Home मनोरंजन Shakuntala Devi release date: विद्या बालनचा शकुंतला देवी चित्रपट 'या' दिवशी होणार...

Shakuntala Devi release date: विद्या बालनचा शकुंतला देवी चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित! – vidya balan film shakuntala devi release date out july 31


मुंबई: बॉलिवूडचे अनेक तारे-तारका आपल्या चित्रपटांतून ओटीटीवर येण्यासाठी सज्ज आहेत. येत्या आठवड्यांमध्ये ओटीटीवर एकापाठोपाठ एक चित्रपट प्रदशित होताहेत. विद्या बालन हिचा बहुप्रतिक्षित ‘शकुंतला देवी’ हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे.

अमेझॉन प्राईम व्हिडिओनं चित्रपट ‘शकुंतला देवी’च्‍या जागतिक प्रिमिअरची घोषणा केली आहे. दिग्दर्शक अनु मेनन यांचे दिग्‍दर्शन आणि सोनी पिक्‍चर्स नेटवर्क्‍स प्रॉडक्‍शन्‍स व विक्रम मल्‍होत्रा यांची निर्मिती असलेल्‍या या बायोपिकमध्ये राष्‍ट्रीय चित्रपट पुरस्‍कार विजेती अभिनेत्री विद्या बालन प्रमुख भूमिकेत असणार आहे. तिनं ‘मानवी संगणक’ म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या जगप्रसिद्ध भारतीय बुद्धिमानी गणितज्ञाची भूमिका साकारली आहे.

‘शंकुतला देवी’ चित्रपटामध्‍ये सान्‍या मल्‍होत्रा देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ती शकुंतला देवी यांच्‍या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट ३१ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसंच या चित्रपटामध्‍ये जीशू सेनगुप्‍ता आणि अमित साध हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत. अनु मेनन व नयनिका महतानी यांनी पटकथा लेखन केलं असून इशिता मोएत्रानं संवाद लेखन केलं आहे.

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा ‘दिल बेचारा’ बेचारा हा चित्रपट येत्या २४ जुलैला ओटीटीवर प्रदर्शित होतोय. त्यानंतर पुढे प्रत्येक शुक्रवारी बॉलिवूडचे बडे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अक्षयकुमार (लक्ष्मी बॉम्ब), अजय देवगण (भूज), आलिया भट (सडक २), अभिषेक बच्चन (बिग बुल), कुणाल खेमू (लुटकेस), विद्युत जमवाला (खुदा हाफिज), जान्हवी कपूर (गुंजन सक्सेना) हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. पण, सिनेमांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन काय असेल, याबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे. बॉलिवूड चित्रपटांसाठी यशाचं मोजमाप ठरणाऱ्या ‘शंभर कोटी क्लब’च्या ट्रेंडवरदेखील यानिमित्तानं प्रश्नचिन्ह असेल.

मिळालेल्या माहितीनुसार अक्षयकुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यासाठी तब्बल १३० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचं कळतंय. तर अजय देवगणच्या ‘भूज’ सिनेमाची खरेदी १२५ ते १३० करोड रुपयांमध्ये ओटीटीवर झाल्याची चर्चा आहे. सोबतच अजयचीच निर्मिती असलेला आणि अभिषेक बच्चनची प्रमुख भूमिका असलेला ‘बिग बुल’ अंदाजे ८० कोटीला विकला गेल्याचं कळतंय. येत्या काही दिवसांत अजय देवगणची निर्मिती असलेला आणि राजकुमार रावची प्रमुख भूमिका असलेला ‘छलांग’ सिनेमादेखील ओटीटीवर प्रदर्शित होण्याची चिन्हं आहेत. यासाठी अंदाजे ७० कोटींची बोली लागल्याचं कळतंय. यापैकी काही चित्रपटांनी पेपर व्ह्यू कलेक्शनची श्रेणीदेखील स्वीकारली आहे, ज्यात ओटीटीवर किती प्रेक्षक त्यांचा सिनेमा पाहतात; या आकडेवारीतून सिनेनिर्मात्याला मोबदला मिळतो.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

शिवछत्रपती आणि नेताजी

यांच्या १२५व्या जयंतीचा समारोह पुढील वर्षी होणार असला, तरी तो आत्ताच गाजतो आहे. केंद्र सरकारने एक बहुपक्षीय बडी समिती राष्ट्रीय स्तरावर स्थापली...

robbery in domestic women worker house: मोलकरणीच्या घरात ८१ हजारांची चोरी – 81000 rupees thieves from house of domestic women worker in aurangabad

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादधुणी-भांडी करून कुटुंबाचा उदनिर्वाह चालविणाऱ्या महिलेचे घरफोडून मोबाइलसह रोख रक्‍कम असा सुमारे ८१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरणाऱ्याला जिन्सी पोलिसांनी...

Recent Comments