Home देश पैसा पैसा sensex zoom: गुंतवणूकदारांची कमाई ; शेअर निर्देशांकांची भरारी - sensex zoom by...

sensex zoom: गुंतवणूकदारांची कमाई ; शेअर निर्देशांकांची भरारी – sensex zoom by 450 points today


मुंबई : करोनावरील लसीवरून आशेचा किरण निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांनी आज केलेल्या चौफेर खरेदीने सेन्सेक्सने ४५० अंकांची झेप घेतली. या तेजीच्या लाटेत निफ्टीने १०५५० अंकांचा स्तर ओलांडला. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत एक लाख कोटींची भर पडली.

आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या मंचावर ३० पैकी २१ शेअर तेजीसह बंद झाले. ज्यात एचडीएफसी, इन्फोसिस, टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी या शेअरमध्ये मोठी वाढ झाली. त्याशिवाय महिंद्रा अँड महिंद्रा, टायटन , एचसीएल टेक, मारुती, पॉवरग्रीड, बजाज ऑटो, सन फार्मा, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह आदी शेअर तेजीसह बंद झाले. एशियन पेंट्स, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, कोटक बँक , नेस्ले या शेअरमध्ये घसरण झाली. आज बाजार बंद होताना सेन्सेक्स ४२९.२५ अंकांनी वधारुन ३५८४३.७० वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १२१.६५ अंकांनी वाढला आणि १०५५१. ७० अंकावर बंद झाला.

शेअर बाजाराच्या माहितीनुसार बुधवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १६९६ कोटींच्या शेअरची विक्री केली. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारानी १३७७ कोटीचे शेअर खरेदी केले. दिवसभरात सेन्सेक्सने ३६००० अंकांची पातळी ओलांडली होती. आज आशियातील शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. जपान निक्केई, हॉंगकॉंगचा हँगसेंग या निर्देशांकात वाढ झाली. अमेरिकेन शेअर बाजारात मात्र संमिश्र वातावरण होते. आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ६ सेंटने कमी झाल्या. कच्च्या तेलाचा भाव ४१.९७ डॉलर प्रती बॅरल झाला.

वाचा : अर्थचक्र रुळावर; जूनमध्ये ‘जीएसटी’ महसुलाने सरकारला दिलासा
मागील सहा महिन्यांहून अधिक काळ जागतिक अर्थव्यवस्थेला जोखडून ठेवणाऱ्या करोना व्हायरसवर लस शोधून काढण्यास संशोधकांना यश आले आहे. करोना लसीच्या वृताने अमेरिका युरोप आणि आशियात बुधवारी तेजी दिसून आली. हीनुकत्याच प्रसिद्ध झालेल्या पीएमआयनुसार देशातील औद्योगिक उत्पादन पुन्हा सुरू होऊन ते स्थिर होण्याकडे वाटचाल करत आहे. तसेच जीएसटीचे संकलनही एप्रिल व मे महिन्यांपेक्षा जून महिन्यात अधिक झाले आहे. याचाही सकारात्मक परिणाम भांडवल बाजारांवर दिसून आला.

मुंबई विमानतळ विकासात घोटाळा ; ‘CBI’ची मोठी कारवाई
गुंतवणूकदारांनी बँकिंग, वित्त आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना पसंती दिल्यामुळे भांडवल बाजार बुधवारी उसळले होते. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४९८.६५ अंकांनी वधारत ३५,४१४.४५ या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील १२७.९५ अंक वर जात १०,४३०.०५ अंकांवर स्थिरावला होता.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nitish Kumar rally: प्रचारसभेत ‘लालू यादव जिंदाबाद’च्या घोषणा; संतापलेले नितीशकुमार म्हणाले… – bihar election lalu yadav jindabad a group of people raising slogans in...

पाटणाः राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या सभांना मोठी गर्दी होत आहे. तेजस्वी यादव १० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन देतात त्यावेळी जोरदार...

rcb vs kkr highlights: Royal Challengers Bangalore Beat Kolkata Knight Riders By 8 Wickets – IPL2020: विराट कोहलीच्या आरसीबीने मिळवला केकेआरवर मोठा विजय

अबुधाबी: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरबीसीच्या संघाने आजच्या सामन्यात केकेआरवर सहजपणे मोठा विजय मिळवला. केकेआरच्या फलंदाजांनी यावेळी आरसीबीच्या गोलंदाजीपुढे लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले होते....

Recent Comments