Home शहरं कोल्हापूर Shambhuraj Desai: Shambhuraj Desai पडळकरांना कोण देतंय धमकी?; तक्रार केल्यास कारवाई होणार!...

Shambhuraj Desai: Shambhuraj Desai पडळकरांना कोण देतंय धमकी?; तक्रार केल्यास कारवाई होणार! – if anyone is threatening padalkar he should lodge a complaint shambhuraj desai


कोल्हापूर:भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यांबाबत चौकशी सुरू असल्याचे सांगतानाच पडळकर यांना कुणी धमकी देत असल्यास त्यांनी तशी तक्रार करावी, असे आवाहनही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज केले. ( Shambhuraj Desai on Gopichand Padalkar )

वाचा: भाजपचा नेता म्हणाला, शरद पवारांवरील टीका मनाला दु:ख देणारी!

शंभूराज देसाई यांची आज कोल्हापुरात पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांनी नेमकी उत्तरे दिली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांची करोनाशी तुलना केली होती. त्याबाबत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याविषयी विचारले असता त्याची सद्यस्थिती देसाई यांनी सांगितली. गोपीचंद पडळकर यांच्यावर पुणे आणि बारामती येथील पोलीस ठाण्यांमध्ये दोन गुन्हे दाखल आहेत. पडळकरांच्या वक्तव्याची चित्रफीत पोलिसांनी मिळवली असून पुढील चौकशी सुरू आहे, असे देसाई यांनी स्पष्ट केले.

पडळकरांना धमक्या येत असल्याबद्दल विचारले असता, पडळकर यांना कुणी धमकी देत असल्यास त्यांनी पोलिसात तशी तक्रार करावी. त्यांच्या तक्रारीमध्ये तथ्य असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

वाचा: चंपा, टरबुजा म्हटलेलं कसं चालतं?; पाटलांचा राष्ट्रवादीला सवाल

दरम्यान, शरद पवारांवर पडळकर यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पडळकर यांना गर्भित इशारा दिला होता. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तर पडळकरांचे बोलविते धनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील असल्याचा आरोप केला होता. या वक्तव्याला शंभूराज देसाई यांनीही निषेध केला होता. शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. अशा ज्येष्ठ व आदरणीय नेत्यावर नवख्या आमदाराने टीका करणे अशोभनीय आहे, असे देसाई म्हणाले होते. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी शरद पवार यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण समितीवर प्रमुख म्हणून बोलावले होते. सातत्याने शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊनच पवार यांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात काम केलं. अशा आदर्श नेत्यावर नवख्या आमदाराने टीका करणे अशोभनीय आहे, असेही देसाई म्हणाले.

वाचा: पडळकरांची झोप उडेल अशा शिव्या देऊ; हसन मुश्रीफ संतापले

काय म्हणाले होते पडळकर?

‘शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहेत. त्यांनी बहुजन समाजावर नेहमीच अन्याय केला. छोट्या समूहाला भडकवायचं आणि लढवायचं हेच धोरण त्यांनी राबवलं आहे. त्यांनी ६० वर्षे बहुजन समाजाला झुलवत ठेवून राज्य केलं आहे. गेल्या ६० ते ७० वर्षांत त्यांनी बहुजन नेतृत्वाला पुढे येऊ दिले नाही. पवारांकडे विचारधारा नाही, अजेंडा नाही आणि व्हिजनही नाही’, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

salon in western railway stations: रेल्वे स्थानकांमध्ये आता सलूनही – western railway has decided to start air-conditioned salon on mumbai central station with six...

म. टा. प्रतिनिधी, मुंबईघड्याळ्याच्या काट्याप्रमाणे धावणाऱ्या मुंबईकरांचा थकवा दूर करण्यासाठी रेल्वे स्थानकांतच काही आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मुंबई सेंट्रलसह सहा...

Recent Comments