Home मनोरंजन sharmishtha raut ex husband: १० वर्षांचा संसार मोडला;'या' अभिनेत्रीच्या भावासोबत झालं होतं...

sharmishtha raut ex husband: १० वर्षांचा संसार मोडला;’या’ अभिनेत्रीच्या भावासोबत झालं होतं शर्मिष्ठाचं पहिलं लग्न – sharmishtha raut was divorced from her husband amey nipankar brother of archana nipankar


मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिचा दोन दिवसांपूर्वी साखरपुडा झाला. तिच्या साखपुड्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शर्मिष्ठानं तिच्या आयुष्याची नव्यानं सुरुवात केली आहे. यापूर्वी तिनं पहिल्या पतीला घटस्फोट दिल्याचं बिग बॉस या शोमध्ये सांगितलं होतं.

शर्मिष्ठाचं पहिलं लग्न अभिनेत्री अर्चना निपाणकर हिचा भाऊ अमेय निपाणकर याच्यासोबत झाला होता. पण काही कारणांमुळं त्यांचा संसार टिकू शकला नाही. या गोष्टींचा स्वत: शर्मिष्ठानं ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये असताना खुलासा केला होता. शर्मिष्ठा आणि अमेय यांचा प्रेमविवाह म्हणजेच लव्हमॅरेज झालं होतं. घरच्यांच्या परवानगीनं त्याचं लग्न झालं होतं. मात्र आयुष्यात काही निर्णय चुकतात तसा लग्नाचा निर्णय चुकल्याचं तिनं या शोममध्ये म्हटलं होतं. घटस्फोट झाल्यानंतर ती एका मानसिक तणावातून गेल्याचंही शर्मिष्ठानं सांगितलं होतं.

शर्मिष्ठा राऊत आणि अमेय निपाणकर

शर्मिष्ठाच्या आयुष्यात अनेक-चढ उतार आले. त्यामुळं सिनेसृष्टीतूनही काही काळ ब्रेक घेतला होता. ‘जुळून येती रेेशीम गाठी’ या मालिकेत शर्मिष्ठानं महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिनं काही काळासाठी ब्रेक घेतला होता .’दोन वर्षानंतर नव्या उत्साहानं छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय. टीव्हीमुळं आम्ही कलाकार घराघरात पोहोचतो. त्यामुळे छोटा पडदा माझ्यासाठी खास आहे. बिग बॉसमुळे प्रेक्षकांनी माणूस म्हणून मी कशी आहे हे बघितलं आणि आता पुन्हा एकदा कलाकार म्हणून मी प्रेक्षकांसमोर येतेय. ही नवी भूमिका प्रेक्षकांना आवडेल अशी आशा करते’, असं शर्मिष्ठा म्हणाली होती.


शर्मिष्ठानं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं असून बिग बॉसमुळं ती चर्चेत आली होती. ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतून ती सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकांसोबतच रंगभूमीवर देखील तिनं काम केलं आहे. ‘जो भी होगा देखा जयेगा’, ‘टॉम अँड जेरी’, ‘बायको असून शेजारी’, ‘शंभू राजे’ या नाटकात शर्मिष्ठानं काम केलं आहे.दे धक्का, फक्त लढ म्हणा, ची व ची सौ कां , काकस्पर्श, रंगकर्मी, योद्धा या मराठी चित्रपटात देखील ती झळकली आहे.

शर्मिष्ठानं आता पुन्हा नव्यानं सुरुवात केली आहे. नाशिकमधल्या इगतपुरी इथं एका रिसॉर्टच्या क्लबहाऊसमध्ये मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत तेजस देसाई याच्यासोबत तिचा साखरपुड्याचा सोहळा पार पडला. त्यानंतर तिनं सोशल मीडियावर साखरपुड्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोसाठी तिनं भावुक असं कॅप्शन देत तेजसबद्दलच्या भावना व्यक्त केल्यात. ‘ आयुष्यात श्रीमंत जोडीदार शोधणं हे भाग्याचं नसतं तर जो तुमची काळजी घेईल, जो तुमचा आत्मसन्मान जपेल आणि तुमच्याशी एकनिष्ठ असले तो तुमचं भाग्य नक्कीच बदलू शकतो’, असं शर्मिष्ठानं तिच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

करोनाने पुन्हा घेतली उसळी

म. टा. खास प्रतिनिधी, जिल्ह्यात करोनाने पुन्हा उसळी घेतली असून, मंगळवारी ४२४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे काही दिवसांपासून दोनशे ते तीनशेपर्यंतच सीमित...

virat kohli: IND vs ENG : सामन्यानंतर विराट कोहलीने सांगितली कोणाकडून झाली मोठी चुक… – ind vs eng : after winning 3rd test match...

अहमदाबाद, IND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने १० विकेट्स राखून विजय मिळवला. पण या सामन्यानंतर या लढतीत कोणाकडून मोठी चुक झाली,...

Recent Comments