Home शहरं मुंबई Shivsena and PM Modi: Bihar Regiment: 'मराठा, रजपूत, शीख रेजिमेंट सीमेवर तंबाखू...

Shivsena and PM Modi: Bihar Regiment: ‘मराठा, रजपूत, शीख रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या का?’ – Shivsena Takes A Dig At Pm Modi’s Speech On Galwan Valley Clash


मुंबई: ‘बिहारची आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढं ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सैन्य दलातील बिहार रेजिमेंटच्या नावाचा वापर करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. ‘देशावर यापूर्वी अनेकदा संकटे आली, तेव्हा इतर रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या काय,’ असा सवालही शिवसेनेनं मोदींना केला आहे. (Shivsena targets Modi in Saamana Editorial)

वाचा: पडळकरांच्या पवारांवरील टीकेबद्दल शिवसेनेला ‘हा’ संशय

भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार आज शिवसेनेनंच मुखपत्र दैनिक ‘सामना’तून घेण्यात आला आहे. त्याच अनुषंगानं भाजपच्या आणि मोदींच्या राजकारणावरही टीका करण्यात आली आहे. ‘पवारांनी छोट्या समूहांचा राजकारणासाठी वापर केल्याचा आरोप पडळकर यांनी केला होता. त्याला उत्तर देताना शिवसेनेनं भाजपच्या राजकारणाचेही दाखले दिले आहेत. ‘गोपीचंद पडळकर यांना भाजपनं आमदार केलं यामागे देखील लहान समूहांना वापरण्याचं राजकारणच आहे. या राजकारणात पंतप्रधान मोदीही तरबेज झाले आहेत,’ असं शिवसेनेनं मोदींच्या एका भाषणाचा दाखला देऊन म्हटलं आहे.

बिहारमधून गरीब कल्याण रोजगार अभियानाचा प्रारंभ करताना नुकताच पंतप्रधान मोदी यांनी बिहारच्या जनतेशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी गलवान खोऱ्यात बिहार रेजिमेंटनं गाजवलेल्या शौर्याचं स्मरण केलं होतं. प्रत्येक बिहारीला ‘बिहार रेजिमेंट’चा अभिमान असायला हवा, असं मोदी म्हणाले होते. तोच धागा पकडत शिवसेनेनं मोदींवर टीका केली आहे. ‘गलवान खोर्‍यात ‘बिहार रेजिमेंट’ने शौर्य गाजवले असे पंतप्रधान मोदी यांनी काल सांगितले. देशावर यापूर्वी संकटे आली तेव्हा महार, मराठा, रजपूत, शीख, गुरखा, डोग्रा रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या काय?,’ असा प्रश्न शिवसेनेनं केला आहे.

‘पुलवामात कालच महाराष्ट्राचे वीरपुत्र सुनील काळे शहीद झाले, पण बिहारात निवडणुका आहेत म्हणून सैन्य दलातील ‘जात’, ‘प्रांत’ यास महत्त्व आणले जात आहे. हे राजकारण म्हणजे करोनापेक्षा भयंकर गजकर्ण आहे! महाराष्ट्रात हा गजकर्ण खाजवण्याचे काम विरोधी पक्ष करीत आहे’, असा आरोप शिवसेनेनं केला आहे.

वाचा: सुटले म्हणता, म्हणता इंदोरीकर महाराज पुन्हा अडकले!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही एक ट्विट करून मोदींवर टीका केली होती. ‘पंतप्रधानांनी बिहार रेजिमेंटबद्दल केलेलं वक्तव्य शेअर करून भारतीय सैन्याला जातीपातीत वाटू नका, असं आव्हाड यांनी म्हटलं होतं. ‘बिहारमध्ये याच वर्षी ऑक्टोबरमध्ये निवडणुका होणार आहेत,’ अशी आठवणही त्यांनी या ट्विटमधून करून दिली होती.

Live: राज्यात ७७ हजारांहून अधिक रुग्ण करोनामुक्तSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments