Home शहरं मुंबई section 144 in mumbai: Curfew in Mumbai: जमावबंदी म्हणजे काय रे भाऊ?;...

section 144 in mumbai: Curfew in Mumbai: जमावबंदी म्हणजे काय रे भाऊ?; कायद्याविषयी जाणून घ्या माहिती – covid-19: know about section 144 of the crpc


मुंबई: मुंबईत आजपासून कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. म्हणजेच मुंबईत आजपासून जमावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईत तीनपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. एकत्र आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकतो. त्यामुळे मुंबईकरांनो पंधरा दिवस जरा जपून, अन्यथा पोलिसांची कारवाई झालीच म्हणजे समजा.

मुंबईत आजपासून १५ जुलैपर्यंत जमावबंदी आदेश लागू राहणार आहेत. रात्री ९ ते सकाळी ५ या दरम्यान कर्फ्यू लागू असणार आहे. मुंबईत करोना रुग्णांची संख्या दिवसेगणिक वाढतचं आहे. त्यामुळं पोलीस प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. फौजदारी दंड संहिता १९७३च्या कलम १४४ अंतर्गत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. कोणीही हिंसाचार करू नये, अटीतटीच्या प्रसंगी गर्दी करू नये यासाठी हे कलम लागू करतात. एखाद्या परिसरात जमाव एकत्र येऊन तिथली शांतता भंग करून दंगल माजवण्याची शक्यता असते, अशा ठिकाणी हे कलम लागू करतात. १४४ या कलमाला जमावबंदी किंवा संचारबंदी असंही म्हणतात. जमावबंदी आदेशानुसार तीनपेक्षा अधिक लोकांना एकत्रित येण्यास मज्जाव असतो तर संचारबंदीमध्ये संचारबंदी म्हणजे कुणालाही पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय बाहेर पडता येत नाही. दोन महिन्यापर्यंत जमावबंदी आदेश लागू करता येतो. तसेच ही मुदत वाढवताही येते. जिल्हाधिकारी, जिल्हा न्याय दंडाधिकारी किंवा इतर कार्यकारी दंडाधिकारी नोटिफिकेशन जारी करून जमावबंदीचे आदेश देऊ शकतात.

मुंबईत आता ‘या’ वेळेत बाहेर पडण्यास मज्जाव; अन्यथा कारवाई

जमावबंदीच्या काळात तीनपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यास जसा मज्जाव असतो त्याचप्रमाणे हत्यारांची ने-आण करण्यासही मज्जाव असतो. वर उल्लेख केलेले अधिकारी एखाद्या विशिष्ट परिसरातील कुठल्याही व्यक्तीला किंवा तिथल्या लोकांना किंवा त्या भागाला भेट देणाऱ्या लोकांना नोटीस बजावून एखादी कृती करण्यापासून रोखू शकतात. अर्थात अशी नोटीस बजावण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत. त्यानुसारच ही कार्यवाही केली जाते.

Curfew in Mumbai : मुंबईत पुन्हा जमावबंदी लागू; मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय

अटकेची तरतूद

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या किंवा पालन न करणाऱ्या व्यक्तीला पोलीस अटक करू शकतात. कलम १०७ किंवा कलम १५१ अन्वये अटक करता येते. कलम १४४ नुसार वर्षभराच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मात्र, हा जामीनपात्र गुन्हा असल्याने अटक झाल्यावर जामीन मिळू शकतो.

Mumbai Police: … म्हणून मुंबईतील सहा पोलिसांविरुद्धच दाखल झाले गुन्हे

या कारणांसाठी जमावबंदी किंवा संचारबंदी लागू होते

>> कार्यवाही करण्यास पुरेसे कारण असणे

>> तत्काळ प्रतिबंध आवश्यक असणे

>> सत्वर उपाययोजना आवश्यक असणे

>> मानवी जीविताला, आरोग्याला, सुरक्षिततेला असलेला धोका

>> सार्वजनिक प्रशांतता राखण्यासाठी

>> दंगाधोपा टाळण्यास प्रतिबंध करण्यासSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

milk procedure farmers: शेतकऱ्यांना दुधाने तारलं; शंभर कोटीच्या बोनसने गोड होणार दिवाळी – 100 crore bonus for milk procedure farmers in kolhapur gokul warna...

म. टा. प्रतिनिधी, कोल्‍हापूरः गतवर्षी महापूराने तर यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, पण अशा कठीण काळात दूग्ध व्यवसायाने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला....

free corona vaccine: मोफत करोना लशीवर सर्वच भारतीयांचा हक्क: अरविंद केजरीवाल – all indian citizens have the right to get free corona vaccine says...

नवी दिल्ली: बिहार निवडणुकीसाठी (Bihar Election 2020) आपल्या जाहीरनाम्यात (Election Manifesto) भारतीय जनता पक्षाने (BJP) सर्व बिहारी जनतेला करोना लस मोफत देण्याची घोषणा...

coronavirus updates: Coronavirus मास्क न घातल्यास दोन वर्ष तुरुंगवास; ‘या’ देशाने लागू केला कायदा – people who refuse to wear covid masks will be...

अदीस अबाबा: करोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. काही देशांमध्ये नियंत्रणाची परिस्थिती निर्माण झाली असताना करोनाची दुसरी लाटदेखील आहे. करोनामुळे श्रीमंत आणि विकसित...

Recent Comments