Home शहरं अहमदनगर Shirdi Sai Trust: केंद्र सरकारला सोने द्यायला शिर्डी संस्थान तयार - shirdi...

Shirdi Sai Trust: केंद्र सरकारला सोने द्यायला शिर्डी संस्थान तयार – shirdi sai trust ready to give gold to government


अहमदनगर: करोना विरुद्धच्या लढ्यात निधी मिळविण्यासाठी केंद्र सरकारने देशातील देवस्थानाकडे असलेले सोने ताब्यात घ्यावे, या काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचनेचे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी स्वागत केले आहे. केंद्र सरकारने जर चांगली योजना जाहीर केली, सोने गहाण ठेवण्याचा योग्य मोबदला मिळाला तर देवस्थान हे सोने दयायला तयार आहे, असे हावरे यांनी स्पष्ट केलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी देवस्थानांकडे सोने घेण्याची सूचना केली होती. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या अधिपत्याखाली असलेल्या शिर्डी संस्थानचे अध्यक्ष डॉ. हावरे यांची प्रतिक्रिया महत्वपूर्ण ठरते. ‘टाइम्स नाऊ’ला प्रतिक्रिया देताना डॉ. हावरे म्हणाले की, अशा संकटकाळात हे सोने देशाच्या उपयोगी येत असेल तर आम्हाला व साई भक्तांनाही आनंदच आहे. या सूचनेचा केंद्र सरकारने जरूर विचार करावा. मात्र त्यासाठी एखादी स्कीम देऊन देवस्थानला योग्य मोबदला मिळेल याची काळजी घ्यावी.

आता सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन दाखल करा याचिका!

दरम्यान, शिर्डी हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे देवस्थान मानले जाते. शिर्डी देवस्थानकडे सध्या सुमारे साडेचारशे किलो सोने आहे. भक्तांनी ते विविध प्रकारे दान म्हणून दिलेले आहे. शिर्डी संस्थांचे वार्षिक उत्त्पन्न ६८० कोटी असून विविध प्रकारचा वार्षिक खर्च ६०० कोटी रुपये इतका आहे. लाकडाऊनमुळे संस्थानच्या उत्पन्नात लक्षणीय स्वरुपात घट झाली आहे. सुमारे सव्वाशे कोटी रुपयांची तूट असल्याचे सांगण्यात येते. विविध कारणांमुळे संस्थानचे विश्वस्थ मंडळ वादात अडकलेले आहे. त्यामुळे मोजकेच विश्वस्थ सध्या उरले असून त्यांचे आर्थिक अधिकारही मर्यादित करण्यात आले आहेत. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांना सर्व मोठ्या आणि धोरणात्मक व्यवहरासाठी हायकोर्टाची परवानगी घ्यावी लागते.

सोनिया गांधींना हात जोडून विनंती; मजुरांच्या मुद्द्यावर राजकारण करू नका: सीतारामनSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sonography centre in aurangabad: सोनोग्राफी केंद्रांवर आता जिल्हाप्रशासनाची नजर – nashik district administration will watch on sonography centre

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादसोनोग्राफी केंद्रामध्ये तीन ते चार महिने गर्भवती असलेली महिला अचानक तपासणीस येणे बंद कसे होते, याबाबत लक्ष देण्यात येणार आहे....

Ajinkya Rahane: ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या राज्यातील पाच क्रिकेटपटूंचा होणार नागरी सत्कार – india tour of australia five cricketers will be honored by state...

हायलाइट्स:ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेत विजय मिळवलेल्या संघात चार खेळाडू राज्यातीलया खेळाडूंचा नागरी सत्कार करण्याची मनसेची मागणीक्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनीक्रीडा...

Recent Comments