Home महाराष्ट्र section 144 in mumbai: Section 144 in Mumbai : मुंबईत आता 'या'...

section 144 in mumbai: Section 144 in Mumbai : मुंबईत आता ‘या’ वेळेत बाहेर पडण्यास मज्जाव; अन्यथा कारवाई – section 144 in mumbai amid spike in covid-19 cases


मुंबई: मुंबईकरांनी जागोजागी गर्दी सुरू केल्यामुळे पोलिसांनी अखेर मुंबईत जमावबंदी लागू केली आहे. आजपासून १५ दिवसांसाठी ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांनी (Mumbai Police) काढलेल्या आदेशानुसार रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत मुंबईकरांना घराबाहेर पडण्यास बंदी असणार आहे. त्यामुळे या वेळेत कुणी घराबाहेर पडल्यास त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात येणार आहे.

१ जुलै ते १५ जुलैपर्यंत रात्री ९ ते सकाळी ५ या दरम्यान ही जमावबंदी लागू असेल. पण सकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांनाच बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. या जमावबंदीतून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वगळण्यात आलं आहे. तसेच धार्मिक स्थळांनाही काही अटी व शर्तीच्या आधारे सूट देण्यात आली आहे. ही जमावबंदी सर्व सामान्य नागरिकांसाठी लागू असेल. अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना यादरम्यान प्रवासाची मुभा असेल. तसंच सर्वसामान्यांना कामासाठी केवळ दोन किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी हे आदेश दिले आहेत. मुंबईतील करोनाचा प्रादुर्भाव अजूनही गेलेला नाही. करोनाचं मुंबईवरील संकट गेलेलं नसतानाही मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडत आहेत. गेल्या तीन दिवसांतच पोलिसांनी बेकायदेशीरपणे विनाकारण रस्त्यावरून वाहने चालविणाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. गेल्या तीन दिवसांत पोलिसांनी एकूण १६ हजार वाहने जप्त केली आहेत. तरीही मुंबईकर रस्त्यांवर गर्दी करत आहेत. मार्केटमध्ये, परिसरात मोठ्या संख्येने लोक फिरताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांना आज जमावबंदी आदेश लागू करावे लागले आहेत.

Curfew in Mumbai : मुंबईत पुन्हा जमावबंदी लागू; मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय

दरम्यान, नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, अत्यावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडताना मास्क लावूनच घराबाहेर पडावं, असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलं आहे. मुंबईत करोना रुग्णांची संख्या ७७ हजार ६५८वर गेली आहे. तसेच करोनाने मुंबईत आतापर्यंत ४ हजार ५५६ लोक दगावले आहेत. तरीही मुंबईकर विनाकारण गर्दी करत असून वाहने घेऊनही रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे पोलिसांना ही कारवाई करावी लागली असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Mumbai Police: … म्हणून मुंबईतील सहा पोलिसांविरुद्धच दाखल झाले गुन्हे

दरम्यान, अन्न, भाजीपाला, दूध पुरवठा, रेशन, किराणा दुकान यांना जमावबंदीतून सूट, अन्न, किराणा सामान आणि जीवनावश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी देणाऱ्या सेवा, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, रुग्णालय, मेडिकल, फार्मा कंपनी, लॅब, नर्सिंग महाविद्यालये, प्रयोगशाळा, वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस यांना सूट, प्रसारमाध्यमांचे कर्मचारी, प्रतिनिधी, दूरध्वनी आणि इंटरनेट सेवेतील कर्मचारी, वीज, पेट्रोलियम, तेल आणि ऊर्जा संबंधित, बँकिंग, स्टॉक एक्सजेंच, सेबी नोंदणीकृत पदाधिकारी, आयटी आणि आयटी कंपनीशी संबंधित सेवा, डेटा सेंटर सारख्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पायाभूत सुविधा प्रदान करणारे कर्मचारी, बंदरे, ई-कॉमर्स कंपन्या केवळ अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी आणि या सर्व सेवांशी संबंधित माल आणि मनुष्यबळ वाहतूक करणारे ट्रक, टेम्पो आदींना या जमावबंदीतून वगळण्यात आलं आहे.

Uddhav Thackeray: ‘लालबागचा राजा’चा गणेशोत्सव रद्द; मुख्यमंत्री म्हणाले…Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rajasthan Royals: IPL 2020: धोनीच्या चेन्नईची हाराकिरी, राजस्थानने साकारला मोठा विजय – ipl 2020: rajasthan royals beat chennai super kings by 7 wickets

अबुधाबी, IPL 2020 : चेन्नईच्या फलंदाजांना आजच्या सामन्यात सूर गवसला नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच चेन्नई सुपर किंग्सला राजस्थान रॉयल्सपुढे विजयासाठी १२६ धावांचे माफक...

Varun Gandhi: मदत मागणाऱ्यावर वरुण गांधी खवळले!; म्हणाले, ‘मी काय तुमचा नोकर नाही’ – bjp pilibhit mp varun gandhi viral audio illegal liquor case...

पिलीभीतः उत्तर प्रदेशमधील पिलीभीत येथील भाजप खासदार वरुण गांधी ( varun gandhi ) यांचा एक कथित ऑडिओ व्हायरल झाला आहे. या कथित व्हायरल...

Recent Comments