Home टेकनॉलॉजी पॅक ऑनलाईन जग science technology News : ‘बॉइज लॉकर रूम’ची चावी तरुणाईकडे! - youngsters have...

science technology News : ‘बॉइज लॉकर रूम’ची चावी तरुणाईकडे! – youngsters have the key to ‘boys locker room’!


काही दिवसांपूर्वी दिल्लीत बॉइज लॉकर रूम या इन्स्टा ग्रुप चॅटचं प्रकरण समोर आलं. यानिमित्तानं आजची पिढी नेमक्या कोणत्या बाजूनं चालली आहे हे तपासण्याची वेळ आहे.

ओंकार गंधे

matatechkatta@gmail.com

मुलामुलींमधील वाढती अश्लीलता हा अनेक पालकांच्या काळजीचा विषय बनला आहे. हल्ली सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या पोस्ट सातत्यानं व्हायरल होताना दिसतात. अशा पोस्टना मुलं सहज बळी पडतात. अशाच एका इन्स्टाग्राम ग्रुपनं सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत मोठा धूमाकूळ घातला आहे. त्यामुळे पालकांनी मुलांच्या सोशल मीडियावरील प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अन्यथा, त्याची फार मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे.

पालकांनो, तुमचे तुमच्या पाल्यांकडे लक्ष आहे का? दोन आठवड्यांपूर्वी बॉइज लॉकर रूम (Bois Locker Room) हा विषय खूप चर्चेत आला. बॉइज लॉकर रूमबाबत अनेक उलटसुलट चर्चांनाही तोंड फुटले. अनेक प्रसारमाध्यमांनीही कोणतीही शहानिशा न करता त्यावर बातम्या चालवल्या.

नक्की काय आहे बॉइज लॉकर रूम ?

‘बॉइज लॉकर रूम’ हे एक इन्स्टाग्राम अकाउंट होतं. हे अकाउंट दिल्लीमधील एका हाय प्रोफाइल शाळेतील काही मुलांनी सुरू केलं होतं. त्याचा ‘अॅडमिन’ (ते अकाउंट तयार करणारा) मुलगा याच वर्षी बारावीला होता. ‘बॉइज लॉकर रूम’ हे खासगी इन्स्टाग्राम अकाउंट असल्यानं त्यावर केवळ मर्यादित मुलांनाच प्रवेश होता. स्वतःची खरी ओळख समोर येऊ नये यासाठी ‘अॅडमिन’कडून सर्वांना आपापलं फेक अकाउंट वापरण्यास सांगण्यात आलं होतं.

‘बॉइज लॉकर रूम’चा आशय काय होता?

– ‘बॉइज लॉकर रूम’वर मोठ्या प्रमाणात अश्लीलता पसरवली जात होती. विविध माध्यमातून मुलींचे फोटो मिळवले जात होते. सध्या इन्स्टाग्राम, फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपवर अगदी अल्पवयीन मुलींनी अनेक फोटो टाकलेले असतात, तिथूनच हे फोटो मिळवले जात असत.

– ते फोटो एडिट करून, मॉर्फ करून अश्लील बनवले जात आणि त्या नंतर ते फोटो ‘बॉइज लॉकर रूम’ वर टाकले जात असत.

– त्या फोटोंवर अत्यंत घाणेरड्या स्वरूपाची शेरेबाजी केली जाई आणि कमेंट्समध्ये सर्वांत जास्त अश्लील कोण बोलू शकतं, याची जणू स्पर्धाच लागलेली असायची.

– त्यानंतर जो प्रकार सुरू होई, तो सर्वांत भयानक असे. त्या मुलीवर सामूहिक बलात्कार कसा करता येईल, या बाबतच्या चर्चाही त्यावर केल्या जात असत.

– अल्पवयीन मुलांची माथी भडकावणे आणि त्यांना बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यास प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी सातत्यानं ‘बॉइज लॉकर रूम’वर बोलल्या जात होत्या.

हे सर्व प्रकरण उघडकीस आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सर्व मुलांना शोधून त्वरित ताब्यात घेतलं. सर्वांचे मोबाइल जप्त करण्यात आले. सर्व मुले १३ ते १८ या वयोगटांतील होती. पोलिसांचा अजूनही तपास सुरूच आहे. त्यातील अनेक मुलांना आपण पकडले जाणार आहोत, हे समजलं होतं, तरीही त्यांनी कशाचीही फिकीर न बाळगता हे उद्योग केले होते.

हे प्रकरण इथंच थांबलं का?

