Home शहरं पुणे Sharad Pawar: Sharad Pawar पुण्यात करोना साखळी तोडण्याचे आव्हान; शरद पवार उतरले...

Sharad Pawar: Sharad Pawar पुण्यात करोना साखळी तोडण्याचे आव्हान; शरद पवार उतरले मैदानात! – ncp chief sharad pawar chairs meeting in pune to review covid 19 situation


पुणे: ‘ करोना सदृष्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या चाचण्या वाढविण्यात याव्या; तसेच करोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांकडून अवाजवी शुल्क आकारले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी’, अशा सूचना माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिल्या. ( Sharad Pawar in Pune )

वाचा: राज्यात पुन्हा लॉकडाऊन नाही; ‘अनलॉक’वर टोपेंची महत्त्वाची माहिती

करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने याची दखल घेत शरद पवार यांनी करोनाच्या सद्यस्थितीचा पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. पवार म्हणाले, ‘इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यासाठी करोनाच्या संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढविण्यात याव्या. करोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांकडून आवाजवी शुल्क आकारणी होणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी’

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘करोना प्रतिबंधासाठी कँन्टोन्मेंट बोर्डसाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे’ असे जाहीर केले.

वाचा: ‘फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग’ असे म्हणणार नाही!

महापौरांचे कौतुक आणि अधिकाऱ्यांची कानउघडणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत शरद पवार यांच्यासमोर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच पुणे महानगरपालिकेने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आर्थिक भार सहन केला असल्याने याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाणार असल्याचे आश्वासन दिले. त्याचवेळी त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. ‘मी दररोज अधिकाऱ्यांना फोन करून करोनाचा आढावा घेतो. त्याप्रमाणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांनीही खासदार आणि आमदार या लोकप्रतिनिधींना फोन करून माहिती दिली पाहिजे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सोबत घेवून काम केले पाहिजे. अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेल्या जबाबदारीप्रमाणे काम करावे’, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, खासदार गिरीश बापट, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण आणि अमोल कोल्हे, आमदार शरद रणपिसे, चेतन तुपे, भीमराव तापकीर, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, सुनील टिंगरे, सुनील शेळके आणि सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते. तसेच विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, साखर आयुक्त सौरभ राव, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त विक्रम कुमारआदी बैठकीला उपस्थित होते.

वाचा: आजारी असताना बहिणीनं फोन केल्याचा आनंद वाटला: धनंजय मुंडेSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

salon in western railway stations: रेल्वे स्थानकांमध्ये आता सलूनही – western railway has decided to start air-conditioned salon on mumbai central station with six...

म. टा. प्रतिनिधी, मुंबईघड्याळ्याच्या काट्याप्रमाणे धावणाऱ्या मुंबईकरांचा थकवा दूर करण्यासाठी रेल्वे स्थानकांतच काही आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मुंबई सेंट्रलसह सहा...

Recent Comments