Home क्रीडा Shahid Afridi: करोनापेक्षा मोठा व्हायरस मोदींच्या डोक्यात आहे, आफ्रिदीचा व्हिडीओ व्हायरल... -...

Shahid Afridi: करोनापेक्षा मोठा व्हायरस मोदींच्या डोक्यात आहे, आफ्रिदीचा व्हिडीओ व्हायरल… – shahid afridi criticize indian pm narendra modi


पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र यांच्यावर आज जोरदार टीका केली होती. ही टीका करताना आफ्रिदीची जीभ घररल्याचेही पाहायला मिळाले. करोनापेक्षा मोठा व्हायरस मोदींच्या डोक्यात आहे, असे वक्तव्य यावेळी आफ्रिदीने केले आहे. आफ्रिदीच्या वक्तव्यचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओमध्ये आफ्रिदी पाकिस्तानच्या सैन्याबरोबर आहे. आपल्या सैन्याचे कौतुक करत असताना आफ्रिदी मोदी यांच्यावर घसरल्याचे पाहायला मिळाला आहे. मोदींवर जोरदार टीका करताना ते डरपोक आहेत, असेही आफ्रिदी म्हणाला आहे.

या व्हिडीओमध्ये आफ्रिदी म्हणाला की, ” सध्याच्या घडीला जगभरात करोना व्हायरस पसरलेला आहे. पण या करोना व्हायरसपेक्षा मोठा आजार मोदी यांच्या डोक्यामध्ये आहे. मोदी यांना धर्माचा आजार झाला आहे. धर्माच्या नावावर ते राजकारण करत आहेत. मोदी हे काश्मीरी लोकांवर अत्याचार करत आहेत. मोदी स्वत:ला दिलदार असल्याचे दाखवतात, पण ते फार मोठे डरपोक आहेत. त्यामुळेच फक्त काश्मीरमध्ये त्यांनी सात लाखांचे सैन्य उभे केलेले आहे. सात लाखाचे सैन्य तर आमच्या देशामध्ये आहे आणि त्यांच्यामागे २३ कोटी जनता उभी आहे.” बॉलीवूडमधील सिनेमा निर्माते अशोक पंडीत यांनी आफ्रिदीचा व्हिडीओ शेअर केला आहे.

गंभीर आणि हरभजन यांचा आफ्रिदीवर हल्लाबोल…
भारताचा माजी सलामीवीर आणि भाजपाचा खासदार गौतम गंभीरने आफ्रिदीला चांगलेच खडसावले होते. गंभीर म्हणाला की, ” पाकिस्तानची लोकसंख्या २० कोटी एवढी आहे, तर त्यांच्याकडे सात लाखांचे सैन्य आहे. तुम्ही गेल्या ७० वर्षांपासून काश्मीरची भीक मागत आहेत. भारत आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणारे आफ्रिदी आणि इम्रान खान हे जोकर आहेत. कारण ते पाकिस्तानच्या लोकांची फसवणूक करत आहेत. त्याचबरोबर ते मोदी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेव्हा निर्णय येईल, तेव्हा तुम्हाला काश्मीर मिळणार नाही. तुम्हाला बांगलादेश लक्षात आहे ना? “

हरभजननेही आता आफ्रिदीचा चांगलाच समाचार घेतला आहे. हरभजन म्हणाला की, ” यापूर्वी आफ्रिदीला मी माझा मित्र समजत होतो. त्यामुळे त्याच्याशी संवाद होत होता. पण आता भारत आणि मोदी यांच्यावर टीका केल्यावर त्याचे आणि माझे सर्व संबंध संपले आहेत. मोदींवर टीका करण्याचा अधिकार आफ्रिदीला कोणी दिला…”Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pune Crime: अमोल कोल्हेंच्या नावाने बिल्डरकडे मागितले पैसे; पुढे काय घडले पाहा – money demanded from builder in the name of amol kolhe

पुणे:लॉकडाऊन काळात एका बिल्डरला खासदार अमोल कोल्हे बोलत असल्याची बतावणी करून फसविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्या विरोधात वानवडी...

Prakash Javadekar: जावडेकरांचा राहुल गांधींवर पलटवार; म्हणाले, ‘काँग्रेसने शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक चिथावले’ – rahul gandhi wasn’t only supporting protest but also instigating says union min...

नवी दिल्ली: दिल्लीतील शेतकर्‍यांच्या हिंसाचाराचा ( tractor rally violence ) ठपका कॉंग्रेसने सरकार आणि पोलिसांवर ठेवला असतानाच कॉंग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या ट्विटला भाजपने शेतकरी...

Recent Comments