नाही. ‘बॉइज लॉकर रूम २’ या नावानं पुन्हा एक अकाउंट सुरू झालं. मग, इस्टाग्रामनं ते बंद पाडलं. ‘गर्ल्स लॉकर रूम’ या नावानंही अनेक अकाउंट सुरू केले. विविध हॅशटॅग्सचा वापर करून अश्लील फोटो टाकले गेले. यात मुलीही मागं नाहीत. ‘बॉइज लॉकर रूम’ प्रकरण इतक्यात थांबेल असं वाटत नाही आणि या गोष्टीला मुले जेवढी जबाबदार आहेत, तेवढेच त्यांचे पालकही जबाबदार आहेत.

भविष्यात धोका कोणता?

‘बॉइज लॉकर रूम’सारखे प्रकार हे केवळ अश्लीलता पसरवणारे नसून, त्यातून बलात्कारासारखे गंभीर गुन्हे घडू शकतात. तशी मानसिकता अल्पवयीन मुलामुलींमध्ये तयार व्हावी, हाच उद्देश अशा प्रकारांमागचा असतो. शाळेत जाणारी अल्पवयीन मुलं-मुली यात मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत.

मुलामुलींनी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे?

विविध प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडून अल्पवयीन मुलं-मुली अशा प्रकरणांमध्ये अडकतात. यामध्ये आर्थिक, मानसिक किंवा शारीरिक नुकसान होऊ शकते. तसंच कायद्यानुसार मोठी शिक्षा होईल ती वेगळीच. त्यामुळे अशा गोष्टींपासून चार हात लांब राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तसंच, गरज नसल्यास स्मार्टफोन वापरू नये. सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्यावी, जेणेकरून आपल्याला किंवा आपल्या पालकांना भविष्यात त्रास होणार नाही. तसंच, कधीही कोणत्याही प्रकारची अडचण वाटल्यास त्वरित आपल्या पालकांना कळवले पाहिजे.

पालकांनी कोणती काळजी घ्यावी?

१. आपल्या पाल्यांना गरज असेल तरच मोबाइल द्यावा. महागडे स्मार्टफोन देण्याबाबत शंभर वेळा विचार करावा. (कर्ज वगैरे काढून मोबाइल देणं, तर टाळावं.)

२. आपला मुलगा किंवा मुलगी मोबाइलमध्ये काय करतात, याची पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे.

३. आपला पाल्य कोणकोणत्या सोशल मीडियावर आहे, तिथे मित्र-मैत्रिणी कोण आहेत, त्यांच्याशी कोणत्या प्रकारचे संभाषण चालते, यावर बारीक लक्ष ठेवावे.

४. वेळोवेळी आणि अचानक मोबाइल चेक करावा.

५. सर्व सोशल मीडिया अॅप्स, गॅलरी, मेसेज, कॉल्स चेक करावे. कोणत्याही प्रकारचे पिन पासवर्ड मोबाइलला असल्यास त्याबद्दलही माहिती घ्यावी.

६. कोणताही अनुचित प्रकार घडतो आहे, असे वाटल्यास त्वरित जवळच्या पोलिस स्टेशन किंवा सायबर पोलिसांची मदत घ्यावी. अधिक माहिती साठी सायबर एक्सपर्ट्सशी संपर्क साधावा.

एक छोटी चूक आयुष्यात खूप मोठी शिक्षा देऊन जाते. शेवटी आपली सायबर सुरक्षा आपल्याच हातात असते.

(लेखक सायबर सुरक्षा विश्लेषक आहेत.)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Bill Gates: हे कसं घडलं? बिल गेट्स ठरले अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी! – bill gates became americas biggest farmer bought 242,000 acres land

वॉशिंग्टन: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स हे अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी झाले आहेत. बिल गेट्स यांनी अमेरिेकेतील १८ राज्यांमधील दोन लाख ४२ हजार एकर...

What is Honey Trap?: Explainer: हनी ट्रॅप म्हणजे काय? – what does it mean by honey trap?

मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. मुंडे हे विरोधकांच्या निशाण्यावर आले...

Anna Hazare: अण्णा हजारेंचं आंदोलन रोखण्यासाठी भाजपचे आटोकाट प्रयत्न; उचललं ‘हे’ पाऊल – bjp trying hard to stop anna hazare from agitation

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपण आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितल्याने त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आता भाजपने पुढचे पाऊल टाकले आहे. कोणत्याही परिस्थितीत अण्णांचे...

Anthony Stuart: गोलंदाजांमध्ये अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव खेळाडू; पाहा व्हिडिओ – australian cricketer anthony stuart only bowler to take a hat trick in...

नवी दिल्ली: वनडे क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत चार असे गोलंदाज झाले आहेत ज्यांनी पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक घेतली आहे. पण करिअरमधील अखेरच्या सामन्यात हॅटट्रिक घेण्याची...

Recent Comments