Home शहरं नागपूर shiv sena: पैसे घेतल्याच्या आरोपाने शिवसेनेत खळबळ - sensation in shiv sena...

shiv sena: पैसे घेतल्याच्या आरोपाने शिवसेनेत खळबळ – sensation in shiv sena over allegations of taking money


म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या उपस्थितीत शहरप्रमुख मंगेश कडव यांना लाच दिल्याच्या आरोपाने खळबळ उडाल्यानंतर प्रकरण सकाळीच मुंबईत पोहोचताच स्थानिक पातळीवर सारवासारव करण्यात आली.

यासंदर्भात शिवसेनेचे माजी पदाधिकारी अशोक धापोडकर यांनी बजाजनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. जिल्हा प्रमुखपदावर नियुक्तीसाठी मंगेश कडव यांनी २५ लाख घेतल्याचा त्यांचा आरोप आहे. यासोबतच गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याची हमी दिली होती. जिल्हा प्रमुखांच्या उपस्थितीत हा व्यवहार झाल्याचे त्यांनी बुधवारी सांगितल्यानंतर जिल्हा प्रमुख नसल्याचा खुलासा गुरुवारी केला. दरम्यान, आरोप करणाऱ्यांच्या विरोधात मानहानीचा दावा करण्याचा इशारा जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांनी दिला.

कडव यांनी पदांची हमी देत अरुणपालसिंह बहल यांच्यासह इतरांकडूनही पैसे घेतल्याचा दावा धापोडकर यांनी तक्रारीत केला. मुंबईतील रंगशारदा हॉटेलच्या जमीन प्रकरणातही २५ लाख रुपये घेतल्याचा आरोप असून मुंबईच्या न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे, हे विशेष.

धापोडकर यांनी लावलेल्या आरोपांचा शिवसेनेने इन्कार केला. गणेशपेठेतील पक्ष कार्यालयात गुरुवारी सायंकाळी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत मंगेश कडव यांनी आरोप फेटाळून लावले. पक्षाची उमेदवारी मिळवून देण्याचे काम माझे नाही. त्यामुळे उमेदवारीचा आरोप चुकीचा आहे. धापोडकर यांनी संघटनात्मक कामासाठी आर्थिक सहकार्य केल्याचे त्यांनी कबूल केले. गडचिरोलीतील पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर त्यांनी राजीनामा दिला. आता सेनेत परत येण्यासाठी ते दबाव आणत असल्याचा दावा कडव यांनी केला. पत्रकार परिषदेस शहर प्रमुख राजू तुमसरे, किशोर ठाकरे, किशोर पराते, पुरुषोत्तम कांद्रीकर आदी उपस्थित होते.

मानहानीचा दावा करणार

साडेतीन दशकांपासून संघटना व राजकारणात सक्रिय आहे. या काळात एकदाही भ्रष्टाचाराचा डाग वा आरोप लागला नाही. हे प्रकरण व्यक्तिगत असून त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. माझ्यासमोर कोणताही व्यवहार झालेला नाही. माझ्यावर आरोप लावणाऱ्याने आधी स्वत:चे चारित्र्य बघावे. या विरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे प्रकाश जाधव यांनी सांगितले. दरम्यान, तक्रारकर्ते अशोक धापोडकर यांनी प्रकाश जाधव यांचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा एका निवेदनाद्वारे केला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

gold rate today: सोने-चांदी तेजीत; जाणून घ्या आजचा भाव – Gold Silver Price Today

मुंबई : कमॉडिटी बाजारात ५०८८८ रुपये आहे. चांदीच्या दरात मात्र ४७५ रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीचा भाव ६२३८१ रुपये झाला आहे....

Ramdas Athawale Corona Positive: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंना करोनाची लागण; कार्यकर्त्यांना दिल्या ‘या’ सूचना – Union Minister Ramdas Athawale Tests Covid Positive

मुंबईः अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचाही करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे....

Hathras Gang Rape Case: हाथरस प्रकरण: अलाहाबाद हायकोर्ट CBI तपासावर देखरेख करणार; सुप्रीम कोर्टाचा निर्णय – Hathras Gang Rape And Murder Case Allahabad High...

नवी दिल्ली: हाथरस प्रकरणाबाबत (Hathras gangrape and murder case) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आज महत्वाचा निर्णय दिला. या प्रकरणाचा सीबीआय (CBI) करत असलेला...

Recent Comments