Home देश पैसा पैसा Sensex Today Update: मंदीची दस्तक ; चौफेर विक्रीने शेअर बाजार गडगडला -...

Sensex Today Update: मंदीची दस्तक ; चौफेर विक्रीने शेअर बाजार गडगडला – Sensex Down By 300 Point As Sell Off In Market Continue


मुंबई : आज बाजार उघडताच सेन्सेक्सने २०० अंकांची गटांगळी खाल्ली होती. ही घसरण वाढत गेली आणि दिवसअखेर तो ७०९ अंकांच्या घसरणीसह ३३५३८ अंकांवर बंद झाला . राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २१४ अंकांनी घसरला आहे. निफ्टी ९९०२ अंकांवर स्थिरावला. जगभरातील भांडवली बाजारात झालेल्या पडझडीने भारतीय बाजारांवर परिणाम झाला. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान झाले.

अर्थव्यवस्था पुन्हा उसळी घेणार; वेग असणार तब्बल ९.५ टक्के
गुंतवणूकदारांनी बँका, टेलिकॉम, वित्त संस्था, एफएमसीजी, पॉवर या क्षेत्रात विक्रीचा मारा सुरु ठेवला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक टीसीएस, कोटक बँक, सन फार्मा, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, टायटन आदी महत्वाचे शेअर घसरले आहेत. यामुळे सेन्सेक्सला मोठा झटका बसला आहे. त्याशिवाय टेलिकॉम क्षेत्रातील वोडाफोन, भारती एअरटेल, टाटा कम्युनिकेशन या शेअरमध्ये घसरण झाली.

‘लॉकडाउन’मुळे दुबईत अडकले कर्मचारी ; या कंपनीने पाठवली विमाने
अमेरिकेच्या केंद्रीय बँकेची बैठक सुरु आहे. या बैठकीत फेडरल रिझर्व्ह व्याजदर जैसे थेच ठेवेल, अशी शक्यता जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य विश्लेषक विनोद नायर यांनी व्यक्त केली आहे. बाजाराला सध्या अशा एका संकेताची गरज आहे त्यातून तो दिशा मिळवेल, असे नायर यांनी सांगितले. तर करोनाची दुसरी लाट धडकण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याले गुंतवणूकदार धास्तावले. फेडरल रिझर्व्हने अमेरिकेचा जीडीपी उणे ६.५ टक्के राहिल, असा अंदाज व्यक्त केला. त्यामुळे भांडवली बाजारात विक्रीचा सपाटा दिसून आला असे चाॅईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगाडिया यांनी सांगितले.

चलन बाजारात देखील आज रुपयाला झळ बसली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयात १९ पैशांचे अवमूल्यन झाले. रुपया ७५.७८ च्या स्तरापर्यंत खाली आला. आज तो ७५.८० वर खुला झाला होता. रुपया ७५.२० ते ७५.८० च्या दरम्यान ट्रेड करेल, असा अंदाज मोतीलाल ओसवाल या संस्थेने व्यक्त केला आहे. बुधवारी सेन्सेक्स सकाळच्या सत्रात सावरला आणि तो दिवसअखेर २९० अंकांनी वधरून ३४२४७ अंकांवर बंद झाला. निफ्टी ६९ अंकांनी वधारला आणि १०११६ अंकांवर स्थिरावला होता.

अमेरिकेतील रोजगाराची ताजी आकडेवारी आणि करोनाचा प्रकोप बघता फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर जैसे थेच ठेवले जातील, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. आशियातील प्रमुख शेअर बाजारांवर आज दबाव दिसून आला. जपानमधील टोकियो एक्सचेंजचा निक्केई २२५ अंकांनी घसरला. चीनमधील हँगसेंग निर्देशांक ५१ अंकांनी घसरला आहे. शांघाई कम्पोझिट इंडेक्समध्येही किंचित घसरण झाली आहे. बुधवारी अमेरिकेतील शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. तेथील डाऊजोन्स निर्देशांक २८२ अंकांनी कोसळला होता. एस अँड पी इंडेक्स १७ अंकांनी घसरला. आज कच्च्या तेलाच्या किमती २ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. कच्च्या तेलाचा भाव ४०.८८ डॉलर प्रती बॅरल झाला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

economy in trouble if corona surge: करोनाची दुसरी लाट, महागाईचा भडका; रिझर्व्ह बँक म्हणते अर्थव्यवस्था पुन्हा धोक्यात – inflation and corona second wave will...

नवी दिल्ली : मागील दोन महिन्यात अर्थव्यवस्थेने पुन्हा सावरण्यास सुरुवात केली होती. मात्र पुन्हा एकदा करोना रुग्णवाढीचा आलेख वरच्या दिशेने झेपावू लागला आहे....

woman suicide due to harassment: छळाला कंटाळून विवाहितांच्या आत्महत्या – nashik woman suicide case, married woman suicide due to harassment in nashik

म. टा. प्रतिनिधी, नाशिकमानसिक व शारीरिक छळ करून विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या दोन घटना समोर आल्या असून, या प्रकरणी संबंधित सासरच्या मंडळीविरोधात हुंडाबळीचे...

Ajinkya Rahane: KKR vs DC: पृथ्वी शॉला बाहेर बसवले, मुंबईच्या या खेळाडूला दिली संधी – dc vs kkr delhi capitals ajinkya rahane comes in...

दुबई: आयपीएलच्या १३व्या हंगामात आज शनिवारी कोलकाता नाइड रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स अशी लढत होत आहे. दिल्लीचा संघ गुणतक्त्यात १४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर...

Recent Comments