Home देश पैसा पैसा sensex surge today: शेअर बाजारात भरपाई ; सेन्सेक्सने घेतली ५०० अंकांची झेप!...

sensex surge today: शेअर बाजारात भरपाई ; सेन्सेक्सने घेतली ५०० अंकांची झेप! – sensex nifty surge today


मुंबई : कालच्या जोरदार घसरणीतून सावरत आज सेन्सेक्स आणि निफ्टीने पुन्हा तेजीची वाट धरली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ५०० अंकानी वधारला आणि सेन्सेक्सने पुन्हा एकदा ५० हजार अंकांची पातळी ओलांडली.

सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६२ अंकांनी वधारून ४९७७७ अंकांवर ट्रेड करत आहे. निफ्टी ४३ अंकांच्या वाढीसह १४७२६ अंकावर आहे. बाजारात ब्लुचिप शेअरला मागणी आहे. ज्यात बँका, एन बी एफ सी, ऑटो या शेअर मध्ये तेजी दिसून आली आहे. ए यू स्मॉल फायनान्स बँक, इंडियन बँक, पी एन बी, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय हे शेअर तेजीत आहेत. तसेच टाटा मोटर्स, सेल, हिंडालको, अशोक लेलँड या शेअर मध्ये वाढ झाली आहे.

पुन्हा लॉकडाउनचे संकट ; दोन दिवसात सोनं ७५० रुपयांनी महागले , जाणून घ्या आजचा दर
काल सपाटून मार खालेल्ला रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने आज यू-टर्न घेतला. आज रिलायन्स ३१ रुपयांनी वधारला असून तो २०३९ रुपये झाला आहे. तसेच टीसीएस, इन्फोसिस, ओएनजीसी, आयटीसी हे शेअर वधारले आहेत. सकाळच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपया १६ पैशांनी वधारला होता. रुपयाचे मूल्य ७२.३३ झाले होते.

मुकेश अंबानींना सुप्रीम कोर्टाचा दणका; कोर्टाच्या ‘या’ निर्णयाने वाढणार अडचणीकरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जागतिक पातळीवर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्याशिवाय मागील काही दिवस कच्च्या तेलाच्या किमतीत देखील तेजी आहे. ज्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलने विक्रमी पातळी गाठली आहे. इंधन दरवाढीने भविष्यात महागाईचा भडका उडण्याचा अंदाज विविध संस्थांनी व्यक्त केला आहे.

‘ब्लॅक मंडे’ने केला घात
देशभरात करोना व्हायरसने पुन्हा डोकं वर काढले आहे. महाराष्ट्र, कर्नाटकात रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून खरबदारीचा उपाय म्हणून अंशतः लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. याचे पडसाद आज भांडवली बाजारावर उमटले. करोनाच्या धसक्याने सोमवारी बाजारात चौफेर विक्री सुरु झाली. यात आज सोमवारी सेन्सेक्स १००० अंकांनी घसरला तर निफ्टी २८० अंकांनी कोसळला होता. गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटींचे नुकसान झाले होते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

LIVE : ‘भारत माता की जय’ म्हणत पंतप्रधान मोदींनी फुंकले प.बंगालच्या निवडणुकीचे रणशिंग | National

2:19 pm (IST) राज ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत - नितेश राणे 'शिवसेनेच्या प्रकल्पाविरोधाचं कारण वेगळं' राजन साळवींचाही प्रकल्पाला पाठिंबा - नितेश...

pm modi rally in kolkata live updates: pm modi rally live update : PM मोदींची कोलकात्यात प्रचारसभा, भाषण सुरू… – pm modi rally in...

कोलकाताः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोलकात्यातील ब्रिगेड मैदानावर प्रचारसभा होत आहे. या सभेला हजारो नागरिक आले आहेत. पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सर्वांचं...

जातपंचायतीची बहिष्कारनीती सुरूच

म. टा. प्रतिनिधी, समाजमनावरील जातपंचायतीची दहशत उधळून लावल्याची घटना म्हसरूळ (ता. नाशिक) येथे ताजी असतानाच आता सिन्नरमध्ये जातपंचायतीने तरुणावर बहिष्कार घातल्याचा धक्कादायक प्रकार...

औरंगाबाद : विनयभंगप्रकरणी तीन आरोपी अटकेत

म. टा. प्रतिनिधी, कोचींग क्लासेसहून आपल्या घरी चाललेल्या एका करणाऱ्या तीन जणांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. ऋषीकेश पालोदकर (२२, रा. पुंडलिकनगर), शुभम...

Recent Comments