Home देश पैसा पैसा sensex today: शेअर बाजार ; 'निफ्टी'साठी १०३०० अंकांचा स्तर निर्णायक - Stock...

sensex today: शेअर बाजार ; ‘निफ्टी’साठी १०३०० अंकांचा स्तर निर्णायक – Stock Action Today


मुंबई : जागतिक पातळीवर करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याचा परिणाम म्हणून जगभरच्या शेअर बाजारांमध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम मंगळवारी भारतीय बाजारांवरही जाणवला. सकाळच्या सत्रात तेजीत असलेलया मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) दिवसअखेर ४५ अंकांनी घसरून ३४,९१५ च्या पातळीवर बंद झाला. त्याचवेळी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १० अंकांनी घसरून १०,३०२ च्या पातळीवर स्थिरावला होता.

शेअर बाजारात मंगळवारी उलथापालथ पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रात तेजीत असलेल्या निर्देशांकात नंतर नफावसुली सुरु झाली. मात्र यात निफ्टी १०३०० च्या पातळीवर स्थिरावण्यात यशस्वी झाला. निफ्टीला खालच्या स्तरावर १०१०० अंकांवर आणि वाढला तर १०५०० अंकांची पातळी राहील, असेचॉईस ब्रोकिंगचे सुमित बगाडिया यांनी सांगितले. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे चंदन तपारिया यांच्या मते निफ्टी १०३३३ चा स्तर निर्णायक राहील.

मागील काही सत्रात तेजीत असलेल्या फार्मा कंपन्यांच्या शेअरला मंगळवारी नफाखोरीचा फटका बसला. ग्लेनमार्क फार्मा, सन फार्मा, अरबिंदो फार्मा आदी शेअरमध्ये घसरण झाली आहे. मात्र दुसऱ्या बाजुला आयआरसीटीसी, आयशर मोटर्स, टीव्हीएस मोटर्स, महिंद्रा अॅंड महिंद्रा आदी शेअर तेजीत आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार दिवाळी आणि छटपूजेपर्यंत म्हणजेच नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत लागू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पुढील ५ महिन्यांसाठी ८० कोटीहून अधिक गरीब नागरिकांना ५ किलो गहू किंवा ५ किलो तांदूळ मोफत दिले जातील, या बरोबर प्रत्येक कुटुंबाला १ किलो चणे दिले जाणार. पावसाळ्यात आणि त्यानंतर मुख्यत: कृषी क्षेत्रात अधिक काम होत असते. जुलैपासून हळूहळू सणाचे दिवस येतात.

विमादावा प्रक्रियेत गोंधळला आहात; या गोष्टी जाणून घ्या
दरम्यान, भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशात उद्भवलेल्या संघर्षामुळे द्विपक्षीय व्यापारावरही परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. या घटनांचा परिणाम शेअर बाजारावरही होण्याची शक्यता आहे. याशिवाय देशांतर्गत बाजारातून आणि विदेशी बाजारांतून येणाऱ्या संकेतांवरही बाजाराची आगामी दिशा ठरण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या प्रारंभी वाहन उद्योगातील कंपन्यांच्या विक्रीचे आकडे येण्यास सुरुवात होईल. येत्या बुधवारी (एक जुलै) जून महिन्याच्या मार्किट मॅन्युफॅक्चरिंग पीएमआयचे आकडेही जारी होतील. त्यानंतर मार्किट सर्व्हिसेस पीएमआयचे आकडे आठवड्याच्या शेवटी शुक्रवारी जारी होतील. या आकड्यांचाही बाजाराच्या गतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
डेडलाइन संपली ; उद्यापासून बँकिंग क्षेत्रात होणार ‘हे’ बदलSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aurangabad Municipal Corporation: ‘वर्कऑर्डर’ अभावी ठाकरे स्मारक कागदावरच – aurangabad municipal corporation has not give work order for statue of balasaheb thackeray in aurangabad

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्मृतिवन व स्मारक उभारण्यासाठी महापालिकेने मोठा गाजावाजा करून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपजून केले. पण, तो फार्स...

Ramdas Athawale: शेतकरी आंदोलनात होतेय राजकारण – union minister ramdas athawale’s reaction on farmers protest

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकशेतकरी आंदोलनाचे फक्त राजकारण सुरू आहे. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे तो त्याने बजवावा, मात्र सध्या सुरू असलेले शेतकरी...

Pune: Pune: महिला रिक्षामधून प्रवास करत होती, काही अंतरावरच… – pune woman robbed gold jewellery and cash worth rs 1. 5 lakh in bhosari...

पुणे: रिक्षाने प्रवास करत असताना, महिलेच्या पर्समधील दागिने आणि रोकड असा दीड लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी...

Recent Comments