Home देश पैसा पैसा sensex today: BSE Sensex : आर्थिक आकडेवारी ; आज ठरणार शेअर बाजाराची...

sensex today: BSE Sensex : आर्थिक आकडेवारी ; आज ठरणार शेअर बाजाराची दिशा – Things Will Decide Stock Action Today


मुंबई : मागील काही सत्रात तेजीत असलेल्या फार्मा कंपन्यांच्या शेअरला आज नफाखोरीचा फटका बसला. ग्लेनमार्क फार्मा, सन फार्मा, अरबिंदो फार्मा आदी शेअरमध्ये घसरण झाली आहे. मात्र दुसऱ्या बाजुला आयआरसीटीसी, आयशर मोटर्स, टीव्हीएस मोटर्स, महिंद्रा अॅंड महिंद्रा आदी शेअर तेजीत आहे. सध्या सेन्सेक्स ३४९५२ अंकांवर आहे तर निफ्टी १०३०२ अंकांवर ट्रेड करत आहे.

भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशात उद्भवलेल्या संघर्षामुळे द्विपक्षीय व्यापारावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनांचा परिणाम शेअर बाजारावरही होण्याची शक्यता आहे. याशिवाय देशांतर्गत बाजारातून आणि विदेशी बाजारांतून येणाऱ्या संकेतांवरही बाजाराची आगामी दिशा ठरण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या प्रारंभी वाहन उद्योगातील कंपन्यांच्या विक्रीचे आकडे येण्यास सुरुवात होईल. येत्या बुधवारी (एक जुलै) जून महिन्याच्या मार्किट मॅन्युफॅक्चरिंग पीएमआयचे आकडेही जारी होतील. त्यानंतर मार्किट सर्व्हिसेस पीएमआयचे आकडे आठवड्याच्या शेवटी शुक्रवारी जारी होतील. या आकड्यांचाही बाजाराच्या गतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सोमवारी निफ्टी १०३५० च्या पातळीखाली बंद झाला. आज निफ्टी १०२५० ते १०४५० च्या दरम्यान राहील, असा अंदाज कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी व्यक्त केला. निर्देशांकांची सध्याची स्थिती मजबूत आहे. जेव्हा बाजारात मोठी घसरण होते तेव्हा ती एक खरेदीची संधी असते, असे एलकेपी सिक्युरिटीजचे रोहित सिंगरे यांनी सांगितले. निफ्टी १०००० स्तराखाली गेल्याने नव्या खरेदीसाठी योग्य संधी आहे, असे त्यांनी सांगितले. आज पुन्हा निफ्टी १०२०० ते १०४०० अंकादरम्यान राहील, असा अंदाज शेअरखानचे शेअर बाजार विश्लेषक गौरव रत्नपारखी यांनी व्यक्त केला.

गुंतवणुकीची संधी ; जाणून घ्या केंद्र सरकारचे सेव्हींग बॉण्ड
मंगळवारी देशातील प्रमुख पेट्रोलियम कंपनी ओएनजीसी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीचे निकाल सादर करणार आहे. तिकडे चीनमध्ये जून महिन्यातील एनबीएस मॅन्युफॅक्चरिंग पीएमआयचे आकडेही मंगळवारी जारी होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील मार्किट मॅन्युफॅक्चरिंग पीएमआयचे जूनमधील आकडे बुधवारी सादर होणार आहेत. अमेरिकेतील बिगरकृषी क्षेत्रातील जून महिन्यातील रोजगाराचे आकडे आगामी आठवड्यात गुरुवारी जारी होणार आहेत. या आकड्यांव्यतिरिक्त विविध प्रकारचे विदेशातील आकडे जारी होणार असून, त्यांचा परिणाम जागतिक बाजारांवर दिसून येण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारातील घडामोडींचा देशांतर्गत शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पत हमी योजना; ‘पीएनबी’कडून ३ लाख उद्योजकांना दिलासा
देशात एकूण करोनाबाधित रुग्णांपैकी एकूण १६ हजार ४७५ रुग्णांचा झाला मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशभरात गेल्या २४ तासांमध्ये आढळले करोनाचे १९,४५९ नवे रुग्ण आढळून आले. मागील २४ तासांत झाला एकूण ३८० करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

जागतिक पातळीवर करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याचा परिणाम म्हणून जगभरच्या शेअर बाजारांमध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम सोमवारी भारतीय बाजारांवरही जाणवला. सत्रांतर्गत व्यवहारांच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) २०९.७५ अंकांनी घसरून ३४,९६१.५२च्या पातळीवर बंद झाला. त्याचवेळी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ७०.६० अंकांनी घसरून १०,३१२.४०च्या पातळीवर स्थिरावला होता.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

rain in Nashik: ऑक्टोबर महिना ठरतोय दमदार – nashik also received heavy rains in october month

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकजिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यातही परतीच्या पावसाचा जोर कायम असून, आतापर्यंत १४५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. बागलाण तालुक्यात २८१ तर...

gold rate today: सोने-चांदी तेजीत; जाणून घ्या आजचा भाव – Gold Silver Price Today

मुंबई : कमॉडिटी बाजारात ५०८८८ रुपये आहे. चांदीच्या दरात मात्र ४७५ रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीचा भाव ६२३८१ रुपये झाला आहे....

Recent Comments