अनलॉक-२ च्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार केंद्र सरकारच्या आदेशाशिवाय शाळा, कॉलेजे सुरू करू नयेत, असं केंद्रीय गृहमंत्रलायाने या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमुद केलंय. करोना व्हायरसच्या संसर्गामुळे उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांनी ३१ जुलैपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर ओडिशा सरकारने त्याही पुढे जाऊन ३१ ऑगस्टपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. महाराष्ट्रातही ३१ जुलैपर्यंत शाळा, कॉलेजेस बंद राहणार आहेत.

‘कोरोनिल रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे, पण ते करोनावरील औषध नाही’Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Bharatpe Launches Digital Gold – आता अॅपवरून खरेदी करा सोने; ‘भारतपे’ने सादर केले ‘डिजिटल गोल्ड’

मुंबई : भारतातील सर्वात मोठी मर्चंट पेमेंट कंपनी भारतपे ने आज आपल्या प्लॅटफॉर्मवर 'डिजिटल गोल्ड' ची घोषणा केली. फिनटेक उत्पादनाच्या या नवीन कॅटेगरीचे...

CSK vs KKR: IPL 2020: राणा दा जिंकलंस… नितिशच्या अर्धशतकाच्या जोरावर केकेआरचे चेन्नईपुढे मोठे आव्हान – ipl 2020: kolkata night riders given 173 runs...

आबुधाबी: नितिश राणाने यावेळी धडाकेबाज फलंदाजी करत सर्वांचीच मने जिंकून घेतली. कोलकाता नाइट रायडर्सचे फलंदाज एकामागून एक अपयशी ठरत असताना राणाने झुंजार अर्धशतकी...

Recent Comments