Home देश पैसा पैसा sensex today: शेअर बाजार; पडझडीचे सत्र कुठपर्यंत चालणार - Stock Market Trading...

sensex today: शेअर बाजार; पडझडीचे सत्र कुठपर्यंत चालणार – Stock Market Trading Today


मुंबईः करोनाची धास्ती आणि त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम यामुळे पुन्हा एकदा भांडवली बाजारांना फटका बसला आहे. मागील काही सत्रातील तेजीत असलेल्या बाजारात जगभरात गुरुवारी मोठी पडझड झाली. ही घसरण आजही कायम राहील असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या विकासाबाबत गंभीर इशारा दिला आहे. कोव्हीड १९ ची दुसरी लाट येऊ शकते असे भाकीत बँकेने केले आहे. त्याशिवाय बँकेने अमेरिकेचा विकासदर उणे 6.5 टक्के इतका तळ गाठेल असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे बँकेने अपेक्षेप्रमाणे व्याजदर कायम ठेवले.

फेडरल रिझर्व्हच्या अहवालानंतर युरोप आणि अमेरिकेतील शेअर बाजारांत गुरुवारी मोठी पडझड झाली. बाजारातून पैसे काढण्याचा सपाटा सुरू झाला. ज्यामुळे एस अँड पी ५०० इंडेक्स १०५ अंकांनी कोसळला. डाऊजोन्स १०५२ अंकांनी आपटला. तर नॅसडक २४९ अंकांनी कोसळला. 1 एप्रिल नंतर प्रथमच बाजारात इतकी मोठी घसरण झाली. युरोपियन एसटीओएक्सएक्स निर्देशांक ६०० अंकांनी कोसळला आहे.

दरम्यान काल कमॉडिटी बाजारातसुद्धा काल मोठी उलथापालथ दिसून आली. सोन्याचा भाव 2 टक्क्यांनी वधारला तर कच्चे तेलात मोठी घसरण झाली.

जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांचा भारतावर प्रभाव असेल. निफ्टी ९९५० ते ९९२० च्या दरम्यान राहील असं शेअर बाजार विश्लेषकाना वाटत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Eknath Khadse Live Updates: Live: थोड्याच वेळात एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश – live updates: eknath khadse joining ncp

मुंबई: भाजपला रामराम ठोकणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. राज्याच्या राजकीय वर्तुळात या प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादीनेही...

PM Narenda Modi: पंतप्रधान मोदी करणार पहिल्या ‘सी-प्लेन’चे लोकार्पण – pm narendra modi to inaugurate first seaplane service from sabarmati riverfront to statue of...

वृत्तसंस्था, नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पहिल्या 'सी-प्लेन'चे (पाण्यावर उतरू शकणारे आणि तेथून उड्डाण करू शकणारे विमान) लोकार्पण ३१ ऑक्टोबर...

Sanjay Raut: ही तर मोदींची बदनामी; भाजपच्या ‘लस वाटप’ घोषणेवर शिवसेनेचा बाण – shivsena mp sanjay raut attacks bjp over bihar election manifesto

मुंबई: 'पूर्वी जातीधर्माच्या नावावर देशात फूट पाडण्याचे प्रयत्न व्हायचे. आता लसीच्या नावावर देशात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत,' असा घणाघाती आरोप शिवसेनेचे खासदार...

Recent Comments