Home क्रीडा Shashank Manohar steps down: शशांक मनोहर यांनी ICCच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा! -...

Shashank Manohar steps down: शशांक मनोहर यांनी ICCच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा! – shashank manohar steps down from icc chairman post


दुबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आयसीसीने मनोहर यांच्या दोन वर्षाचा कालावधीतील कामाचे कौतुक करत ही माहिती दिली.

वाचा- पाकिस्तानचे करायचे तरी काय? करोना काळात केली मोठी चूक!

आयसीसीने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार बुधवारी झालेल्या गव्हर्निंग बॉडीच्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले. जोपर्यंत आयसीसीच्या नव्या अध्यक्षाची निवड होत नाही. तोपर्यंत शशांक मनोहर यांच्या सोबत सहाय्यक म्हणून काम करणारे इम्रान ख्वाजा हे अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडतील.

वाचा- फक्त ५ दिवसाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर

आयसीसीचे कार्यकारी अधिकारी मनु साहनी म्हणाले, मी आयसीसीच्या बोर्डाच्या वतीने आणि सर्व स्टाफच्या वतीने तसेच पूर्ण क्रिकेट परिवाराकडून मनोहर यांनी दिलेल्या नेतृत्वासाठी तसेच अध्यक्ष म्हणून पार पाडलेल्या जबाबदारीसाठी त्यांचे आभार मानतो. मी त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो.

वाचा- सचिन,विराट, धोनी नव्हे तर ‘हा’ आहे भारताचा मैल्यवान खेळाडू!

मनोहर यांनी नोव्हेंबर २०१५मध्ये आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची जबाबदारी घेण्याआधी मनोहर २००८ ते २०११ आणि नोव्हेंबर २०१५ ते मे २०१६ काळात बीसीसीआयचे अध्यक्ष होते. आयसीसीच्या नियमानुसार एका व्यक्तीला सलग सहा वर्ष अध्यक्षपदावर राहता येत. त्यानुसार मनोहर यांना आणखी दोन वर्षाचा कालावधी मिळू शकत होता. पण त्यांना स्वत:ला तिसऱ्यांदा अध्यक्षपद नको आहे.

वाचा- IPL:एका सिझनमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज; अव्वल स्थानी हा भारतीय!

नव्या अध्यक्षपदासाठी आयसीसीच्या बोर्डाची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. आयसीसीच्या नव्या अध्यक्षपदासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे प्रमुख कोलिन ग्रावेस हे मुख्य दावेदार मानले जात आहेत. हॉगकॉगचे इम्रान ख्वाजा देखील या पदाच्या शर्यतीत होते. पण आयसीसीमधील पूर्ण सदस्य देशांचा त्यांना पाठिंबा नाही.

इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज बोर्डाने ग्रावेस यांना पाठिंबा दिला आहे. पण बीसीसीआयने अद्याप त्यांना जाहीरपणे पाठिंबा दिलेला नाही. मनोहर यांच्या तुलनेत ग्रावेस आणि बीसीसीआयचे संबंध चांगले राहिले आहेत. मनोहर यांच्यावर भारतीय क्रिकेटच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात होता. एन.श्रीनिवासन अध्यक्ष असताना त्यांनी भारतीय क्रिकेट बोर्डाच्या विरुद्ध निर्णय घेतल्याचे म्हटले गेले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rishabh Pant Is Recover From Injury And He Will Be Play In Todays Match Against Kings Eleven Punjab – IPL2020: दिल्लीसाठी गूड न्यूज, पंजाबविरुद्धचा...

दुबई : पंजाबबरोबरचा सामना सुरु होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. दिल्लीच्या संघात एका धडाकेबाज खेळाडूचे आज पुनरागमन होऊ शकते,...

Farmers agitation: जिल्हाधिकारी कार्यालयात उधळला भाजीपाला – aurangabad farmers agitation for announce wet drought and compensation

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादसातत्याने होत असलेली अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील उभे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसान भरपाई तातडीने द्यावी; तसेच जिल्ह्यात ओला...

Recent Comments