Home आपलं जग करियर sebi vacancy 2020: सरकारी नोकरी: सेबीत भरती; अर्जांना मुदतवाढ - sebi recruitment...

sebi vacancy 2020: सरकारी नोकरी: सेबीत भरती; अर्जांना मुदतवाढ – sebi recruitment 2020 application date extended for officer grade a assistant manager


Sarkari Nokri 2020: सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) अर्थात सेबीमध्ये अनेक पदांवर भरती आहे. ही भरती प्रक्रीया सुरू असून ऑनलाइन अर्जांसाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज करण्यास ३१ जुलै २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सेबीमध्ये ऑफिसर ग्रेड ए (असिस्टंट मॅनेजर) पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार सेबीच्या sebi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. तब्बल १४७ पदे रिक्त आहेत. अर्ज करण्यासाठी सामान्य, ओबीसी आणि आर्थिक मागास वर्गाच्या उमेदवारांसाठी १००० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे तर एससी, एसटी आणि दिव्यांग श्रेणीतील उमेदवारांना १०० रुपये जमा करावे लागतील.

जाणून घेऊ किती पदे रिक्त –

शाखा – पदे
जनरल – ८०
लीगल – ३४
आयटी – २२
सिव्हिल इंजिनीअरिंग – १
इलेक्ट्रीकल इंजिनीअरिंग – ४
रिसर्च – ५
ऑफिशिअल लँग्वेज – १
एकूण १४७

वयोमर्यादा – २९ फेब्रुवारी २०२० रोजी उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे. म्हणजेच उमेदवार १ मार्च १९९० नंतर जन्मलेला असावा.

हेही वाचा : भारतीय लष्करात भरती; कोणत्या राज्यात कधी रॅली? वाचा

निवड करायचे निकष

निवड प्रक्रिया तीन टप्प्यात होईल. पहिल्या टप्प्यात प्रत्येकी १०० गुणांच्या दोन पेपरची ऑनलाइन चाचणी होईल. दुसऱ्या टप्प्यात प्रत्येकी १०० गुणांच्या दोन पेपरची ऑनलाइन चाचणी होईल. तिसऱ्या टप्प्यात मुलाखत घेतली जाईल.

अर्जाचे शुल्क

खुला प्रवर्ग, ओबीसी, इडब्ल्यूएस साठी प्रत्येकी १००० रुपये तर एससी, एसटी, PwBD वर्गासाठी १०० रुपये शुल्क.

हेही वाचा : पुणे मेट्रो प्रकल्पात भरती प्रक्रिया; दोन लाखांवर पगार

असा करा अर्ज

इच्छुक आणि योग्य उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकतात.

SEBI officer grade A vacancy notification 2020 साठी येथे क्लिक करा.

SEBI officer grade A online application साठी येथे क्लिक करा.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

FIR Lodged Against Lalu Yadav For Using Mobile – Lalu Prasad Yadav : शिक्षा भोगणाऱ्या लालूंविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

पाटणा : चारा घोटाळ्या प्रकरणातले दोषी आणि राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या अडचणींत भर पडलीय. चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असतानाही मोबाईलद्वारे बिहारच्या...

coronavirus vaccine news: Coronavirus Vaccine करोना: ऑक्सफर्ड लस चाचणीत एक चूक ठरली वरदान; अनेक शंका उपस्थित – coronavirus vaccine updates oxford vaccine trial mistakes...

लंडन: सगळ्यात स्वस्त आणि प्रभावी ठरू शकणारी लस ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाने विकसित केली आहे. तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणीत एक छोटीशी चूक वरदान ठरली असली तरी...

Maharashtra minister: धान खरेदी केंद्र वाढवा – maharashtra minister chhagan bhujbal has directed increase number of grain shopping centre to administration

म. टा. प्रतिनिधी, मुंबई विदर्भात गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील धान खरेदीबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली....

Recent Comments