Home क्रीडा Shardul Thakur: तुला परत मानले रे ठाकूर; भारताच्या कर्णधाराचे ट्विट व्हायरल -...

Shardul Thakur: तुला परत मानले रे ठाकूर; भारताच्या कर्णधाराचे ट्विट व्हायरल – aus vs ind 4th test virat kohli says to shardul thakur tula parat maanla re thakur


ब्रिस्बेन:aus vs ind 4th test भारताविरुद्धच्या चौथ्या आणि अंतिम कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला फक्त ३३ धावांची आघाडी घेतला आली. यजमान संघाला ही आघाडी १५० पेक्षा अधिक धावांची करता आली असती. पण भारताच्या दोघा फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना रडवले. पहिली कसोटी खेळणाऱ्या वॉशिंग्टन सुंदर आणि फक्त एका कसोटीचा अनुभव असलेल्या शार्दुल ठाकूर ( shardul thakur ) यांनी सातव्या विकेटसाठी विक्रमी १२३ धावांची भागिदारी केली. या दोघांमुळे भारताने पहिल्या डावात ३३६ धावांपर्यंत मजल मारली आणि भारत अद्याप सामन्यात आहे हे दाखवले.

वाचा- AUS vs IND 4th Test day 3: भारताच्या शेपटाने ऑस्ट्रेलियाला रडवले, सुंदर-ठाकूर यांची विक्रमी

तिसऱ्या दिवशी ठाकूर फलंदाजीला आला तेव्हा भारताची अवस्था ६ बाद १८६ अशी होती. भारताचे तळातील फलंदाज फार तर ५० धावा करू शकतील असे वाटले होते. पण सुंदर आणि ठाकूर यांच्या मनात काही वेगळेच होते. या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना विकेट दिलीच नाही पण त्यांची धुलाई देखील केली. सुंदर आणि ठाकूर यांनी सातव्या विकेटसाठी १२३ धावांची भागिदारी केली. ठाकूर आणि सुंदर यांनी कसोटीतील पहिले अर्धशतक झळकावले. सुंदरचे पदार्पणातील अर्धशतक ठरले. ठाकूरने ११५ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ६२ तर सुंदरने ११५ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ६७ धावा केल्या. भारताचा पहिला डाव ३३६ धावांवर संपुष्ठात आला.

वाचा- पिचमुळे नव्हे तर ही आहे खरी गुणतवत्ता; सचिनने व्हिडिओ शेअर करून केले भारतीय गोलंदाजाचे कौतुक

भारताच्या या दोन्ही फलंदाजांचे कौतुक कर्णधार विराट कोहली (virat kohli)ने केले आहे. सोशल मीडियावर विराटने सुंदर आणि ठाकूर यांनी शानदार फलंदाजी केली. या दोघांनी कसोटी क्रिकेट काय आहे हे दाखवून दिल्याचे विराटने म्हटले. सुंदरचे अप्रितम पदार्पण ठरले तर शादुर्लचे कौतुक करताना ‘तुला परत मानले रे ठाकरू! असे विराटने म्हटले आहे.

वाचा- रैनाची शानदार गोलंदाजी; विकेट नव्हे तर रनआउट केले, पाहा व्हिडिओ

वाचा- गोलंदाजांमध्ये अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव खेळाडू; पाहा व्हिडिओ

विराटचे हे ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sitaram Kunte: अनुभवी आणि विश्वासार्ह : सीताराम कुंटे – sitaram kunte new chief secretary of maharashtra

अखेर सीताराम कुंटे राज्याचे मुख्य सचिव झाले. खरेतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरच ते मुख्य सचिवपदी येणार असा अनेकांचा कयास होता.  Source...

Corona Rules Violation: करोनाबाधित नियमांचा भंग करून फिरत होता घराबाहेर; गुन्हा दाखल – police file fir against corona positive man for corona rules violation

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनास रोखण्यासाठी मुंबईत लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. गोवंडी पोलिस ठाण्यापाठोपाठ सोमवारी चेंबूर पोलिस ठाण्यात...

Recent Comments