Home क्रीडा sharon varghese: करोना योद्धा ठरलेल्या भारतीय नर्सचे ऑस्ट्रेलियाच्या गिलख्रिस्टने केले कौतुक -...

sharon varghese: करोना योद्धा ठरलेल्या भारतीय नर्सचे ऑस्ट्रेलियाच्या गिलख्रिस्टने केले कौतुक – australia’s ex cricketer adam gilchrist loud praises indian nurse sharon varghese who taking care of corona virus patients


करोना व्हायरसमुळे सध्याच्या घडीला चिंतेचे वातावरण आहे. आपण घरात सुरक्षित राहू, असा विचार काही जणांनी केला आहे. तर काही जणांनी या संकटकाळात लोकांची सेवा करायचे ठरवले आणि त्या व्यक्ती पुढेही आल्या आहेत. भारतामध्ये अशा व्यक्तींना करोना योद्धा, असे म्हटले जाते. अशाच एका करोना योद्धा ठरलेल्या भारतीय नर्सचे ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्टने कौतुक केल्याचे समोर आले आहे.

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांची कमतरता भासू लागल्यावर सामान्य लोकांना या कामासाठी आवाहन करण्यात आले होते. त्यावेळी काही लोकं या समाज कार्यासाठी पुढे आल्या होत्या. यामधील एका भारतीय नर्सचे गिलख्रिस्टने कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे. आम्हाला तुझा अभिमान वाटतो, अशा शब्दांत गिलख्रिस्टने भारतीय नर्सचे स्वागत केले आहे.

भारतीय नर्स वोलोंगगोंग येथील एका हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. तिची काम करण्याची आणि करोना बाधितांना सांभाळण्याची पद्धत पाहून गिलख्रिस्ट भारावून गेला आहे. आपल्या कुटुंबांतील व्यक्तीसारखी ही भारतीय नर्स करोना बाधितांची काळजी घेत असल्याचे गिलख्रिस्टने पाहिले आणि तो भावूक झाला.

गिलख्रिस्टने केले कौतुक

या भारतीय वंशाच्या नर्सचे नाव आहे शॅरोन वर्गीस. शॅरोन ही वोलोंगगोंगच्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेत आहे. त्याचबरोबर सध्याच्या घडीला देशसेवा ही करताना दिसत आहे. करोना बाधित व्यक्तींना ही भारतीय नर्स आधार देत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्याच्या करोनाच्या काळात नातेवाईकही आपल्या लोकांची जेवढी काळजी घेत नाहीत, तेवढी काळजी शेरॉन घेत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळेच शेरोनचे अभिनंदन करणयासाठी गिलख्रिस्ट पुढे आला आहे. आपल्याला तुझा अभिमान वाटतो, असे गिलख्रिस्टने शॅरोनला सांगितले आहे.

या भारतीय नर्सबाबत गिलख्रिस्ट म्हणाला की, ” शॅरोन, तु जे कार्य हाती घेतले आहेस, त्याचे मी प्रथम अभिनंदन करतो. ऑस्ट्रेलिया आणि भारतच नाही तर तुझ्या कुटुंबियांनाही तुझा गर्व आहे. तु तुझे कार्य असेल चालू ठेव. करोनाविरोधात आपण सर्वांनी एकजूटीने लढूया…”Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

BSNL festive offer: BSNL युजर्ससाठी फेस्टिव सीजनमध्ये ऑफर्स, या रिचार्जवर बंपर फायदे – festive offer: bsnl extends validity of rs 1999, rs 699, rs...

नवी दिल्लीः बीएसएनएल कंपनीने फेस्टिवल सीजनमध्ये आपल्या ग्राहकांना बंपर ऑफर देत आहे. बीएसएनएल मध्ये अनेक प्रिपेड व्हाऊचर्स (PVs) आणि स्पेशल टॅरिफ व्हाउचर्स (STVs)...

मास्क न लावणाऱ्यांमुळे वाढू शकतो करोनाचा धोका

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई संसर्गवाढीच्या (उच्चतम बिंदू) महत्त्वाच्या टप्प्यावर मुंबई आली असल्याचे निरीक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वारंवार व्यक्त केले जात असले तरीही ...

Recent Comments