Home शहरं मुंबई Sharad Pawar: मंत्र्यांना ४६ दिवसात जमलं नाही ते पवारांनी २ तासात करुन...

Sharad Pawar: मंत्र्यांना ४६ दिवसात जमलं नाही ते पवारांनी २ तासात करुन दाखवलं – sharad pawar ends private bus owners transport dept impasse in two hours


मुंबई : राजकीय स्तरावर असा कोणताच प्रश्न नसतो, ज्याचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे नसेल. बुधवारीही राज्यातील खाजगी बस चालकांना याचा अनुभव आला. गेल्या ४६ दिवसात परिवहन विभागासोबत चालू असलेल्या चर्चेत जे समाधान निघालं नाही, ते शरद पवार यांनी अवघ्या दोन तासात काढलं. बस चालकांकडून कर सवलती आणि कठोर नियम मागे घेण्याची मागणी केली जात होती. या बस चालकांना आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडूनच आश्वासन मिळालं असून कॅबिनेटसमोर हा विषय येणार आहे.

राज्यात नोंदणीकृत बसेसची संख्या एकूण ५५ हजार आहे, तर एकट्या मुंबई महानगर प्रदेशात ३८ हजार बसेस आहेत. बस व्यावसायिकांनी महिन्याला ७०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प असल्याचा दावा केला आहे. यासाठीच ८ मे रोजी परिवहन विभागाला पत्र लिहून व्यावसायिकांनी आपल्या मागण्या मांडल्या. परराज्यातील बसेसना परवानगी दिली आहे. पण राज्यातील बसेसना ठिकठिकाणी बेकायदेशीरपणे थांबवून चौकशी केली जात असल्याचं बस चालकांनी सांगितलं. या पत्रात इतरही मागण्या होत्या. पण परिवहन विभागाने या बस चालकांची भेट घेण्यासही नकार दिला होता. त्यामुळेच संतापलेल्या बस चालकांनी गुरुवारपासून संपावर जाण्याचा इशारा दिला.

भाजपच्या गोटात खळबळ; शिवसेनेनंतरचा सर्वात जुना मित्र साथ सोडणार?

अखेरचा प्रयत्न म्हणून या बस व्यावसायिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवारांच्या निवासस्थानी बुधवारी सकाळी ११ वाजता भेट ठरली. पवारांनी या बस व्यावसायिकांना सर्व मागण्या सोडवण्याचं आश्वासन दिलं. आपल्या अपेक्षेपेक्षाही कमी वेळेत पवारांनी समाधान शोधल्यामुळे बस व्यावसायिकांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

‘सत्तास्थापनेची चर्चा अजितदादा नव्हे, राष्ट्रवादीसोबत झाली…’

या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी बस संघटना आणि परिवहन विभाग अधिकाऱ्यांच्या टास्क फोर्सची तातडीने नियुक्ती करण्यात यावी, असे निर्देश पवारांनी दिले. पहिल्यांदा यासाठी पवारांनी परिवहन मंत्र्यांना विश्वासात घेतलं नाही. पण नंतर त्यांनी स्वतः अनिल परब यांच्याशी चर्चा केली. पवारांनी टास्क फोर्सविषयी माहिती देऊन तुम्ही स्वतः यात लक्ष घालावं, असं परब यांना सांगितल्याची माहिती आहे.

तू कार वापरत नाहीस का; अक्षय कुमारला आव्हाडांचा सवाल

शरद पवारांनी पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतही चर्चा केली. एका वर्षासाठी २-४ लाख रुपये कर सवलतीबाबतच्या मागणीवर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली. समाधानी झालेल्या बस व्यावसायिकांनी दोन तासात पवारांचं निवासस्थान सोडलं आणि थेट अनिल परब यांची भेट घेतली. बस व्यावसायिकांची कर सवलतीची मागणी ग्राह्य धरावी यासाठी परिवहन विभागाने प्रस्ताव पाठवल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांकडूनही शब्द मिळाला असल्याचं या बस व्यावसायिकांनी सांगितलं.

‘जुलै, ऑगस्ट धोकादायक’; उपमुख्यमंत्र्यांनी दिला इशारा

गुरुवारी कर सवलतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडला जाईल. या प्रकारच्या सवलतींसाठी कॅबिनेटच्या मंजुरीची आवश्यकता आहे. कारण, यात राज्य महसूल विभागाची भूमिका महत्त्वाची आहे.

खाजगी बस व्यावसायिकांच्या मागण्या

  • खाजगी बसेसना वाहतुकीची परवानगी द्यावी, सतत परवाना मागू नये
  • आरटीओला वर्षाला भरावा लागणारा २-४ लाख रुपये कर माफ करावा
  • या वर्षासाठी बसेसचे ईएमआय थांबवावे
  • एक वर्षासाठी टोलमाफी द्यावी
  • वाहन विम्याची मुदत दोन महिन्यांनी वाढवावी
  • बेस्ट बस डेपो आणि बीएमसी पार्किंगमध्ये मोफत जागा द्यावीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Jasprit Bumrah: इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात नसणार हा मुख्य खेळाडू – ind vs eng pacer jasprit bumrah expected to miss odi series against...

हायलाइट्स:भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर वनडे मालिका खेळणार आहेटी-२० मालिकेसाठी जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहेआता वनडे मालिकेसाठी देखील त्याला विश्रांती दिली जाण्याची...

मराठी सिनेसृष्टीचं नुकसान भरुन निघणार का? ८३ सिनेमे प्रदर्शनासाठी सज्ज – will the loss of marathi cinema be compensated? 83 movies ready for release

गेल्या वर्षभरात झालेलं नुकसान कसं भरुन काढायचं? हा प्रश्न सर्वच क्षेत्रातील व्यवसायांना पडला आहे. तसाच तो मराठी मनोरंजनसृष्टीला देखील पडला आहे. यापूर्वी सिनेसृष्टीचं...

एटीएम कार्डाची चोरी; मग दारूची खरेदी

म. टा. खास प्रतिनिधी, इंदिरानगरमधील महिला दुकानदाराचे लक्ष विचलित करीत त्यांच्या पर्समधील २० हजारांची रोकड आणि एटीएम कार्डवर डल्ला मारला. यानंतर तब्बल १७...

Recent Comments