Home देश पैसा पैसा sensex today: शेअर बाजारात तेजीचा वर्षाव ; सेन्सेक्सने ओलांडली ३४ हजारांची पातळी

sensex today: शेअर बाजारात तेजीचा वर्षाव ; सेन्सेक्सने ओलांडली ३४ हजारांची पातळी


मुंबई : आजपासून दीर्घकालीन लॉकडाउन शिथिल करण्याच्या दृष्टिने पावले उचलली जाणार आहेत. मागील दोन महिन्यांहून अधिककाळ करोना रोखण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय टाळेबंदी जाहीर केली होती. आता हळूहळू लॉकडाउन शिथिल करून अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यामुळे भांडवली बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच आशियातील प्रमुख शेअर बाजारांमध्ये आज सकारात्मक वातावरण दिसून आले. चलन बाजारात आज आशियातील इतर चलनांच्या तुलनेत डॉलरचे मूल्य घसरले. त्याचाही परिणाम भांडवली बाजारावर जाणवला.

गेल्या काही दिवसांपासून परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात मोठी गुंतवणूक केली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार परकीय गुंतवणूकदारांनी ७४९८ कोटींचे शेअर खरेदी केले आहेत. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ४४१ कोटींचे शेअर खरेदी केले.
‘मुडीज’ चा भारताला दणका ; दोन दशकानंतर पहिल्यांदाच घेतला हा निर्णय
सध्या बाजारात बँका, वित्त संस्था, एफएमसीजी , ऑटो कंपन्यांच्या शेअरला मागणी आहे. बजाज फायनान्स, ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक ,एचडीएफसी बँक, बजाज ऑटो, ओएनसीजी, महिंद्रा अँड महिंद्रा, टायटन, सन फार्मा, एनटीपीसी, कोटक बँक आदी शेअर तेजीत आहेत.

निफ्टीने १३ मार्चनंतर पहिल्यांदाच १०१०० अंकांची पातळी ओलांडली आहे. सध्या निफ्टी १३९ अंकांच्या वाढीसह १०११८ अंकावर आहे. तर सेन्सेक्स ३०० अंकांच्या वाढीसह ३४१४७ अंकांवर ट्रेंड करत आहे. मंगळवारी सेन्सेक्स ५२२ अंकांनी वधारला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत १५२ अंकांची वाढ होऊन तो ९९७९ अंकांवर बंद झाला. अनलॉक १.० मुळे भारतीय भांडवल बाजार सकारात्मक स्थितीत आहेत. त्यामुळे मूडीजच्या पतमानांकन घटवण्याचा फारसा परिणाम बाजारावर दिसून आलेला नाही. अर्थव्यवस्था खुली होत असल्याने सर्वत्र सकारात्मक वातावरण आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

yeola st depot employees: एसटीचे कर्मचारी पुन्हा करोना बाधित – nashik corona update : 3 yeola st depot employees found corona positive

म. टा. वृत्तसेवा, येवलाएकीकडे येवला तालुक्यातील करोना बाधितांची संख्या आटोक्यात येत असताना, दुसरीकडे मुंबई येथील बेस्ट सेवेसाठी आपले कर्तव्य बजावून परतलेल्या एसटीच्या येवला...

Bank employees strike: संपामुळे सातशे कोटींचे व्यवहार ठप्प – 700 crore transactions stalled due to strike

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकेंद्र सरकार बँकांचेही खासगीकरण करू पाहत आहे. पीएमसी, एस बँकेच्या ठेवीदारांना वाऱ्यावर सोडले. आता तेच लक्ष्मी विलास बँकेचे होऊ पाहत...

Recent Comments