Home शहरं नाशिक Shivsena: भाजप-शिवसेनेचा अनोखा दोस्ताना - shivsena leader sudhakar badgujar raised question on...

Shivsena: भाजप-शिवसेनेचा अनोखा दोस्ताना – shivsena leader sudhakar badgujar raised question on nashik municipal corporation’s ghantagadi contractor fine


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्याशी संबंधित घंटागाडीच्या जी. टी. पेस्ट कंट्रोल कंपनीला महापालिकेने आकारलेला तीन कोटी २१ लाखांचा दंड माफीसाठी भाजपच्या सदस्य सुप्रिया खोडे यांनी स्थायी समितीला पत्र दिले. शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी घंटागाडी ठेकेदारांना चुकीच्या पद्धतीने दंड लावला जात असल्याचा मुद्दा स्थायी समितीत उपस्थित केल्याने संशयकल्लोळ वाढला आहे.

राज्यात आणि महापालिकेत भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष रंगला असला तरी, पालवेंच्या कंपनीच्या दंड माफीसाठी थेट शिवसेना मैदानात उतरल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे सभापती गणेश गिते यांनीही घंटागाडी ठेकेदारांना आतापर्यंत लावलेल्या दंडाबाबत सविस्तर माहिती समितीवर ठेवण्याचे निर्देश दिले. त्यामुळे पालवेंना झालेला दंड परत मिळण्याच्या पल्लवित झाल्या आहेत.

महापालिकेने शहरातील सहा विभागासाठी स्वतंत्र घंटाडागाडीचा ठेका आहे. त्यातील जी. टी. पेस्ट कंट्रोल या ठेकेदाराकडे पंचवटी आणि सिडकोचे काम देण्यात आले. शहरातील घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी या घंटागाडी ठेकेदारावर असताना अनेक ठिकाणी घंटागाड्या पोहचत नसल्याच्या तसेच कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी होत्या. ठेक्यातील निविदेप्रमाणे सर्व घंटागाड्या या ऑनलाइन ट्रॅकवर असल्याने घंटागाड्यांना उशीर झाल्यास स्वयंचलित दंड होतो. तसेच घंटागाडी आली नाही तर त्याचाही स्वतंत्र दंड होतो.

जी. टी. पेस्ट कंट्रोल कंपनीला तीन वर्षात तब्बल ३ कोटी २१ लाख २१ हजारांचा दंड करण्यात आला होता. दंड करून आणि आठ वेळा नोटीस देऊनही कामात सुधारणा होत नसल्याने गेल्या वर्षी कंपनीचा ठेका रद्द करण्यात आला होता. या दोन विभागांचे काम अन्य ठेकेदारांना वाटून देण्यात आले होते. परंतु, पालवेंची कंपनी असल्याने महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सदरचा दंड माफ करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. स्थायी समिती सदस्य सुप्रिया खोडे यांनी घंटागाडी ठेकेदारांना लावलेला सदरचा दंड माफ करावा, यासाठी स्थायी समितीला पत्र दिले. योगायोग म्हणजे बुधवारी (दि. १३) स्थायीच्या बैठकीत सदस्य व शिवसेनेचे नूतन महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी घंटागाडी ठेकेदारांना चुकीच्या पद्धतीने दंड लावला जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत दंड लावतांना आरोग्य विभागाकडून गोंधळ घातला जात असल्याचा दावा केला आहे. तांत्रिक मुद्दे उपस्थित करत बडगुजर यांनी घनकचरा विभागालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. सभापती गितेंनीही याची तात्काळ दखल घेत, पुढील बैठकीत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश घनकचरा विभागाला दिल्याने भाजप शिवसेनेच्या अनोख्या दोस्तानाची खंमग चर्च महापालिकेत सुरू झाली आहे.

निव्वळ बनवेगिरी

निवडणुकांच्या तोंडावर महापालिकेत सध्या भाजप आणि शिवसेनेत विस्तव जात नसल्याचे सध्या भासवले जात आहे. घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीच्या खासगीकरणाच्या ठेकेदारावरून शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी ठेकेदारीवरून जाहीर पत्रकार परिषदांमधून एकमेकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्याला आठवडाही उलटत नाही तोच, भाजपच्या शहराध्यक्षच्या कंपनीला झालेल्या दंडमाफीचा पुळका शिवसेनेच्या महानगर प्रमुखांना आल्याने निव्वळ बनवेगिरी सुरू असल्याची महापालिका वर्तुळातच चर्चा सुरू आहे.

ठेकेदार हिताय धोरण

घंटागाडी ठेक्यातील अटी व शर्ती व करारनाम्यानुसारच पालवेंच्या कंपनीसह अन्य ठेकेदारांना दंड केला जात आहे. विशेष म्हणजे हा दंड त्यांच्या बिलातून परस्पर वसूल केला जात आहे. प्रशासकीय प्रक्रिया असतांनाही शहराचे विश्वस्तच ठेकेदारांच्या भल्यासाठी सरसावत असल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. नागरिक कररूपाने विकासासाठी पैसा भरत असतांना विश्वस्त मात्र ठेकेदारांच्या तुंबड्या भरण्यात गुंतले असल्याचे चित्र आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pune Crime: अमोल कोल्हेंच्या नावाने बिल्डरकडे मागितले पैसे; पुढे काय घडले पाहा – money demanded from builder in the name of amol kolhe

पुणे:लॉकडाऊन काळात एका बिल्डरला खासदार अमोल कोल्हे बोलत असल्याची बतावणी करून फसविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्या विरोधात वानवडी...

Recent Comments