Home शहरं सातारा Sharad Pawar: sharad pawar : चीनने तेव्हाही भारताचा भूभाग बळकावला होता; पवारांनी...

Sharad Pawar: sharad pawar : चीनने तेव्हाही भारताचा भूभाग बळकावला होता; पवारांनी टोचले राहुल गांधींचे कान – ncp leader sharad pawar reaction on india-china dispute


सातारा: भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे कान टोचले आहेत. राष्ट्राच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आरोप करताना पूर्वी काय घडलं होतं, याचाही विचार केला पाहिजे. १९६२च्या युद्धानंतर चीनने भारताचा ४५ हजार किलोमीटरचा भूभाग बळकावला होता. तो आजही परत मिळालेला नाही, अशी आठवण करून देतानाच राष्ट्राच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण करू नका, अशा शब्दांत शरद पवार यांनी राहुल गांधी यांचे कान टोचले आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. भारत-चीन संघर्षावरून सत्ताधारी आणि काँग्रेस दरम्यान सुरू असलेल्या वाक् युद्धावरही त्यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांचे कान उपटतानाच भूतकाळातील घटनांचे दाखलेही दिले. काल परवा झालेल्या भारत-चीन संघर्षावेळी चीनने भारताचा काही भाग बळकावला ही गोष्ट खरी आहे. किती भूभाग बळकावला हे माहीत नाही. पण १९६२च्या युद्धानंतर चीनने आपला ४५ हजार किलोमीटरचा भूभाग बळकावला होता. तो अजूनही चीनने सोडलेला नाही. ही गोष्ट आपण विसरू शकत नाही, असं सांगतानाच जेव्हा आपण आरोप करतो, तेव्हा पूर्वीच्या काळात मी असताना काय घडलं याचा मी विचार करतो. कारण हा राष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यात राजकारण आणता कामा नये, असा सल्ला पवारांनी राहुल गांधी यांना त्यांचे नाव न घेता दिला.

भारत-चीन युद्ध नाहीच

चीन-भारत प्रश्न हा संवेदनशील आहे. चीनने गलवान खोऱ्यात कुरापती काढली हेही खरं आहे. मात्र, असे असले तरी भारत-चीन युद्ध होण्याची शक्यता नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. सियाचीनशी संपर्क साधण्यासाठी आपण गलवान खोऱ्यात रस्ता करत आहोत. गलवान खोऱ्यात आपल्याच हद्दीत आपण रस्ता करत असून त्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरण्याची सोय करत आहोत. या रस्त्याचं काम सुरू असताना चीनचं सैन्य रस्त्यावर आलं आणि आपल्या सैनिकांसोबत त्यांची झटापट झाली, असं पवार म्हणाले.

चीन सैनिकांच्या बॅगेत लोखंडी रॉड; घातपाताच्या तयारीनिशीच गस्त

अपयशाचं खापर संरक्षण मंत्रालयावर फोडणे चूक

१९९३मध्ये संरक्षम मंत्री असताना मी चीनला गेलो होतो. त्यावेळी हिमालयीन बॉर्डवर सैन्य कमी करण्याबाबत सहा दिवस चर्चा झाली. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव चीनला गेले आणि त्यांनी दोन्ही बाजूचं सैन्य कमी करण्याचा करार झाला. यावेळी हिमालयीन बॉर्डरवर फायरिंग करायची नाही, असा करार झाला. तशी अंडरस्टँडिंगही झाली. ९३ नंतर १९९५लाही हाच करार झाला. त्यामुळे जेव्हा कधी संघर्ष होतो, तेव्हा दोन्ही बाजूने फायरिंग केली जाते. पण गलवान खोऱ्यात फायरिंग झाली नाही. झटापट झाली. कुणीही गोळीबार केला नाही. तर त्यांच्यात धक्काबुक्की झाली. करारामुळेच या भागात गोळीबार झाला नाही, असं सांगतानाच रस्त्यावर अतिक्रमण करताना चिनी सैन्याला रोखलं, म्हणून झटापट झाली. गस्त घालताना कुणी आडवं आल आणि असा काही संघर्ष झाला तर संरक्षण मंत्र्यांचं अपयश आहे, असं म्हणून चालणार नाही. ते योग्य नाही. झटापट होते, याचा अर्थच तुम्ही जागरूक होता असा होतो. नाही तर चिनी सैन्य कधी आलं आणि गेलं हे कळलंही नसतं असं पवार म्हणाले.

…तेव्हाच LAC वर तणाव संपुष्टात येईल, भारताची चीनला समज!

गोपीचंद पडळकरांविषयी बोलायचं आहे; पण…; शरद पवारांचा सूचक इशाराSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rishabh Pant Sung Spiderman Song In The 4th And Final Test In Brisbane – IND vs AUS : रिषभ पंत मैदानात नेमकं कोणतं गाणं...

ब्रिस्बेन, IND vs AUS : चौथ्या कसोटी सामन्यात बरेच रंजक किस्से पाहायला मिळाले. यामध्ये भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत सामना सुरु असताना मैदानात गाणं...

jayant patil on uddhav thackeray driving: CM ठाकरेंच्या वाटेत अडथळे कोण आणतंय?; राष्ट्रवादीचा ‘हा’ मंत्री म्हणाला… – chief minister uddhav thackerays car is running...

मुंबई: राज्यातील तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समर्थपणे सांभाळत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी...

Recent Comments