Home देश पैसा पैसा sensex today: BSE Sensex : Investor Lost Five Trillion As Sensex Steep...

sensex today: BSE Sensex : Investor Lost Five Trillion As Sensex Steep Fall – गुंतवणूकदारांचा थरकाप; पाच लाख कोटी गमावले


मुंबई : करोना व्हायरसने सोमवारी पुन्हा एकदा भांडवली बाजाराला जोरदार तडाखा दिला. अमेरिका आणि आशियातील शेअर बाजारांमधील घसरणीचे पडसाद आज भारतात उमटले. करोना रुग्णांची वाढती संख्या पाहून घाबरलेल्या गुंतवणूकदारांनी बाजारात जोरदार विक्री केली. यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल २००० अंकांनी घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५६६ अंकांनी कोसळला. या पडझडीत गुंतवणूकदारांनी पाच लाख कोटी गमावले.

फेसबुकनंतर या दिग्गज कंपनीचीही जिओमध्ये मोठी गुंतवणूक
जगभरात करोना बळींची संख्या झपाट्याने वाढल्याने वित्तसंस्था विकासदराबाबत चिंताग्रस्त झाल्या आहेत. जागतिक विकासदर आणखी कमी होण्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. त्यातच लॉकडाउनचे परिणाम आता दिसून लागले आहेत. अमेरिकेचे उत्पादन ११ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरले. तसेच अमेरिकेतील बेरोजगारांची संख्या तीन कोटींवर गेली आहे. या सर्व घडामोडी महामंदीचे संकेत देत आहेत. चीन आणि अमेरिकेतील घसरलेले उत्पादन, देशातीन लाॅकडाउन वाढवल्याचे नकारात्मक परिणाम आज बाजारावर दिसून आले, असे चाॅईस ब्रोकिंगचे मुख्य विश्लेषक सुंदर षणमुखानी यांनी सांगितले.

…म्हणून सीकेपी बँकेचा परवाना रद्द झाला
आज कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प्रती बॅरल १.१९ डॉलर घसरण झाली. तेलाचा भाव १८.५९ डॉलर झाला. यामुळे आशियातील दक्षिण कोरिया,सिंगापूर, तैवान आदी शेअर बाजारांमध्ये घसरण झाली. भारतात घसरणीचा ट्रेंड बाजार उघडताच सुरु झाला. गुंतवणूकदारांनी धातू, बँका, वित्त संस्था, वाहन, एफएमसीजी, स्थावर मालमत्ता, फार्मा, टुरिझम आदी क्षेत्रात मोठी पडझड दिसून आली.

आजच्या सत्रात एचडीएफसी बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक , टीसीएस, इन्फोसिस, कोटक बँक, एचयूएल, ऍक्सिस, आयटीसी, बजाज फायनान्स, हिंदुस्थान झिंक, कोल इंडिया, नाल्को, एनएमडीसी, जेसएडब्ल्यू, टाटा स्टील, हिंदाल्को, इंडियन हॉटेल आदी शेअर घसरले आहेत.

आज देशातील कारखाना उत्पादनाची आकडेवारी जाहीर झाली. एप्रिलमधील उत्पादनानं तळ गाठला आहे. या आकडेवारीचा परिणाम गुंतवणूकदारांवर झाला. केंद्र सरकारने दुसऱ्यांदा देशव्यापी लॉकडाऊन वाढवला आहे. आता १७ मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. उद्योगधंद्यांना परवानगी देऊन अर्थव्यवस्थेला चालना देण्याची मागणी औद्योगिक क्षेत्रातून करण्यात आली होती, मात्र करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने सरकारने लॉकडाउनचा कालावधी वाढवला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

offsite atms: पुण्यात यापुढं फक्त बँकेच्या शाखेजवळच ATM सुविधा? – most of banks have decided to close offsite atm centres in pune

पुणे: बँकांच्या शाखांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी असणारी 'एटीएम' केंद्रे (ऑफसाइट एटीएम) बंद करण्याचा निर्णय बहुतांश बँकांनी घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. शॉपिंग...

Narendra Modi Took His First Dose Of Covid 19 Vaccine At Aiims Delhi – लसीकरणाचा दुसरा टप्पा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली करोना लस...

हायलाइट्स:देशभरात करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवातपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली लस६० वर्षांहून अधिक वयाच्या किंवा गंभीर आजारांशी झुंज देत असणाऱ्या ४५ वर्षांहून अधिक वयाच्या...

maharashtra budget session live updates: Maha Vikas Aghadi Government Prepared To Handle Opposition – Maharashtra Budget Session Live Updates: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून...

हायलाइट्स:राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासूनकरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून महत्त्वाच्या घोषणांची शक्यतामराठा आरक्षण, करोनाचा वाढता प्रादुर्भाव आदी मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणारराज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून...

Recent Comments