Home देश पैसा पैसा sensex today: नफेखोरांनी साधली संधी ; शेअर बाजार गडगडला

sensex today: नफेखोरांनी साधली संधी ; शेअर बाजार गडगडला


मुंबई : आज बाजारात सकाळी सेन्सेक्सने शतकी झेप घेतली होती मात्र त्यानंतर नफेखोरीचा दबाव वाढू लागला. एफएमसीजी, ऑटो कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांनी विक्री केली. फ्युचर कन्झुमर, बजाज कन्झुमर, गोदरेज कन्झुमर, जिलेट इंडिया, झायड्स वेलनेस आदी शेअर घसरले. तर टुरिझम कंपन्यांच्या शेअरमध्येही विक्रीचा मारा दिसून आला. सध्या सेन्सेक्स १६२ अंकांच्या घसरणीसह ३३९५४ अंकांवर ट्रेड करत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४५ अंकांच्या घसरणीसह १००२२ अंकांवर आहे.

EMI Moratorium; RBI म्हणते व्याज द्यावेच लागणार अन्यथा प्रचंड नुकसान
देशात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. केंद्र सरकारने दीर्घकालीन लॉकडाउन ठेवून अर्थव्यवस्थेचे नुकसान केले असल्याचा सूर आता उद्योग जगतातून उमटत आहे. आज सकाळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांच्याशी चर्चा केली, यात बजाज यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. त्या पाठोपाठ उद्योजक गौतम अदानी यांनी सरकारने वेळीच उपाययोजना केल्या नाहीत म्हणून टीका केली आहे.

कठोर लॉकडाउनने अर्थव्यवस्थेला फटका ; राजीव बजाज यांची टीका
दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर आज बाजारात हेल्थकेअरमधील शेअर तेजीत होते. ज्यात लुपिन , ग्लेनमार्क, टोरंटफार्मा, जुबिलंट, सन फार्मा, बायोकॉन हे शेअर वधारले. चौथ्या तिमाहीतील निकालांचे पडसाद आज बाजारावर उमटले. दरम्यान चलन बाजारात आज सकाळी रुपयात १५ पैशांचे अवमूल्यन झाले. डॉलरच्या तुलनेत रुपया ७५.६२ वर ट्रेड करत होता. आज आशियातील शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. हाॅंगकाॅंग, शांघाई, निक्केई आदी शेअर बाजार तेजीत होते.

जागतिक बाजारांतून आलेले सकारात्मक संकेत आणि एचडीएफसी बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्र बँक यांच्या समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी दिसून आल्याने बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) २८४ अंकांनी वधारला होता. सत्रांतर्गत व्यवहारांदरम्यान सेन्सेक्सने ३४,४८८.६९ अंकांची पातळी गाठली आणि बाजार बंद होताना तो ३४,१०९.५४च्या पातळीवर बंद झाला होता.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nitin Raut: ‘महापारेषण’मध्ये ८५०० पदांची भरती – energy minister nitin raut says mahapareshan will be recruiting for 8500 post

म. टा. प्रतिनिधी, मुंबईराज्य सरकारच्या ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीतील तांत्रिक श्रेणीतील जवळपास ८५०० रिक्त पदे भरण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत...

Heavy Vehicles: अखेर अवजड वाहनांना बंदी! – heavy vehicles finally banned from nandur to jail road nashik

म. टा. वृत्तसेवा, पंचवटीजेलरोडच्या सिंधी कॉलनीसमोर बुधवारी दाम्पत्याला ट्रकने चिरडल्यानंतर शहर वाहतूक पोलिसांना जाग आली. नांदूर नाक्यापासून जेलरोडकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यासाठी...

Recent Comments