Home शहरं नागपूर Sevagram Ashram: वर्धा: सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष प्रभू यांचा राजीनामा, खळबळजनक आरोप -...

Sevagram Ashram: वर्धा: सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष प्रभू यांचा राजीनामा, खळबळजनक आरोप – wardha sevagram ashram president prabhu resigned


वर्धा: सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्यावर करण्यात आलेले चुकीचे आरोप आणि आपल्याविरोधात सुरू असलेला दुष्प्रचार यामुळे आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. प्रभू यांच्या राजीनाम्याने खळबळ उडाली आहे.

सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष प्रभू यांनी राजीनामा दिला असून, त्यात अनेक आरोप करण्यात आले आहेत. सेवाग्राम आश्रमाच्या कार्यालयात त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी बिनबुडाचे आरोप केल्याचा उल्लेख त्यांनी राजीनाम्यामध्ये केला आहे. आश्रमाच्या हितासाठी स्वतंत्रपणे कोणत्याही स्वरुपाचे काम आपल्याला करू दिले नाही. माझ्यावर अनेकदा बिनबुडाचे आरोप केले गेले. तसेच माझ्याविरोधात चुकीचा प्रचार करण्यात येत असल्याचे नमूद केलं आहे. मला अनेक वेळा अपमानित करण्यात आले आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे.

मधल्या काळात त्यांनी मला पदावरून हटवले होते. तसे पत्र त्यांनी दिले होते. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्याची संधी मला दिलेली नाही. चौकशी न करता लोकशाहीविरोधी पद्धतीने कारवाई करणे हे आश्रमच्या संविधानाच्या विरोधात आहे. त्याला विरोध म्हणून आपण राजीनामा देत आहोत, असा उल्लेखही त्यांनी राजीनाम्यात केला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Corona Vaccination: Corona Vaccination: राज्यात आज ३५ हजार ८१६ कर्मचाऱ्यांचे लसीकरण, धुळ्यात १४४% लसीकरण – 35 thousand 816 employees were vaccinated in the state...

मुंबई: राज्यातील एकूण ४७७ केंद्रांवर आज तब्बल ३५ हजार ८१६ ( ७४ टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण (Corona Vaccination) करण्यात आले. राज्यात आज...

coronavirus in aurangabad: २४ बाधितांची भर; ४८ जणांची सुटी – aurangabad corona update : aurangabad reported 24 new corona cases in yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णसंख्येचा आकडा दिवसेंदिवस कमी होत आहे. रविवारी जिल्ह्यात २४ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर, ४८ जण बरे होऊन...

Recent Comments